लहान मुलांसाठी नाकावाटे दिली जाणारी लस ठरणार ‘गेमचेंजर’; डब्ल्यूएचओच्या वैज्ञानिकांनी केला दावा
लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न तिसऱ्या लाटेत ऐरणीवर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्राने सध्या लहान मुलांना कोरोना संसर्गापासून कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. (A nasal vaccine for children will be a 'game changer'; WHO scientists claim)
नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. नियमित रुग्णसंख्या तीन-चार लाखांवरून दोन लाखांपर्यंत खाली आली आहे. मात्र देशातून कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. त्यामुळे कोरोनाच्या संकट दूर झालेले नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी आपल्यापुढे तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या लाटेत सर्वाधिक रुग्णांचे प्रमाण हे लहान मुले आणि तरुण मंडळींतील असेल. अर्थात लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न तिसऱ्या लाटेत ऐरणीवर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्राने सध्या लहान मुलांना कोरोना संसर्गापासून कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मुलांना नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबत भाष्य केले आहे. (A nasal vaccine for children will be a ‘game changer’; WHO scientists claim)
ही लस कोरोना महामारीत ठरणार गेमचेंजर
डब्ल्यूएचओचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी मुलांना नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबत आजच दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलांना नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसींची सध्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलची टेस्टिंग सुरू आहे. ही लस भारत आणि जगभरात कोरोना महामारीविरोधातील लढ्यात गेमचेंजर ठरू शकणार आहे. मात्र ही लस चालू वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही. सध्या तिसऱ्या लाटेत मुलांना आणि तरुण मंडळींना संसर्गाचा धोका अधिक असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर या लसीची प्रतिक्षा केली जात असली तरी ही लस प्रत्यक्ष उपलब्ध होण्यासाठी पुढील वर्षच उजाडणार असल्याची शक्यता आहे.
नाकावाटे दिली जाणारी लस नेमकी कशी आहे?
नाकाची लस ही नाकावाटे दिली जाते. यात सुईची गरज नसते. कोरोनाच्या रुग्णांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास एक नाकाची लस ही रेस्पिरेटरी पॅसेजमधील संक्रमणाच्या जागेवर इम्युनिटी पॉवर उत्पन्न करण्यास सक्षम आहे. लहान मुलांच्या संक्रमणाच्या बाबतीत कोरोना संसर्ग आणि ट्रान्समिशन दोन्ही रोखण्यासाठी आवश्यक आहे.
भारतात तयार केल्या जात आहेत या लसी
हैदराबादस्थित भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन कोविड लस तयार केली आहे. याव्यतिरिक्त वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन (डब्ल्यूयूएसएम) च्या मदतीने मुलांसाठी बीबीव्ही 154 ही नाकाची लससुद्धा विकसित केली जात आहे. ही लस पहिल्या टप्प्यातील चाचणीदरम्यान यशस्वी झाल्याची माहिती मिळाली होती. नाकाच्या लसीनंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची चाचणी चालू आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) न्यूयॉर्क येथील लस उत्पादक कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीने इंट्रासेल कोव्ही-व्हीएसी कोविड लसची कार्यक्षमता तपास आहे. दरम्यान, जगात अंतिमत: लहान मुलांसाठी लस दिली जाणार आहे. कम्युनिटी स्प्रेड कमी झाल्यानंतर आपल्याला शाळा उघडल्या पाहिजेत, असे डब्ल्यूएचओच्या मुख्य वैज्ञानिक स्वामीनाथन यांनी म्हटले आहे. (A nasal vaccine for children will be a ‘game changer’; WHO scientists claim)
MHA Recruitment 2021: गृह मंत्रालयात लॉ ऑफिसर आणि अकाउंट्स ऑफिसरसह अन्य पदांवर भरती, आजच अर्ज करा#MHARecruitment2021 #MinistryofHomeAffairsRecruitment2021 #LawOfficerGradeI #LawOfficerGrade2https://t.co/znQKUQtRCh
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 23, 2021
इतर बातम्या
‘या’ इलेक्ट्रिक सायकलसमोर ऑटो फेल, एकदा चार्ज केल्यावर 100 किमी धावणार
PHOTO | World’s Largest Aquariums : जगातील सर्वात मोठे आणि लोकप्रिय 5 मत्स्यालय