वेळेआधी म्हातारपण टाळण्याचे 6 उपाय, कोणत्या सवयी तुम्हाला तरुण ठेवतील पाहा
Prevent Premature Aging : आपल्या रोजच्या आहारविहारामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. व्यायाम टाळल्याने तसेच वाढते प्रदुषणाचाही आपल्या शरीरावर परिणाम होऊन आपण वेळेआधी म्हातारे दिसायला लागतो. त्यामुळे म्हातारपण टाळण्यासाठी पुढील दिलेले उपाय करायला हवेत...
मुंबई | 3 नोव्हेंबर 2022 : माणसाचे वय वेळेबरोबर वाढत असते. वयाबरोबर शरीरातील बदल हे सामान्य आहे. परंतू कधी-कधी वेळेआधीच वय वाढल्याची लक्षणं दिसू लागतात. यास वेळेआधी म्हातारपण म्हणतात. जेव्हा वयाबरोबर होणारे बदल आपल्याला वेगाने दिसू लागतात तेव्हा आपण वयाआधीच म्हातारे दिसू लागतो. याची कारणं सामान्यपणे पर्यावरण किंवा जीवनशैलीशी संबंधित असतात. वया आधीच म्हातारे होण्याला प्रिमेच्युर एजिंग म्हणतात. चेहऱ्यावर सुरकुत्या, एज स्पॉट्स, ड्रायनेस किंवा स्कीनच्या टोनमध्ये बदल ही लक्षणे दिसतात. वेळेआधी म्हातारपणाची लक्षणं, कारणं आणि यास रोखण्याचे उपाय पहा
प्रिमॅच्युअर एजिंगचे लक्षणं –
- प्रिमॅच्युअर एजिंगमुळे वेळेआधी शरीरावर त्याचा प्रभाव दिसू लागत असतो…
- त्वचेत बदल होतो, त्वचेवर सुरकत्या येतात, एज स्पॉट्स, ड्रायनेस किंवा स्किन टोन बदलतो, छातीजवळ हाइपर पिग्मेंटेशन आणि ढीलेपणा येतो
- केस गळतात किंवा पांढरे होतात
- चेहऱ्यामधील चरबी कमी होऊन गालफाडे खाली बसतात.
वयाआधी म्हातारपणाची सहा कारणे
उन्हात खुपवेळ रहाणे –
उन्हात खूप वेळ रहाल्याने त्वचेच्या समस्या होतात. अल्ट्रा व्हायलेट ( युव्ही ) किरणाने त्वचेवर वयाची लक्षणे दिसतात. याला फोटोएजिंग म्हणतात. ही त्वचेवर दिसणाऱ्या 90 टक्के बदलांना जबाबदार असते. स्मार्टफोनसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणातून निघणाऱ्या एचईव्ही स्कीनला नुकसान पोहचवतात.
स्मोकिंग –
स्मोकिंगमुळे सिगारेटमधील निकोटीनमुळे शरीरातील पेशींना नुकसान होते.
साखर आणि कार्बोहायड्रेट –
खूप जास्त साखर आणि प्रोसेस कार्बोहायड्रेट असलेल्या डाएटमुळे प्रिम्युचअर एजिंगला निमित्त मिळते
अल्कोहल –
जास्त मद्य प्राशन केल्याने स्कीन डीहायड्रेटेड होऊ शकते. वेळेआधी वय वाढू शकते.
अपुरी झोप –
झोपल्याने शरीरातील पेशींचे झीज भरुन निघते. अपुऱ्या झोपेचे शरीरावर परिणाम दिसतात. वेळेआधीच म्हातारपण दिसते.
तणाव –
तणावाने शरीरात ब्रेन कोर्टिसोल नावाचे हार्मोन द्रवते. ते त्वचेला मुलायम आणि जीवंत ठेवणाऱ्या हायल्यूरोनन सिंथेज आणि कोलेजनला ते रोखते.
वेळेआधी म्हातारपण टाळण्याचे 6 उपाय –
सनस्क्रीनचा वापर – प्रिम्युच्युअर एजिंगपासून वाचण्यापासून उन्हात फिरणे टाळावे. सनस्क्रीन क्रीमचा वापर करावा
स्मोकिंग – ध्रुमपान आणि मद्यपानापासून दूर रहावे, त्यामुळे वेळेआधी म्हातारपण टळेल
डायट – आहारात फळे आणि भाज्यांचा वापर करावा. खूप साखर किंवा रिफाईंड कार्बोहायड्रेट आहारा टाळावा.
व्यायाम – नियमित व्यायाम केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे त्वचा आरोग्यदायी रहाते.
स्किन केअर – त्वचेची काळजी घ्यायला हवी. नियमित त्वचा स्वच्छ ठेवावी. तसेच चांगल्या दर्जा स्किनकेअर प्रोडक्ट्स वापरावीत.
तणाव टाळावा – तणाव टाळल्याने आणि भरपूर झोप घेतल्याने वेळेआधी म्हातारपण टाळण्यास मदत होते.