इतकं फिट राहूनही सुश्मिता सेनला आला हार्ट ॲटॅक, अँजिओप्लास्टिमुळे वाचला जीव, जाणून घ्या काय असते ही शस्त्रक्रिया ?

Actress Sushmita sen suffered heart attack, undergoes Angioplasty, know about this surgery

इतकं फिट राहूनही सुश्मिता सेनला आला हार्ट ॲटॅक, अँजिओप्लास्टिमुळे वाचला जीव, जाणून घ्या काय असते ही शस्त्रक्रिया ?
Image Credit source: Freepik / Instagram
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 12:51 PM

नवी दिल्ली : अभिनेत्री सुश्मिता सेनला (sushmita sen) काही दिवसांपूर्वी हार्ट ॲटॅक (heart attack) आला होता. माजी मिस युनिव्हर्स असलेल्या 47 वर्षीय सुष्मिता सेनने इन्स्टाग्रामच्या पोस्टद्वारे (instagram post) ही माहिती तिची चाहत्यांशी शेअर केली. हृदयविकाराच्या झटक्यानंतर अँजिओप्लास्टी (angioplasty) करण्यात आली होती, असेही तिने या पोस्टमध्ये नमूद केले. तसेच अँजिओप्लास्टीनंतर डॉक्टरांनी हृदयात स्टेंट टाकले असल्याचेही तिने सांगितले. सुश्मिताच्या चाहत्यांनी ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली.

इंस्टाग्राम वर सुश्मिता सेननं म्हटलं होतं की ‘दोन दिवसांपूर्वी मला ह्रदयविकाराचा झटका आला. ह्रदयरोगतज्ज्ञांनी हे कन्फर्म केलं की, हा मोठा झटका होता. योग्यवेळी योग्य उपचार केल्याबद्दल डॉक्टरांचे आभाही करण्यात आली आहे. . अँजिओप्लास्टी त्यातून मी बचावली आहे, ही गूड न्यूज देण्यासाठी ही पोस्ट केली आहे’. ‘गॉड इज ग्रेट’ असा हॅशटॅगही तिने दिला.

अँजिओप्लास्टी म्हणजे काय?

हे सुद्धा वाचा

कोरोनरी अँजिओप्लास्टी किंवा पर्क्यूटेनियस कोरोनरी इंटरव्हेन्शनचा वापर बहुतेक वेळा धमन्यांमधील ब्लॉक उघडण्यासाठी केला जातो. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 1.5 तासांच्या आत रुग्णाची अँजिओप्लास्टी करावी. हा खूप महत्त्वाचा काळ असतो. हे वेळेच्या मर्यादेत करावे लागते, अन्यथा हृदयाच्या स्नायूंच्या पेशींचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. अँजिओप्लास्टी प्राथमिक अँजिओप्लास्टी म्हणून ओळखली जाते. हे शक्य नसलेल्या प्रकरणांमध्ये, इंट्राव्हेनस क्लॉट बस्टर दिले जाते. क्लॉट बस्टर हा एक सोपा पर्याय आहे.

अँजिओप्लास्टी कोणत्या स्थितीत केली जाते?

हृदयाच्या धमन्या ठीक करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल तेव्हा अँजिओप्लास्टी केली जाते. हृदयविकाराचा झटका आल्यास हृदयाची धमनी लवकर उघडण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. हृदयाला झालेल्या हानीच्या जलद दुरुस्तीसाठी याचा वापर केला जातो. तसेच हे कोरोनरी धमन्यांमधील प्लेक साफ करण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरते. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया देखील फायदेशीर आहे कारण यामध्ये मोठी शस्त्रक्रिया केल्याशिवाय धमनी पुन्हा तिच्या आकारात आणली जाऊ शकते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर स्टेंटिंगसह किंवा त्याशिवायही अँजिओप्लास्टी केली जाते.

अँजिओप्लास्टी नंतर रुग्णाला या गोष्टींची घ्यावी लागते काळजी

– शस्त्रक्रियेपूर्वी चाचण्या

– शस्त्रक्रियेपूर्वी ॲनेस्थेसिया तपासला जातो.

– शस्त्रक्रियेचे नियोजन

– शस्त्रक्रियेपूर्वी दिलेली औषधे

– शस्त्रक्रियेपूर्वी काहीही न खाणे

– शस्त्रक्रियेचा दिवस

अँजिओप्लास्टी कशी केली जाते?

हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा धोका असलेल्या रुग्णांवर आजकाल हृदयाच्या बायपास शस्त्रक्रियेऐवजी अँजिओप्लास्टी केली जाते. रुग्णाच्या स्थितीनुसार त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाते.

अँजिओप्लास्टी कोणकोणत्या प्रकारची असते?

बलून अँजिओप्लास्टी

बलून अँजिओप्लास्टी करताना, कॅथेटरच्या आकाराची पातळ लांब ट्यूब हात किंवा मांडीत चिर देऊन, तेथून खराब झालेल्या धमनीत घातली जाते. एक्स-रेच्या सहाय्याने कॅथेटर हे रक्ताभिसरणातून धमनीपर्यंत पोहोचते. कॅथेटरच्या टोकाला जोडलेला फुगा नंतर आत फुगवला जातो. फुगवलेल्या फुग्याचा प्लाकवर दाब दिला जातो व त्यानंतर धमनी रुंद केली जाते. धमनी साफ झाल्यानंतर, हृदयातील रक्ताभिसरण पूर्वीप्रमाणे होते. बलून अँजिओप्लास्टी करताना स्टेंटचा वापर केला जातो.

लेझर अँजिओप्लास्टी

लेझर अँजिओप्लास्टीमध्येही कॅथेटरचा वापर केला जातो परंतु तेथे बलून अथवा फुग्याऐवजी लेझरचा वापर केला जातो. लेझरद्वारे प्लेकपर्यंत पोहोचून हृदयातील ब्लॉकेजेस दूर केले जातात.

अथेरेक्टॉमी

जर एखाद्या रुग्णाच्या धमनीतील ब्लॉकेज खूप जास्त असेल, जे बलून किंवा लेझरच्या सहाय्याने काढता येणे शक्य नसेल. तर तेव्हाते अथेरेक्टॉमीद्वारे काढले जाते.या शस्त्रक्रियेमध्ये सर्जिकल ब्लेडद्वारे प्लेक पूर्णपणे कापला जातो. सर्जिकल ब्लेडच्या सहाय्याने हृदयाच्या भिंतींमधून खराब झालेली धमनी काढण्याचा प्रयत्न केला जातो.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.