ब्लड प्रेशरपासून ते मल्टी व्हिटॅमिन पर्यंत… रोजच्या वापरातील ही 48 औषध सदोष, ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून अलर्ट जाहीर

या यादीत रक्तदाब, लोह, प्रोबायोटिक्स, फॉलिक ॲसिड आणि अनेक मल्टीविटामिन गोळ्यांचा समावेश आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 12 आणि नियासीनामाइड इंजेक्शन्सचाही समावेश आहे.

ब्लड प्रेशरपासून ते मल्टी व्हिटॅमिन पर्यंत... रोजच्या वापरातील ही 48 औषध सदोष, ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून अलर्ट जाहीर
48 औषधे गुणवत्ता चाचणीत झाली नापासImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 10:19 AM

नवी दिल्ली : सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन किंवा सीडीएससीओने (CDSCO) एक धक्कादायक वृत्त दिले आहे. भारतात नियमितपणे वापरली जाणारी 48 औषधे ही औषध सुरक्षा पॅरामीटर्समध्ये (drug safety parameters) अपयशी ठरली आहेत. सीडीएससीओच्या वेबसाइटवर हे नमूद करण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च आरोग्य नियामकाने चाचणी केलेल्या एकूण 1,497 नमुन्यांमधून रक्तदाब, मधुमेह, फॉलिक ॲसिड, मल्टीविटामिन, अँटीबायोटिक्स आणि मधुमेहासाठी वापरल्या जाणार्‍या औषधांचा यादीत समावेश असून ही औषधे उत्तम दर्जाची नसून ती चाचणीत अपयशी (drugs failed) ठरली आहेत, असे जाहीर करण्यात आले आहे.

या यादीमध्ये अमॉक्सिसिलिन, अपस्मारासाठी वापरले जाणारे गॅबापेंटिन, उच्च रक्तदाबासाठी वापरले जाणारे टेलमिसार्टन, मधुमेहासाठी ग्लिमेपिराइड आणि मेटफॉर्मिन आणि एचआयव्हीसाठी रिटोनावीर यासारख्या काही लोकप्रिय औषधांचा देखील समावेश आहे.

सीडीएससीओच्या म्हणण्यानुसार या यादीमध्ये औषधांव्यतिरिक्त वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधनांचा समावेश आहे. जी एकतर मानक दर्जाची नाहीत किंवा बनावट, भेसळयुक्त किंवा चुकीच्या ब्रँडचीले आहेत. मात्र, ध्वजांकित केलेली ही उत्पादने प्रमाणित दर्जाची नाहीत असे घोषित करण्यात आले.

PSU कर्नाटक अँटिबायोटिक्स आणि फार्मास्युटिकल्स, उत्तराखंड-आधारित सिनोकेम फार्मास्युटिकल्स, हरियाणा-आधारित नेस्टर फार्मास्युटिकल्स, उत्तर प्रदेश-आधारित JBJM पॅरेंटेरल्स, सोलन-आधारित रोनाम हेल्थकेअर आणि मुंबई स्थित ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्ससह ही औषधे खाजगी तसेच सार्वजनिक औषध निर्मात्यांद्वारे उत्पादित केली जातात.

दरम्यान, Abbott India Limited ने एक सार्वजनिक सूचना जारी केली आहे ज्यात असे म्हटले आहे की कंपनीने हायपोथायरॉईडीझमच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या थायरोनॉर्म टॅब्लेटची एक बॅच स्वेच्छेने परत मागवली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.