Kissing day : तुमच्या अनेक शारीरिक समस्यांवर उपचार ठरू शकतो जोडीदारानं दिलेला एक ‘किस’… जाणून घ्या, आरोग्यासाठी चुंबनाचे फायदे!
The health benefits of kissing : 6 जुलै रोजी चुंबन दिन साजरा केला जातो. निरोगी नातेसंबंध आणि चुंबनाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय चुंबन दिन साजरा केला जातो. जाणून घेऊ या, आरोग्य समस्यांवर कशा प्रकारे फायदेशीर ठरतात जोडीदाराचे चुंबन.
The health benefits of kissing : 6 जुलै रोजी जागतिक ‘किस डे’ (World Kiss Day) साजरा केला जातो. निरोगी नातेसंबंध आणि किसींगचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय चुंबन दिन साजरा केला जातो. किस हे भावनांच्या अभिव्यक्तीचे एक सुंदर माध्यम आहे. ‘किस’ केल्याने नात्यात प्रेम आणि आसक्ती (Love and attachment) तर वाढतेच पण त्याचबरोबर काही आरोग्यदायी फायदेही होतात. ‘किस’ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ज्यामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या कमी होऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, किस करताना चेहऱ्याचे ३४ स्नायू आणि शरीराचे 112 पोश्चर स्नायू सक्रिय होतात. यामुळे स्नायू घट्ट आणि टोन्ड राहतात. किस केल्याने चेहऱ्यातील रक्ताभिसरण (Circulation in the face) वाढते, ज्यामुळे त्वचा तरूण आणि सुंदर दिसते. किस वृद्धत्व रोखण्यासाठी आणि शारीरिक समस्यांवर उपचार करण्यासाठी कार्य करते. जागतिक किस डे निमित्त जाणून घ्या किसींगचे आरोग्याला काय फायदे होतात.
‘किस डे’ चा इतिहास आणि महत्त्व
‘किस डे’ दरवर्षी 06 जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस जोडप्यांसाठी खूप खास असतो. किसिंग डे वर्षातून दोनदा साजरा केला जातो. 13 फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन वीकमध्ये फेब्रुवारी महिन्यात किसिंग डे देखील साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय चुंबन दिवस पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये सुरू झाला.
‘किस’ रोग प्रतिकारशक्ती वाढवते
किस केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 2014मध्ये मायक्रोबायोम जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालानुसार, ओठांवर चुंबन घेताना जोडीदाराची लाळ एकमेकांना हस्तांतरित केली जाते. लाळेमध्ये काही विशिष्ट जंतू असतात, ज्यांच्या संपर्कात आल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. किस केल्याने शरीरात पोहोचलेल्या या जंतूमुळे भविष्यातील आजारांचा धोका कमी होतो.
‘किस’ तणाव दूर करते
किसींगमुळे नैराश्य आणि तणावही कमी होतो. कॉर्टिसॉल या संप्रेरकामुळे मानवामध्ये तणाव वाढतो. पण जेव्हा लोक एकमेकांना किस घेतात, मिठी मारतात किंवा प्रेम व्यक्त करतात तेव्हा मेंदूतील कोर्टिसोलची पातळी कमी होऊ लागते. हे ऑक्सीटोसिन हार्मोन सोडते, ज्यामुळे तणाव कमी होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, किस मूड रिफ्रेश करते.
हाय बीपीच्या तक्रारी कमी होतात
उच्च रक्तदाबाच्या तक्रारी असलेल्या लोकांसाठी किस एक प्रभावी उपचार असू शकते. किसींग तज्ज्ञ आणि लेखिका एंड्रिया डिमर्जियान यांच्या मते, जेव्हा लोक किस घेतात तेव्हा त्यांच्या हृदयाची गती वाढू लागते. त्यामुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि रक्तप्रवाह चांगला होतो, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
कोलेस्टेरॉल कमी करते
किस केल्याने सीरम कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी होऊ शकते. हृदयरोग आणि स्ट्रोकच्या जोखमीपासून आराम मिळवण्यासाठी किस फायदेशीर आहे.