Pollution Effects on Kids : लहान मुलांच्या आरोग्यासाठी प्रदूषण धोकादायक, अशी घ्या काळजी!

वायु प्रदूषणाचा परिणाम लहान मुलांच्या हृदयावरती देखील होऊ शकतो. तर आता आपण वायू प्रदूषणापासून निर्माण होणारे आजार कोणते आणि लहान मुलांचे या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबत जाणून घेणार आहोत.

Pollution Effects on Kids : लहान मुलांच्या आरोग्यासाठी प्रदूषण धोकादायक, अशी घ्या काळजी!
Follow us
| Updated on: Oct 27, 2023 | 8:17 PM

मुंबई : सध्याचे बदलतं हवामान, वाढतं प्रदूषण, धूळ अशा अनेक गोष्टींमुळे गंभीर आजार निर्माण होताना दिसत आहेत. त्यात आता दिवाळीचा सण जवळ आला आहे. दिवाळीचा सण म्हटले की फटाके आलेच. फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होते, त्यामुळे नागरिकांना अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. हवेमधील धूर, धूळ, घाण यासारखे हानिकारक कण आपल्या शरीरात जातात आणि गंभीर आजार निर्माण करतात. यामध्ये विशेषतः लहान मुलांना वायु प्रदूषणाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रदूषणामुळे लहान मुलांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांना अनेक वेगवेगळे आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

वायू प्रदूषणापासून कोणते आजार निर्माण होतात?

मुलांचा विकास होत नाही – वायु प्रदूषणामुळे लहान मुलांच्या विकासामध्ये वाढ होत नाही. जी मुले प्रदूषणाच्या संपर्कात येतात त्यांच्या मानसिक विकासावर देखील परिणाम होतो. त्यामुळे लहान मुलांचे वायू प्रदूषणापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. त्यांची योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

श्वसनाशी संबंधित आजार – वायु प्रदूषणामुळे लहान मुलांना श्वासनाशी संबंधित आजार निर्माण होतात. वायू प्रदूषणामुळे लहान मुलांना दम्याचा त्रास निर्माण होतो. तसेच त्यांच्या फुफुसाच्या कार्यामध्ये देखील समस्या उद्भवतात. तसेच लहान मुलांमध्ये ब्रॉन्कायटिस सारखे श्वसनाचे आजार निर्माण होतात.

संसर्ग होण्याचा धोका – वायु प्रदूषणामुळे लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होते. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. तसेच वायू प्रदूषणामुळे लहान मुलांवरती न्यूमोनिया यासारख्या श्वसन संक्रमणांचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.

लहान मुलांचं प्रदूषणापासून कसे संरक्षण करायचे?

प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी लहान मुलांच्या आहारात विटामिन सी असलेल्या झिंक असलेल्या गोष्टींचा समावेश करा. यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होईल.

जर तुम्ही तुमच्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात असाल तर त्यांच्या तोंडाला स्कार्फ बांधा. तसेच त्यांच्या डोळ्यांवरती चष्मा लावा यामुळे त्यांचे प्रदूषणापासून संरक्षण होईल.

तुमच्या मुलांना गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाणे जास्तीत जास्त टाळा. तसेच ज्या ठिकाणी कमी प्रदूषण असेल अशा नैसर्गिक ठिकाणी त्यांना नेण्याचा प्रयत्न करा.

लहान मुलांच्या श्वासोच्छवासाठी नियमित योगासने करणे खूप गरजेचे आहे. यामुळे श्वसनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते. प्रदूषणाचे धोकादायक परिणाम टाळण्यासाठी तुमच्या मुलांना दररोज रात्री वाफ द्या.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.