अजबच आहे… या तरूणीला जडलाय विचित्र आजार; जराही हसली की लगेच झोपते… काय आहे प्रकरण ?

ब्रिटनमधील एक 24 वर्षीय ब्रिटीश तरूणीसाठी हसणे अतिशय मुश्किल झाले आहे. कारण ती जराही हसली तर लगेच झोपते.

अजबच आहे... या तरूणीला जडलाय विचित्र आजार; जराही हसली की लगेच झोपते... काय आहे प्रकरण ?
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 3:06 PM

नवी दिल्ली : एक 24 वर्षीय ब्रिटीश तरूणी स्त्री नार्कोलेप्सीशी (Narcolepsy) झुंज देत आहे. हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये त्या तरूणीला हसल्यावर लगेचच झोप येते. बेला किलमार्टिन असे तिचे नाव असून ती बर्मिंगहॅम येथील रहिवासी आहे. हसल्यावर झोप येण्याची सवय खूप विचित्र आहे. एकदा तर नाइटक्लबमध्ये पार्टी (nightclub) करताना झोपली आणि दुसऱ्या वेळेस याच सवयीमुळे ती स्विमिंगपूलमध्ये (झोप लागल्याने) बुडता बुडता (almost drowned) वाचली.

आढळून आला नार्कोलेप्सीचा आजार

किशोरवयीन असताना बेलाला नार्कोलेप्सी म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थितीचे निदान झाले. ती एक फार्मासिस्ट म्हणून काम करते. तिला कॅटप्लेक्सीचा देखील त्रास होतो, ही एक अशी स्थिती आहे जिथे हसण्यासारख्या स्ट्रॉंग इमोशन्समुळे तिचे स्नायू अचानक कमकुवत होतात. ‘मला एखादी गोष्ट गमतीदार वाटत नसते, तेव्हाच हा (त्रास) प्रकार जास्त होतो. छोटेसे हास्य किंवा त्यापेक्षा जास्त हसल्यावर ही स्थिती उद्भवते. माझ्या सर्व स्नायूंवरचे नियंत्रणच हरवते,’ असे बेलाने द सन या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. अशा वेळी मला तंद्री लागण्याची सर्व लक्षणे जाणवतात आणि मी झोपते तेव्हाही आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची मला जाणीव असते, असेही बेलाने नमूद केले.

माझ्या गुडघ्यातील शक्ती जाते असे जाणवते आणि माझं डोकंही कलंडतं. त्यावेळी मी शुद्धीवर तर असते आणि आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टींचीही मला जाणीव असते, पण मी (इच्छा असूनही) माझं शरीर मात्र हलवू शकत नाही. बऱ्याच वेळेस असं झालयं की (अशा स्थितीत) चहाचा कप माझ्या अंगावर सांडलाय, चहाचे ओघोळ मला जाणवतात, पण तरीही मी माझा हातही हलवू शकले नाही, असा अनुभवही बेलाने सांगितला आहे.

हे कधी, कुठे, कसं घडले यावर माझा काही कंट्रोल नाही, त्यामुळे थोडी भीतीच वाटते. मी एखाद्या सुरक्षित जागी असताना (उदा- एका जागी बसलेली असताना) असं झालं तर काही वाटत नाही, पण सुरक्षित जागी नसेन तर मला खूपच भीती वाटते, असंही बेला म्हणाली.

निदानानंतर कसं होतं आयुष्य ?

2015 मध्ये तिचे निदान झाल्यापासून, बेलाने एका विशेषज्ञला भेटायला सुरुवात केली, ज्यांना आढळले की तिला देखील कॅटॅप्लेक्सीशी जोडलेली स्थिती आहे. बेलाने स्वतःला या स्थितीशी जुळवून घेतले आहे, ज्यावर उपचार नाही परंतु जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने ते व्यवस्थापित केली जाऊ शकते. त्यामुळे बेला गाडी चालवत नाही आणि स्विमिंग पूलमध्ये जाणेही पूर्णपणे टाळते.

नार्कोलेप्सी म्हणजे काय ?

नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या म्हणण्यानुसार, नार्कोलेप्सीमध्ये, एखाद्या व्यक्तीला कधी उठायचे किंवा झोपायचे हे निवडता येत नाही, कारण त्यांचा मेंदू स्नूझिंग पॅटर्नचे नियमन करू शकत नाही.

त्याचे जाणवणारे परिणाम :

– दिवसा जास्त झोप लागणे आणि सतत तंद्री जाणवणे

– झोपेचा ॲटॅक येणे

– Cataplexy, (स्नायूंवरील नियंत्रण काही काळासाठी सुटणे)

– स्लीप पॅरालिसिस

– रात्री झोपेत चालणे

आरोग्य तज्ञांच्या मते, नार्कोलेप्सीमुळे कोणतीही गंभीर किंवा दीर्घकालीन शारीरिक आरोग्य समस्या उद्भवत नाही परंतु त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर आणि भावनिक स्थितीवरही महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की , मेंदूतील ओरेक्सिन किंवा हायपोक्रेटिन या रसायनाच्या कमतरतेमुळे नार्कोलेप्सी होते जे जागृततेचे नियमन करते. एक ऑटोइम्यून डिसऑर्डर असल्याने, रोगप्रतिकारक प्रणाली चुकून ते तयार करणार्‍या पेशींवर किंवा रिसेप्टर्सवर हल्ला करते ज्यामुळे ते कार्य करू देते.

तथापि, नार्कोलेप्सीच्या सर्व प्रकरणांचे स्पष्टीकरण देत नाही आणि या समस्येचे नेमके कारण अनेकदा अस्पष्ट आहे.

मात्र, हार्मोनल बदल, मानसिक ताण आणि स्वाइन फ्लू सारखे संक्रमण यासारख्या घटकांमुळे ते ट्रिगर होते.

उपचार

नार्कोलेप्सीवर सध्या कोणताही इलाज नसला तरीही जीवनशैलीतील काही बदल मदत करू शकतात, त्यापैकी काहींचा समावेश आहे :

– तुमच्या झोपण्याच्या सवयी सुधारणे

– औषधे घेतल्याने परिणाम कमी होण्यास मदत होते.

– दिवसभरात थोड्या वेळाने छोटी डुलकी काढणे

– झोपण्याची वेळ काटेकोरपणे पाळणे

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.