अदनान सामी 220 किलोवरून पेाहचला 75 किलोवर, आहारात या गोष्टी समाविष्ट केल्याने झाला चमत्कार!

Adnan Sami transformation: बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अदनान सामी त्याच्या फोटोमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्या नुकत्याच प्रसिद्ध फोटोत तो इतका स्लिम-ट्रिम दिसतोय की, तुमचा विश्वासच बसणार नाही. हाती आलेल्या माहितीनुसार, अदनानने 16 महिन्यांत सुमारे 145 किलो वजन घटवले आहे.

अदनान सामी 220 किलोवरून पेाहचला 75 किलोवर, आहारात  या गोष्टी समाविष्ट केल्याने झाला चमत्कार!
अदनान सामीला ओळखलं का?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 6:32 PM

प्रसिद्ध गायक अदनान सामीची (Singer Adnan Sami) ‘लिफ्ट करा दे’, ‘भीगी-भीगी रातों में’ सारखी प्रचंड हिट गाणी सर्वांनीच ऐकली असतील. अदनान सामी एक यशस्वी संगीतकार, गायक प्रचंड देहयष्टीचा कलावंत म्हणुन सिनेसृष्टीत ख्यातनाम आहे. अनेकवेळा त्याच्या वाढलेल्या वजनामुळे (Due to increased weight) नेटीजन्स्‌च्या टिकेलाही त्याला सामोरे जावे लागले आहे. त्याचं वजन खूप जास्त होतं आणि त्यामुळे तो बॉडी शेमिंगचाही शिकार झाला होता. एकीकडे त्यांची हिट गाणी आणि एकीकडे त्यांचे वाढलेले वजन. काही वर्षांपूर्वी अदनानचे वजन 220 किलोच्या आसपास होते. पण, आता त्याचे वजन फक्त 75 किलो आहे. त्याच्या देहयष्टीत झालेल्या या आश्चर्यकारक बदलामागे त्याची कठोर मेहनत, नियोजनपुर्व आहार आणि व्यायाम (Pre-planned diet and exercise) आहे. अदनानने स्वतःमध्ये हा बदल कसा घडवला? याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अदनान सामीच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट

2005 मध्ये अदनान अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला होता. काही वेळाने तो लोकांसमोर आला तेव्हा तो एकदम सडपातळ झाला होता इतका की, त्याला ओळखणे अवघड होते कारण अवाढव्य शरीराऐवजी एक बांधेसुद स्लिम-ट्रिम माणूस तो, झाला होता.

या काळात त्याने प्रचंड वजन घटवले

अदनानवर 2005 मध्ये लिम्फेडेमाची शस्त्रक्रिया झाली आणि त्याला 3 महिने बेड रेस्टवर राहावे लागले. याचे कारण म्हणजे त्याचा लठ्ठपणा इतका वाढला होता की, त्याच्या स्नायूंखालील चरबी फुफ्फुसापर्यंत पोहोचली होती आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे त्यांने वजन कमी न केल्यास ६ महिन्यांहून अधिक जगू शकणार नाही, असा गंभीर इशाराच त्याला देण्यात आला होता. यानंतर, कुटुंब आणि मित्रांच्या साथीने, त्याने ह्यूस्टन (टेक्सास) येथील पोषणतज्ञांच्या हाताखाली वजन कमी करण्याचा प्रवास सुरू केला. अदनान सामीच्या पॅशनमुळे त्याने अवघ्या 16 महिन्यांत 150-155 किलो वजन कमी केले.

हे सुद्धा वाचा

शस्त्रक्रियेशिवाय वजन कमी करणे

अदनान सामीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, त्याने वजन कमी करण्यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया केलेली नाही. अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी लिपोसक्शन शस्त्रक्रिया करतात, ज्यामध्ये शरीरातील नको असलेली चरबी काढून टाकली जाते. पण 220 किलो वजनाच्या माणसाला या शस्त्रक्रियेतून चरबी काढून टाकणे अशक्य होते. ती शस्त्रक्रिया माझ्यासारख्या वजनदार लोकांसाठी नव्हतीच. लिपोसक्शन ऑपरेशनला लिपोस्कल्प्चर किंवा सक्शन-असिस्टेड लिपेक्टॉमी असेही म्हणतात. अदनान पुढे म्हणाला, जेव्हा मी माझा वजन कमी करण्याचा प्रवास सुरू करत होतो, तेव्हा शेवटच्या वेळी मी मॅश केलेले बटाटे, भरपूर लोणी असलेले मांसाहार आणि मोठा चीज केक खाल्ले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून मी लो कार्ब आणि हाय प्रोटीन फूड घ्यायला सुरुवात केली.

अदनानचे वजन असेच वाढले

अदनानने मुलाखतीदरम्यान सांगतो की, तो सुरुवातीपासून इतका लठ्ठ नव्हता. शालेय जीवनात तो खेळातही खूप सक्रिय होता. जेव्हा तो ह्यूस्टनमध्ये त्याच्या पोषणतज्ञांना भेटला तेव्हा त्याला अदनानबद्दल कळले की तो भावनिक आहाराचा बळी आहे. भावनिक खाणे म्हणजे ज्यामध्ये लोक तणाव आणि नकारात्मक भावनांमधून बाहेर येण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून अन्नाचा विचार करू लागतात. भावनिक आहारात, लोक अनेकदा चॉकलेट, पिझ्झा, आईस्क्रीम, मिठाई आणि जंक फूड अधिकाधीक खातात. भावनिक आहारातून बाहेर पडण्यासाठी अदनानने अधिक कार्ब, साखर-चरबी आणि खारट पदार्थांचे सेवन केले.

अदनान असा आहार घेत असे

अदनान सामीच्या इमोशनल ईटिंग(भावनिक) खाण्याच्या सवयीवर ह्यूस्टनस्थित पोषणतज्ञांनी उपाय केला. यानंतर त्यांना कमी कॅलरीजचे अन्न खायला देण्यात आले. आहारात भात, भाकरी आणि अस्वास्थ्यकर जंक फूडचा समावेश नव्हता. त्याला फक्त सॅलड, मासे आणि उकडलेले मसूर खाण्याचा सल्ला देण्यात आला. दिवसाच्या सुरुवातीला साखरेशिवाय चहा होता. दुपारच्या जेवणात तो कोशिंबीर आणि मासे खात असे. रात्रीच्या जेवणात भात किंवा रोटीशिवाय साध्या उकडलेल्या मसूर किंवा चिकनचा समावेश होता. तो फक्त साखरमुक्त पेय पिऊ शकत होते. सकाळी नाश्त्याला तो पॉपकॉर्न खात असे.

अदनान सामीचा असा होता व्यायाम

अदनान सामीचे वजन इतके होते की, तो पोहण्यासाठी पायही वाकवू शकत नव्हता. जेव्हा त्याने 40 किलो वजन कमी केले तेव्हा त्याला ट्रेडमिलवर चालण्याचा सल्ला देण्यात आला आणि हलका व्यायाम देखील करण्यात आला. भारतात त्यांचे प्रशिक्षक म्हणुन प्रशांत सावंत काम करत होते. प्रशांत सावंत यांनी त्याला आठवड्यातून 6 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ व्यायाम करून दिला. असे केल्याने अदनानने दर महिन्याला सुमारे 10 किलो वजन कमी केले. त्याचे वजन आता 75 किलो झाले असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत आजतक हिंदीने सविस्तर वृत्त प्रसारित केले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.