तब्बल 7.5 कोटी वयोवृद्धांना गंभीर आजार, आई-वडिलांची काळजी घ्या!

LASI Result : 77 टक्के ज्येष्ठांना हायपरटेन्शन, 74 टक्के वृद्धांना हृदयासंबंधीचे आजार, 75 टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपाचा कॅन्सर

तब्बल 7.5 कोटी वयोवृद्धांना गंभीर आजार, आई-वडिलांची काळजी घ्या!
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 3:30 PM

नवी दिल्ली : देशातील तब्बल 7.5 कोटीहून अधिक वयोवृद्धांना (senior citizen) कुठल्या ना कुठल्या स्वरुपाचे गंभीर आजार असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाच्या (Health ministry) सर्वेक्षणातून समोर आलं आहे. लॉन्गिट्युडनल एजिंग स्टडी इन इंडिया ( The Longitudinal Ageing Study in India- LASI) या नावानं हा सर्व्हे करण्यात आला. अशाप्रकारे करण्यात आलेला हा जगातील सर्वात मोठा सर्व्हे असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 60 वर्षांवरील व्यक्तींचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. 2017-18 या वर्षात हा सर्व्हे करण्यात आला. ज्याचा पहिला भाग बुधवारी (6 जानेवारी 2021) प्रकाशित करण्यात आला. (75 million elderly in India suffer from some chronic disease- survey)

72 हजार वयोवृद्धांचा सर्व्हेत समावेश

सिक्कीम वगळता भारतातील सर्व राज्यातील वयोवृद्ध व्यक्तींचा या सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला. 45 वर्षांहुन अधिक वय असणाऱ्या 72,250 व्यक्तींचा यामध्ये समावेश होता. त्यातील 31,464 लोकांचं वय हे 60 वर्षांहून अधिक होतं. तर यातील 6,749 लोकांचं वय 75 वर्षांहून अधिक होतं.

25 टक्क्यांहुन अधिक वृद्धांना गंभीर आजार

देशातील तब्बल 25 टक्क्यांहून अधिक लोकांना जीवघेणे आजार असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. तर 40 टक्के वृद्ध कुठल्या ना कुठल्या अपंगत्त्वाचे बळी असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे. याशिवाय 20 टक्के वृद्ध व्यक्तींची मानसिक आजारांचे बळी आहेत. त्यामुळं वयोवृद्ध व्यक्तींची अधिक काळजी घेण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

वयोवृद्धांसाठी योजना बनवण्यासाठी अहवालाचा वापर

वयोवृद्धांवरील या अहवालाचा उपयोग योजना बनवण्यासाठी केला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली. या अहवालाद्वारे वृद्धांचा शारीरीक, मानसिक, आर्थिक, सामाजिक स्तरावर अभ्यास केला गेला. याचा उपयोग करुन वृद्धांसाठी योजना तयार केल्या जाणार आहेत. जगात आतापर्यंत करण्यात आलेला हा सर्वात मोठा सर्व्हे असल्याचं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

2050 पर्यंत देशात 31 कोटी वयोवृद्ध

2011 च्या जनगणनेनुसार देशात एकूण लोकसंख्येच्या 8.6 टक्के लोक 60 वर्षांहून अधिक वय असलेले होते. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांची संख्या 10.30 कोटी होती. म्हणजेच दरवर्षी ज्येष्ठ नागरिकांच्या संख्या 3 टक्क्यांची वाढ होत आहे. ही वाढ अशीच सुरु राहिली, तर 2050 पर्यंत भारतात तब्बल 31.90 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. त्यामुळं या नागरिकांसाठी विविध योजना तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.

कॅन्सरपासून ते मानसिक आजारांपर्यंत अनेक गंभीर आजार

ज्येष्ठ नागरिकांच्या तपासणीदरम्यान, त्यांना अनेक गंभीर आजार असल्याचं निदर्शनास आलं. अनेक वयोवृद्धांना हायपरटेन्शन, दृष्टीची समस्या, वजनवाढीची समस्या, कुपोषण, श्वासासंबंधीचे आजार असे अनेक आजार असल्याचं समोर आलं. गंभीर आजारांनी ज्यांना ग्रासलं आहे, त्यातील 77 टक्के लोकांना हायपरटेन्शन, 74 टक्के लोकांना हृदयासंबंधीचे आजार, 83 टक्के लोकांना मधुमेह, 72 टक्के लोकांना श्वासासंबंधीचे आजार, तर 75 टक्के लोकांना कुठल्या ना कुठल्या स्वरुपाचा कॅन्सर असल्याचं समोर आलं. याशिवाय 58 टक्के लोकांना स्ट्रोक, तर 56 टक्के ज्येष्ठांना संधीवाताचा त्रास असल्याचंही कळालं. याशिवाय 41 टक्के ज्येष्ठ नागरिक मानसिक आजारांना बळी पडल्याचंही या अहवालात सांगण्यात आलं आहे.

शहरातील ज्येष्ठ नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळतात. त्यांचं आरोग्य चांगलं राहतं, मात्र, ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची अजूनही वाणवा असल्याचं समोर आलं. शिवाय, सामाजिक सुरक्षेचा विचार केला तर छोटी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश वृद्धांसाठी अधिक सुरक्षित असल्याचं या सर्व्हेत समोर आलं आहे. मोठ्या राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक सुरक्षेकडे फार कमी लक्ष्य दिलं जात असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

Pain Killer Side Effect | शरीराला आतून पोखरतायत वेदनाशामक औषधे! जाणून घ्या कोणत्या गोळ्या शरीरासाठी हानिकारक…

गॅस-अॅसिडीटीची समस्या समजून दुर्लक्ष करताय? एका चुकीमुळे उद्भवू शकतो गंभीर आजार…

Angioplasty | ‘अँजियोप्लास्टी’ म्हणजे नेमके काय?, उपचारानंतर ‘या’ गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे!

 

(75 million elderly in India suffer from some chronic disease- survey)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.