Bones : थोडासा धक्काही मोडू शकतो तुमची हाडे! हाडांच्या मजबूतीसाठी ‘या’ गोष्टी करत असाल तर तुम्ही चुकताय

शरीराला बळकटी देणारी हाडांची मजबूत रचना कधीकधी कमकुवत होते.

Bones : थोडासा धक्काही मोडू शकतो तुमची हाडे! हाडांच्या मजबूतीसाठी 'या' गोष्टी करत असाल तर तुम्ही चुकताय
हाडांची काळजी घ्या...Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 1:23 PM

लोक हाडांशी संबंधित समस्यांना किरकोळ वेदना किंवा अस्वस्थता मानतात, जोपर्यंत वेदना तीव्र होत नाही आणि डॉक्टर चाचण्या करण्यास सांगत नाहीत. तोवर वेदना होत असतानाही लोक वेदनाशामक औषधे (Analgesics) घेऊन किंवा बाम वगैरे लावून दीर्घकाळ काम करत असतात. यामुळे हाडांची समस्या (Bone problems) वाढून भविष्यात गंभीर स्वरूप धारण करते. सुरुवातीपासूनच आरोग्याविषयी जागरूकता ठेवणे ही दीर्घायुष्याची आणि उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. बहुतेक लोक आयुष्याच्या सुरुवातीच्या कालावधीला गांभीर्याने (Seriously) घेत नाहीत. परंतु तसे करू नये. लहानपणापासूनच हाडांच्या मजबूतीसाठी प्रयत्नशील राहावे. कारण, हीच ती वेळ असते, जेव्हा तुम्ही भविष्यासाठी मजबूत आणि निरोगी शरीराचा पाया घालू शकता. त्यामुळे मुलांना पुरेशा प्रमाणात कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि खनिजे खाण्याची, व्यायाम, खेळणे आणि वेळेवर झोपण्याची सवय लावा. या सवयींमुळे हाडे आणि सांधे दीर्घकाळ निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होईल.

थोडासा धक्काही मोडू शकतो हाडे

हाडे ठिसूळ किंवा अधिक कमकुवत झाल्यास, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसची समस्या उद्भवू शकते, तर अधिक दाट (घट्ट) हाडे असण्याने देखील ऑस्टियोपेट्रोसिस नावाची समस्या उद्भवू शकते. हाडे अधिक ठिसूळ असल्यास ते सहजपणे तुटू शकतात, जर ते अधिक दाट असतील तर त्यांना समान धोका असतो. जाड किंवा दाट हाडे याचा अर्थ असा नाही की ते मजबूत आहेत. महिला आणि वृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता जास्त असते. विशेषतः स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती दरम्यान किंवा नंतर. यामुळे नितंब, कंबर किंवा मनगटाचे हाड तुटण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच डॉक्टर तुमची हाडांची घनता तपासतात. यावर वेळीच प्रतिबंध केला नाही तर थोडासा धक्काही हाड मोडू शकतो.

वेदना आणि त्रास

दुसरीकडे, ऑस्टियोपेट्रोसिस हाडांमधील मज्जांवर परिणाम करू शकतो, ज्यामुळे शरीराला संसर्गाशी लढा देणे, ऑक्सिजन वितरित करणे आणि रक्तस्त्राव थांबवणे कठीण होते. याशिवाय, ऑस्टिओनेक्रोसिसच्या स्थितीत, हाडांपर्यंत पुरेसे रक्त पोहोचले नाही तर त्रास होऊ शकतो. ही समस्या प्रामुख्याने मांड्या, हात, गुडघे आणि खांद्यामध्ये होऊ शकते. यामुळे वेदना आणि चालण्यात त्रास होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

थायरॉईडचे अतिउत्पादन

हार्मोनल असंतुलन जसे की, थायरॉईडचे अतिउत्पादन देखील हाडांच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. हाडांना इजा होण्याबरोबरच, दिवसभर थकवा, वेदना, थरथर, निद्रानाश यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात, ज्याचा परिणाम हाडांवर देखील होतो. थायरॉईडची ही समस्या वेळीच आटोक्यात आली नाही तर ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढू शकते.

या गोष्टींची काळजी घ्या

मसाज करू नका – डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मसाज करू नका, थंड-गरम कॉम्प्रेस जास्त करू नका. कधीकधी चुकीच्या पद्धतीने मसाज केल्याने हाडांना अधिक धोका निर्माण होतो. त्याच वेळी, थंड-गरम कॉम्प्रेससाठी एक वैज्ञानिक आधार आहे. हे प्रत्येक दुखापतीवर किंवा दुखापतीला लागू होत नाही.

विनाकारण पेनकिलर खाणे टाळा – वेदनाशामक औषधांचे जास्त प्रमाणात आणि दीर्घकाळ सेवन केल्याने शरीराला गंभीर हानी होऊ शकते. त्यामुळे हाडे, सांधे दुखत असतील तर प्रथम डॉक्टरांना विचारा.

जीवनशैलीतील बदल – पुरेसा पोषण आणि अभाव यामुळे बहुतांश समस्यांवर प्राथमिक अवस्थेत उपचार करता येतात. नियमित व्यायामाने नियंत्रण ठेवता येते. म्हणून, समस्या टाळू नका, परंतु वेळेवर आणि पूर्ण उपचार घ्या. लक्षात ठेवा की वेदना नियंत्रित करण्याबरोबरच, तुम्हाला समस्या सोडवायची आहे आणि त्यासाठी वेळ लागतो, म्हणून धीर धरा.

सेकंड ओपिनियन – डॉक्टरांनी तुम्हाला कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया किंवा इंजेक्शन देण्यास सांगितले तर प्रथम त्याविषयीची सर्व माहिती गोळा करा. याचा तुमच्या सध्याच्या शारीरिक स्थितीवर कसा परिणाम होईल ते शोधा. सेकंड ओपिनियन घेण्यात काहीच गैर नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.