Good Habits | पालकांनो, मुलांना ‘सक्रिय श्रोता’ बनवण्याकडे लक्ष द्या, व्यक्तिमत्व विकासासाठी ठरेल फायदेशीर!

प्राथमिक टप्प्यात सर्वांगिण विकासासाठी त्यांनी कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक ऐकावी आणि ती अंमलात आणावी, ही सवय मुलांना लावली पाहिजे.

Good Habits | पालकांनो, मुलांना ‘सक्रिय श्रोता’ बनवण्याकडे लक्ष द्या, व्यक्तिमत्व विकासासाठी ठरेल फायदेशीर!
अॅक्टिव लिसनिंग
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 6:20 PM

मुंबई : ‘ऐकणे’ हा काहीही शिकण्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे. ही गोष्ट तेव्हा जास्त लक्षात येते जेव्हा पालक आपल्या मुलांविषयी बोलतात. असे बरेचदा पाहिले गेले आहे की, काही मुलं काहीही ऐकून न घेता त्या गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ लागतात आणि काहीतरी नवीन शिकण्याऐवजी तो आपल्या कामापासूनच विचलित होतात. प्राथमिक टप्प्यात सर्वांगिण विकासासाठी त्यांनी कोणतीही गोष्ट काळजीपूर्वक ऐकावी आणि ती अंमलात आणावी, ही सवय मुलांना लावली पाहिजे (Active Listing Habit is necessary for child’s personality development).

जेव्हा मुलं काहीही ऐकत नाही, तेव्हा ते जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करणार नाहीत. किंवा असेही म्हणता येईल की, संपूर्ण गोष्ट योग्यप्रकारे न ऐकल्यामुळे, पालक किंवा शिक्षकांनी काय सांगितले ते त्यांना समजू शकणार नाही. पालक आणि शिक्षकांकडे दुर्लक्ष केल्यास वर्गात मुलाची कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते आणि ते इतर मुलांपेक्षा मागे राहू शकतात. म्हणूनच मुलांना ‘सक्रिय श्रोते’ (Active Listning) बनवणे गरजेचे आहे.

मुलांच्या विकासासाठी ऐकण्याची सवय इतर कौशल्यांइतकीच महत्त्वाची असते, जसे की समस्या सोडवण्याच्या सवयी, नेतृत्व आणि कार्यसंघ हे गुण देखील असेच वाढतात. अॅक्टिव लिसनिंग हे एक कौशल्य आहे, जे हळूहळू विकसित केले जाऊ शकते. परंतु, यासाठी वेळ आणि धैर्य आवश्यक आहे. सक्रिय ऐकणे म्हणजे काय आणि मुलांना सक्रिय श्रोते बनवणे का महत्वाचे आहे, ते जाणून घेऊया…

अॅक्टिव लिसनिंग म्हणजे काय?

अॅक्टिव लिसनिंग म्हणजे स्पीकरच्या संपूर्ण गोष्टींकडे लक्ष देणे आणि त्याने ज्या गोष्टी बोलल्या आहेत, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणे. एक सक्रिय श्रोता तोच आहे, जो कोणत्याही चर्चेत सकारात्मक भाग घेतो, जे ऐकले त्याची आठवण ठेवतो आणि कुतूहलने त्याच्याविषयी प्रश्न विचारतो. अॅक्टिव लिसनिंगमध्ये सकारात्मक संप्रेषणास प्रोत्साहित करणे देखील समाविष्ट आहे. याचा अर्थ असा आहे की दुसर्‍या व्यक्तीचे शब्द ऐकून, समजून त्याची आपल्या शब्दात पुनरावृत्ती करणे (Active Listing Habit is necessary for child’s personality development).

अॅक्टिव लिसनिंगची सवय मुलांसाठी का महत्त्वाची आहे?

