Health: मिठाच्या अति सेवनामुळे जडत आहेत गंभीर आजार, कसं ते जाणून घ्या; अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष

जेवणाला मीठाशिवाय चव येत नाही. आजकाल तर टूथपेस्टमध्येही मीठ (Salt) आहे का, असा प्रश्न विचारला जातो. एकूण काय, मीठाशिवाय आपलं पानही हलत नाही. अनेक जणांना शिजवलेल्या अन्नात वरून आणखीन मीठ घालायची सवय असते. पण हीच सवय आरोग्यासाठी (Health)अतिशय घातक ठरू शकते. जे लोक जेवताना, ताटातील पदार्थांवर आणखी मीठ घालून घेतात, त्यांचा वेळेपूर्वीच मृत्यू (Premature Death) […]

Health: मिठाच्या अति सेवनामुळे जडत आहेत गंभीर आजार, कसं ते जाणून घ्या; अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 12:49 PM

जेवणाला मीठाशिवाय चव येत नाही. आजकाल तर टूथपेस्टमध्येही मीठ (Salt) आहे का, असा प्रश्न विचारला जातो. एकूण काय, मीठाशिवाय आपलं पानही हलत नाही. अनेक जणांना शिजवलेल्या अन्नात वरून आणखीन मीठ घालायची सवय असते. पण हीच सवय आरोग्यासाठी (Health)अतिशय घातक ठरू शकते. जे लोक जेवताना, ताटातील पदार्थांवर आणखी मीठ घालून घेतात, त्यांचा वेळेपूर्वीच मृत्यू (Premature Death) होण्याचा धोका असतो. 5 लाखांहून अधिक लोकांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये ही माहिती छापून आली आहे. ‘ जे लोक जेवणात कधीही (वरून) मीठ घालून घेत नाहीत किंवा क्वचितच मीठ घालतात, अशा लोकांच्या तुलनेत अन्नात वरतून मीठ घालून घेणाऱ्यांना वेळेपूर्वीच मृत्यू येण्याचा धोका 28 टक्के अधिक असतो.’ 40 ते 69 या वयोगटातील 100 पैकी तीन जणांना हा धोका असतो. जेवणात अतिरिक्त मीठाचा वापर केल्यानेच हा धोका वाढतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे. तसेच जेवणात कमी मीठ घेणाऱ्यांपेक्षा अतिरिक्त मीठ खाणाऱ्यांचे आयुर्मानही कमी असते, असेही त्यात म्हटले आहे.

अमेरिकेतील, न्यू ऑर्लिन्स येथील ट्युलेन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ ॲंड ट्रॉपिकल मेडिसीन मधील प्रोफेसर ल्यु क्वी यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे. जेवताना अतिरिक्त मीठाचा वापर आणि वेळेपूर्वी होणारे मृत्यू याच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास आमच्या संशोधनद्वारे करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. आरोग्य सुधारण्यासाठी जेवणाच्या पद्धतीत योग्य बदल करणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला आहे. कमी मीठाद्वारे (लोकांच्या) सोडियमच्या ग्रहणात थोडासाही बदल झाल्यास त्याचा आरोग्याच्या दृष्टीने फार चांगला फायदा होऊ शकतो, असेही प्रोफेसर क्वी यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा

जास्त मीठ खाण्याने आरोग्यास अपाय होऊ शकतो. अतिरिक्त मीठामुळे बीपीसारख्या समस्या वाढू शकतात. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मीठामधील सोडियम शरीराला आवश्यक असते, मात्र त्याचे अतिरिक्त सेवन हृदयासाठी घातक ठरू शकते. सोडियम शरीरातील पाणी शोषून घेते. त्यामुळे अतिरिक्त मीठ खाल्ल्यास डी-हायड्रेशनचा त्रासही होऊ शकतो. आपल्याला जेवताना पापड, लोणचे, सॉस चटणी, चिप्स, वेफर्स असे अनेक पदार्थ खायची सवय असते. मात्र त्यात मीठाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे असे पदार्थ टाळणेच योग्य ठरते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.