कमाल आहे, येथे डेडबॉडीला हाथ न लावताच होते पोस्टमार्टेम, लागतात केवळ इतकी मिनिटे
वर्च्युअल ऑटोप्सी एक रेडीओलॉजिक प्रोसेस आहे. यात डोळ्यांनी न दिसणाऱ्या जखमा, रक्तातील गाठींचाही पत्ता लागतो. यात मृतदेहाची कोणतीही हेळसांड न होता खूप कमी वेळात पोस्टमार्टेम केले जाते.
नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : समजा एखाद्या अपघातात किंवा अन्य कोणत्या घटनात कोणाचा मृत्यू झाला तर मृत्यूचे कारण जाणण्यासाठी डेडबॉडीचे पोस्टमार्टेम करावे लागते. या प्रक्रियेत मृत शरीराची चिरफाड केली जाते. तसेच शरीरातील अवयवाची तपासणी केली जात असते. त्यातून तपासणी अंती मृत्यूचे नेमके कारण समजण्यास मदत होत असते. या प्रक्रीयेला ऑटोप्सी देखील म्हटले जात असते. या प्रक्रियेत शरीराच्या मध्यभागी मोठी छेद केला जातो. या प्रक्रीयेला तीन तासांहून अधिक वेळ लागतो. परंतू देशात एक जागा अशी आहे. जेथे मृत शरीराला कोणतीही चिरफाड न करता पोस्टमार्टेम केले जाते. कोणत्या ठिकाणी अशी सोय आहे ती पाहूयात….
दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलातील फॉरेन्सिक विभागात आधुनिक पद्धतीने मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली जाते. या आधुनिक प्रक्रीयेने अवघ्या अर्ध्या तासात पोस्टमार्टेम केले जात आहे. डेडबॉडीची कोणतीही चिरफाड न करता एम्सच्या फोरेन्सिक विभागात पोस्टमार्टेम केले जात असल्याचे फोरेन्सिक विभागाचे एचओडी डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले. या तंत्राला वर्च्युअल ऑटोप्सी असे म्हटले जाते. यात स्कॅन मशिनद्वारे मृतदेहाची संपूर्ण तपासणी केली जाते.
या आधुनिक प्रक्रीयेत शरीराला चिरफाड करण्याची गरज लागत नाही. हायटेक एक्सरे आणि एमआरआय मशीनने शरीराला स्कॅन केले जाते. त्यातून मृत्यूच्या कारणांचा छडा लावणे सोपे होते. या प्रक्रियेत बॉडीला स्पर्श न करता पोस्टमार्टेम होतो. शरीराला झालेल्या छोट्या जखमे पासून ते मायनर फॅक्चर देखील यात समजते. या प्रक्रियेला मृताचे नातेवाईक देखील सहमती देतात. काही वेळेत मृत्यूच्या कारणांचा छडा लावला जातो.
रेडीओलॉजिकल प्रक्रीया
वर्च्युअल ऑटोप्सी एक रेडीओलॉजिक प्रोसेस आहे. यात डोळ्यांनी न दिसणाऱ्या जखमा, रक्तातील गाठींचाही पत्ता लागतो. यात डेडबॉडीला मशिनच्या समोर ठेवले जाते. मशिन अर्धा तास बॉडीला स्कॅन करते आणि आतील अवयवाची माहीती मिळते.या प्रक्रीयेत डॉक्टर मशीनवर लक्ष ठेवून असतात. आणि तपासणीचा डाटा गोळा करुन त्याचे विश्लेषण करतात.
दिल्लीतील एम्समध्येच ही सुविधा
आशियात केवळ दिल्लीतील एम्स रुग्णालयातच ही सुविधा आहे. आयसीएमआर आणि एम्स यांनी मिळून वर्च्युअल ऑटोप्सी सुविधा सुरु केली आहे. आतापर्यंत अनेक मृतांचे पोस्टमार्टेम येथे झाले आहे. अनेक वर्षांपासून एम्समध्ये ही सुविधा आहे. आयसीएमआरने यासाठी पाच कोटीचा निधी दिला होता. सध्या एम्समध्ये ही सुविधा आहे. लवकरच दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात ही सुविधा सुरु करण्याची सरकारची योजना आहे.