मुलाच्या संपूर्ण विकासासाठी, अॅक्टिव लिसनिंगची सवय असणे खूप महत्वाचे आहे. मूल जेव्हा अॅक्टिव लिसनर असेल, तरच तो एक चांगला संवादक, तसेच समस्या सोडवणारा बनू शकतो. अॅक्टिव लिसनर असणारे मूल सर्वत्र आघाडीवर राहते. सक्रिय श्रोता असण्याचे बरेच फायदे आहेत.

कोणत्याही गोष्टीत गैरसमज नसणे

जेव्हा मुल एखाद्याचे म्हणणे सहजपणे ऐकतो तेव्हा त्याला कोणत्याही प्रकारची शंका किंवा गैरसमज नसतो आणि तो ऐकलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे अंमलात आणू शकतो.

कार्यक्षमता वाढते

अॅक्टिव लिसनर कोणतीही कामे अधिक चांगल्या प्रकारे करतात आणि त्या कामात देखील त्यांना रस असतो. कारण, त्याने ती गोष्ट योग्यरित्या ऐकलेली असते.

आत्मविश्वास पातळी वाढते

अॅक्टिव लिसनरला खूप आत्मविश्वास वाटतो. कारण तो जाणतो की आपण जे करत आहे ते बरोबर आहे. कारण, त्याने त्या कार्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचना ऐकल्या आहेत आणि त्यांचे पालन केले आहे.

आत्मनिर्भरता वाढते

एक क्रियाशील श्रोता प्रत्येक कार्य उत्तम प्रकारे पार पाडण्याची क्षमता असल्यामुळे पूर्णपणे आत्मनिर्भर होतो (Active Listing Habit is necessary for child’s personality development).

मुलांसाठी अॅक्टिव लिसनिंगचे उपक्रम :

त्यांची पूर्ण काळजी घ्या

जेव्हा मुले आपले ऐकतात, तेव्हा त्यांना आपल्याकडे पाहण्यास प्रोत्साहित करा. आपल्याकडे त्यांचे लक्ष केंद्रित करणे अॅक्टिव लिसनिंगसाठी आवश्यक आहे.

अॅक्टिव्हीटी तयार करा

मुलाबरोबर संवादात्मक क्रिया करा, जसे की एखादी गोष्ट सांगताना मधेच थांबा आणि कथेमध्ये पुढे काय घडू शकते असे मुलाला विचार. तसेच, त्यांना ऐकलेल्या कथेचे वर्णन विचारा.

कथा तयार करणारे गेम खेळा

ऐकण्याची ही सवय कायम ठेवणे चांगले आहे. आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासह देखील हा खेळ खेळू शकता. घरातल्या सर्व लोकांनी एक कथा बनवावी, ज्यामध्ये प्रत्येकाला एक एक ओळ घेऊन पुढील कथा तयार करण्यास आणि ऐकण्यास सांगावे.

त्यांचा शब्दसंग्रह सुधारण्यास मदत करा

मुले त्याच शब्दावर अडकतात, जे त्यांना समजत नाहीत. अशावेळी त्यांना त्याचा अर्थ सांगून मुलांचा शब्दसंग्रह वाढवण्यात मदत करा. यासाठी आपण पुस्तके, ऑनलाइन अ‍ॅप, चार्ट इत्यादींचा वापर करू शकता.

 आपण देखील एक चांगले श्रोता व्हा!

मुलास अॅक्टिव लिसनर बनवण्यासाठी, आपण देखील एक चांगला श्रोता असणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच मुलांच्या गोष्टी नेहमी काळजीपूर्वक ऐका आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा.  या मुख्य गोष्टी लक्षात घेऊन आपण आपल्या मुलांमध्ये ऐकण्याच्या सवयी अधिक वाढवू शकता. जेणेकरून आपल्या मुलास आत्मविश्वास येईल आणि त्यांच्या कामगिरीत सुधारणा होईल.

(Active Listing Habit is necessary for child’s personality development)

हेही वाचा :

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.