Kidney Infection : अभिनेत्री शिवांगी जोशी किडनी इन्फेक्शनने त्रस्त, तुम्हीही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्यास शरीरात अनेक लक्षणे दिसू लागतात. तुम्हालाही ही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Kidney Infection : अभिनेत्री शिवांगी जोशी किडनी इन्फेक्शनने त्रस्त, तुम्हीही 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 9:22 AM

नवी दिल्ली : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नायराची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री शिवांगी जोशी (actress Shivangi joshi) हिला नुकतंच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. किडनी इन्फेक्शन (kidney infection) झाल्याने शिवांगीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर करत किडनी इन्फेक्शन झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. तसेच आपल्या आरोग्याची नीट काळजी घेण्याचं आवाहनही तिने चाहत्यांना आणि मित्रमैत्रिणींना केलं आहे. दरम्यान शिवांगीला किडनी इन्फेक्शन नेमकं का झालं आणि त्याची काय लक्षणे (symptoms of kidney infection) दिसतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. रक्तातील टाकाऊ तसेच घातक पदार्थ बाहेर काढण्याचे काम किडनीद्वारे केले जाते. किडनीने आपले काम करणे सोडले किंवा एखाद्या आजारामुळे किडनी पूर्ण क्षमतेने काम करु शकत नसली, तर होणार त्रास हा असह्य होतो. किडनी खराब होत असेल किंवा किडनीला काही इन्फेक्शन झाले असेल तर आपल्या शरीराद्वारे काही संकेत मिळतात अथवा लक्षणे दिसून येतात. ते वेळीच ओळखून लक्ष दिले तर ठीक अन्यथा मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

ही आहेत किडनीच्या आजाराची लक्षणे

हे सुद्धा वाचा

वारंवार लघवी लागणे

एखाद्या निरोगी व्यक्तीला दिवसातून सहा ते दहा वेळा लघवी लागते. मात्र त्यापेक्षा जास्त वेळेस लघवीला जावे लागत असेल तर किडनीचा आजार झाल्याची शक्यता असते. किडनीचा आजार असलेल्या व्यक्तीला एक तर पुन्हा पुन्हा लघवीला जावे वाटते किंवा कधीकधी लघवीला जाण्याची इच्छा होत नाही. काही लोकांच्या लघवीतून रक्तसुद्धा यायला लागते. किडनी खराब असण्याची ही काही मुख्य लक्षणे आहेत.

भूक न लागणे

युरिया, क्रिएटिनिन, ॲसिड यासारख्या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थांना रक्तातून बाहेर काढण्याचे काम किडनीद्वारे केले जाते. किडनीच्या माध्यमातून हे टाकाऊ पदार्थ मूत्राशयात साठवले जातात. नंतर ते लघवीच्या माध्यमातून शरीराच्या बाहेर टाकले जातात. मात्र किडनीला काही आजार अथवा इन्फेक्शन झाले तर खूप त्रास होतो. त्याची काही लक्षणे आहेत. त्यातील आणखी एक लक्षण म्हणजे भूक न लागणे. शरीरात टाकऊ पदार्थ साचल्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. तसेच सकाळी उठल्यानंतर मळमळ वा उलटी होण्याचा त्रास जाणवू लागतो. भूक न लागल्यामुळे जेवण करण्याची इच्छा होत नाही, हेही किडनीचा आजार असण्याचे लक्षणे आहेत. एवढेच नव्हे तर त्या रुग्णाचे वजनही वेगाने कमी होऊ लागते.

त्वचा कोरडी होणे आणि खाज सुटणे

त्वचा कोरडी होणे तसेच खाज येणे हेही किडनीच्या इन्फेक्शनचे मुख्य लक्षण असू शकते. किडनी रक्तातील नको असलेले घटक फिल्टर करण्यास सक्षम नसेल तेव्हा त्वचेवर खाज येणे तसेच त्वचा कोरडी पडणे अशी लक्षणे दिसून येतात.

अशक्तपणा अथवा थकवा जाणवणे

थकवा तसेच अशक्त झाल्यासारखे वाटणे हेही किडनीच्या आजाराचे एक लक्षण आहे. किडनीचे आजार वाढल्यानंतर आणखी थकवा, चक्कर येणे तसेच शरीर कमकुवत झाल्यासारखं वाटतं. विशेष म्हणजे चालतानादेखील थकवा जाणवतो.

पायांना सूज येणे

किडनी शरीरातील जास्तीचे सोडिअम फिल्टर करण्याचे काम करते. पण किडनीचचे कार्य नीट सुरू नसेल तर शरीरात सोडिअमचे प्रमाण वाढायला लागते. यामुळे पाय, घोटे तसेच पिंढऱ्यांना सूज येते. याला एडिमा म्हणतात. तसं पाहायचं झालं तर किडनीचा आजार असेल तर डोळे तसेच चेहऱ्यावर सूज येते. मात्र काही प्रमाणात हात, पाय तसेच घोट्यावरदेखील सूज आलेली दिसते.

झोप न येणे, बेचैन वाटण ज्या लोकांच्या किडनीला इन्फेक्शन झालेले असते त्यांच्या झोपेचा पॅटर्न बिघडू लागतो व यामुळेच त्यांना बेचैन अथवा अस्वस्थ वाटते, तसेच भीतीही वाटू लागते. तुम्हालाही अशी काही लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे सामान्य त्रास म्हणून न पाहता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.