त्वचेच्या आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश हवाच…

निरोगी त्वचेसाठी ज्या पध्दतीने बाह्य उपायांची चाचपणी केली जाते, त्याच पध्दतीने काही अंतर्गत उपाय योजनाही आवश्‍यक असतात. निरोगी त्वचेसाठी पोषक तत्वांनी युक्त अन्न खाने अत्यंत महत्वाचे आहे. अनेक पदार्थांमुळे त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.

त्वचेच्या आरोग्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश हवाच...
योग्य वेळी झोपणे देखील शरीरासाठी आरोग्यदायी असते. दिवसातून 7-8 तासांची झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. दुपारची झोप देखील थकवा आणि आळस वाढवू शकते आणि तुमचे झोपेचे चक्र व्यत्यय आणू शकते.
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 11:31 AM

शरीराच्या तसेच त्वचेच्या उत्तम आरोग्यासाठी (healthy skin) अनेक पोषक घटक आवश्यक असतात. चांगल्या आरोग्यासाठी आहारात (diet) पौष्टिक पदार्थांचा (Foods) समावेश महत्वाचा असतो. बर्‍याच वेळा, वायफळ पदार्थांच्या सेवनामुळे वजन वाढणे, चयापचय क्रिया मंदावणे आणि आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर पौष्टिकतेच्या अभावामुळे त्वचेचे नुकसान होते. तुम्ही जे काही खाता ते तुमच्या त्वचेवरही परिणाम करते. निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारच्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्‍यक असते. यामध्ये फॅटी फिश, अक्रोड, रताळे आणि ब्रोकोली इत्यादी पदार्थांचा समावेश करता येउ शकतो.

फॅटी मासे

फॅटी मासे ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध आहेत. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हे आवश्यक आहेत. ओमेगा 3 फॅटी अॅसिड त्वचेला निरोगी आणि मुलायम बनवण्याचे काम करतात. ओमेगा 3 फॅटी अॅसिडच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. हे सोरायसिस आणि ल्युपस सारख्या त्वचेशी संबंधित समस्यांपासून तुमचे संरक्षण करते. फॅटी माशांमध्ये व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात असते. त्वचेच्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे.

अक्रोड

अक्रोडमध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी मदत करीत असतात. अक्रोडमध्ये आवश्यक फॅटी अॅसिड असतात. आपले शरीर स्वतः फॅटी अॅसिडस् बनवू शकत नाही. ते ओमेगा -3 आणि ओमेगा-सिक्स फॅटी फॅटी अॅसिडनेसमृद्ध आहेत. अक्रोडात झिंक देखील असते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे सर्व पोषक घटक तुमच्या त्वचेसाठी खूप महत्वाचे आहेत.

रताळे

रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. हे नैसर्गिक सनब्लॉक म्हणून काम करून तुमची त्वचा निरोगी ठेवते. हे त्वचेला सूर्यप्रकाश, सुरकुत्या आणि त्वचेच्या कोरडेपणापासून संरक्षण करते. बीटा कॅरोटीनचे उच्च प्रमाण आपली त्वचा निरोगी ठेवते.

शिमला मिरची

शिमला मिरची बीटा कॅरोटीनचा चांगला स्रोत आहे. ते व्हिटॅमिन सीचे देखील चांगले स्त्रोत आहेत. हे प्रोटीन कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक आहे. ते त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करते. व्हिटॅमिन सीचे चांगले प्रमाण सुरकुत्या येण्यापासून प्रतिबंधित करते.

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन ए, सी, जस्त आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ते त्वचा निरोगी ठेवण्याचे काम करतात. त्यात ल्युटीन देखील असते, जे बीटा कॅरोटीनसारखे कार्य करते. यामुळे त्वचेचा ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून बचाव होतो.

फडणवीसांचा ‘सागर’ बंगला आणि बीकेसी पोलीस ठाण्याला छावणीचं स्वरुप; प्रसाद लाड यांचं आवाहन काय?

अवकाळीचा कहर त्यात महावितरणची भर, शॉर्टसर्किटने ऊस जळून खाक, अशी मिळवा आर्थिक मदत..!

देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांची नोटीस, अनिल बोंडे यांनी सांगितले यामागील कारण, आता जेलमध्ये जाण्यासाठी कुणाचा नंबर?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.