Health Tips : जाणून घ्या रोजच्या आहारातील पाच अशा पदार्थांबाबत ज्यांचे अयोग्य सेवन पडेल महागात; होऊ शकतात अनेक आजार

चांगल्या आरोग्यासाठी चांगलं, पौष्टिक अन्न जेवढं महत्वाचं आहे, तेवढीच महत्वाची आहे ती म्हणजे ते अन्न खाण्याची पद्धत. काही अन्नपदार्थ असे आहेत, जे आपण अनेकदा चुकीच्या पद्धतीने सेवन करतो.

Health Tips : जाणून घ्या रोजच्या आहारातील पाच अशा पदार्थांबाबत ज्यांचे अयोग्य सेवन पडेल महागात; होऊ शकतात अनेक आजार
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 1:34 PM

तुमचं शरीर (body) हे मंदिर असतं, हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकलं असेल. याचा अर्थ असा की आपलं शरीर केवळ आपलं नाही, तर ते ईश्वराचे आहे आणि त्यामुळेच ते चुकीच्या सवयी, अशुद्धता यांपासून मुक्त आणि शुद्ध ठेवलं पाहिजे. चांगलं पौष्टिक (good food) अन्न खाणं हे शरीरासाठी खूप गरजेचं आणि फायदेशीर असतं. जर आपण चांगले पदार्थ खाल्ले तर आपले आरोग्य, तब्येत चांगली व तंदुरुस्त (healythy) राहील आणि आपल्या मनातही चांगले विचार येतील.

व्यस्त जीवनशैली

मात्र ते अन्न खाण्याची पद्धतही (eating habits) तेवढीच महत्वाची असते. आपल्यापैकी अनेक जणांची जीवनशैली इतकी व्यस्त आणि खराब झाली आहे की, बरेच जण वेळेवर जेवण देखील करू शकत नाहीत. बरेचसे असे खाद्यपदार्थ आहेत, जे आपण चुकीच्या पद्धतीने खातो. आता तव्यावरून ताटात वाढलेली गरमागरम पोळी खायला कोणाला आवडत नाही ? पण ती खाण्याचीसुद्धा एक योग्य पद्धत असते, हे तुम्हाला माहीत आहे का ? आज आपण अशा 5 पदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे आपण चुकीच्या पद्धतीने सेवन करतो.

मध

मधाच्या नियमीत सेवनामुळे कफ आणि वताचा त्रास कमी होतो. मात्र मधाचे अत्याधिक सेवन केले तर पित्त वाढू शकते. मध उष्ण हवामानात खाल्ला जात नाही.  काही लोक वजन कमी करण्यासाठी मधाचा वापर करतात, पण तेही चुकीच्या पद्धतीने. गरम पाण्यात मध घालून ते पाणी पिणे तुमच्या आरोग्यसाठी धोकादयाक ठरू शकते. मध गरम पाण्यात मिसळल्यास तो विषारी बनू शकतो, त्यामुळे फायदा तर होणार नाहीच उलट आरोग्यसाठी धोकादायक ठरू शकते.

हे सुद्धा वाचा

पोळी

कधी पोळी खाल्यावर तुमच्या पोटात दुखले आहे का ? किंवा पोळी खाल्यावर तुमचे पोट खराब झाले आहे का ? बरेचसे लोक पोळी खाल्यानंतर पोटाशी संबंधित समस्या जाणवल्याची तक्रार करतात. त्याचे कारण आहे, पोळी अयोग्य पद्धतीन खाणे. पोळीसाठी कणीक मळल्यानंतर ती 5-10 मिनिटे मुरु द्यावी व त्यानंतर ती तव्यावर चांगली भाजावी, म्हणजे ती कच्ची राहात नाही. व पोटदुखीची समस्या उद्भवत नाही.

तिखट

जेवणात तिखट नसेल तर जेवणाला मजा येत नाही. तिखटाविना जेवणाची चव अधुरी असते. मात्र आपल्यापैकी काही जण खूप तिखट खातात, जेवणात मोठ्या प्रमाणात तिखटाचा वापर करतात. मात्र यामुळ तुमच्या पोटाचे नुकसान होते. तिखटाचे अधिक सेवन केल्यामुळे तुम्हाला पोटात अल्सर आणि पाइल्सचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे लाल तिखटाचा वापर कमी करावा किंवा त्याऐवजी हिरवी मिरची किंवा काळी मिरी वापरावी.

केळी

केळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात पोषक तत्वे असतात, त्याला स्वास्थ्यवर्धक फळ म्हटले जाते. ते बऱ्याच वेळेस, फ्रूटसॅलॅड, गोड पदार्थ किंवा शेकमध्ये वापरले जाते. तुम्ही बाजारातून केळी विकत घेताना कच्ची केळी घेता का ? मात्र अशी कच्ची केळी खाणे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं हे माहीत आहे का ? आपल्या शरीराला पिकलेल्या केळ्यांपेक्षा कच्ची केळी पचवण्यास जास्त वेळ लागतो. व त्यामुळे पचनसंस्थेवर ताण पडू शकतो. नियमितपणे कच्ची केळी खाल्यास ॲसिडिटी, ब्लोटिंग इत्यादी त्रास होऊ शकतात. त्यामुळे कच्ची केळी खाणे टाळावे.

कांदा

उपास करताना कांदा-लसूण खाणं, का वर्ज्य करतात हे तुम्हाला माहीत आहे का? कारण कांदा हा तामसिक प्रकृतीचा असतो. कांद्यामध्ये एल-ट्रिप्टोफॅन असते, ते एकप्रकारचे अमिनो ॲसिड असते, जे नैसर्गिक सेडेटिव्हच्या रुपात काम करते. त्यशिवाय अनेक भाज्यांमध्ये ग्रेव्हीमध्ये कांदा घालतात. तेलात परतलेला कांदा जास्त तेल शोषून घेतो आणि पोटात गेल्यावर ते तेल रिलीज करतो, जे तब्येतीसाठी हानिकारक असते. त्यामुळे कांदा हा कमी प्रमाणात आणि सॅलॅड स्वरूपात खाणे चांगले असते.

...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.