आधार कार्ड नसेल तर कोरोना लस मिळणार नाही? UIDAI चे स्पष्टीकरण
आधारचा गैरवापर कोणतीही आवश्यक सेवा नाकारण्यासाठी करू नये, असे स्पष्टीकरण युआयडीएआयने (UIDAI) दिले आहे. (Aadhaar not mandatory for Covid-19 treatment)
मुंबई : आधारकार्ड (Aadhaar) हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. आधार कार्ड हे भारतीय नागरिकांचे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. कोरोना काळात लस (Vaccine) घेण्यापासून रुग्णालयात भरती (Medicine) होण्यासाठी आधार कार्ड गरजेचे असते. मात्र आधारकार्ड नसल्याने कोणीही लस, औषधोपचार, इस्पितळात किंवा उपचारास नकार देऊ शकत नाही. आधारचा गैरवापर कोणतीही आवश्यक सेवा नाकारण्यासाठी करू नये, असे स्पष्टीकरण यूआयडीएआयने (UIDAI) दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे विधान अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. (Aadhaar not mandatory for Covid-19 treatment and vaccine Said UIDAI)
आधार कार्डशिवाय कोरोना लस मिळणार
UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधारने नुकतंच Exception handling mechanism (EHM) यंत्रणा तयार केली आहे. यात 12 अंकी बायोमेट्रीक आयडी नसतानाही सेवा देण्याची सुविधा असेल. जर कोणत्याही रहिवाशांकडे एखाद्या कारणात्सव त्याचे आधार कार्ड नसेल, तरीही त्याला आधार कायद्यानुसार आवश्यक सेवा नाकरता येणार नाही. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरीही कोरोना लस, औषधे आणि रुग्णालयात भरतीही होता येईल.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आधार नसल्यामुळे काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला जात होता. तसेच अनेकांना अत्यावश्यक सेवाही नाकारल्या जात होते, असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. यानंतर आधारने हा निर्णय घेतला आहे.
सेवा नाकारल्यास तक्रार करा
यानुसार जर कोणाकडे आधार कार्ड नसेल किंवा काही कारणास्तव आधारची ऑनलाईन पडताळणी यशस्वी होत नसेल तर संबंधित एजन्सी किंवा विभागास आधार अधिनियम, 2016 मध्ये नमूद केलेल्या विशिष्ट निकषानुसार त्याला सेवा द्यावी लागेल. तसेच जर एखाद्या रुग्णाला अशाप्रकारची सेवा नाकारली गेली किंवा लाभ देण्यात आला नाही, तर संबंधित विभागांच्या उच्च अधिकाऱ्याला ही बाब निदर्शनास आणून द्यावी, असेही यूआयडीएआयने नमूद केले आहे.
आधार कार्ड का गरजेचे?
यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, आधार हे केवळ जबाबदारी आणि जबाबदारीच्या सेवेसाठी आवश्यक आहे. आधारमुळे कोणाच्याही आवश्यक सेवांवर परिणाम होऊ नये, असे परिपत्रक 24 ऑक्टोबर 2017 रोजी जारी केले होते. (Aadhaar not mandatory for Covid-19 treatment and vaccine Said UIDAI)
संबंधित बातम्या :
UAN नंबर ॲक्टिव्हेट करण्याची सोपी पद्धत, काही वेळामध्ये चेक करा तुमचा पीएफ बॅलन्स
कोरोना काळात PF खाते ठरणार मदतगार, आठवड्याभरात खात्यात ‘एवढे’ येणार पैसे