भारत-पाकिस्तान मॅचने दिल्ली दणाणली, पण प्रदूषणाने गाठली ‘ही’ पातळी
ऐन दिवाळीत राजधानी दिल्लीतील प्रदुषणाचं गंभीर चित्र निर्माण झालंय.
नवी दिल्लीः रविवारी भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला. मात्र दिल्लीकरांना (Delhi) याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. सामना जिंकल्यामुळे अनेकांनी आनंद साजरा करण्यासाठी एक दिवस आधीच दिवाळी साजरी केली. रात्रभर फटाके (Fireworks) आणि आतिषबाजी होत राहिली. त्यामुळे दिल्ली एनसीआरमधील हवेची पातळी आधीच खालावली आहे. आता दिवाळीच्या दिवसांमध्येच दिल्लीसह, नोएडा, गाझियाबादमधील हवेत प्रदुषण वाढलंय. दिल्ली सरकारने प्रदुषणावर आळा घालण्यासाठी फटाक्यांवर बंदी घातली आहे. तरीही रात्रीच्या आतिषबाजीमुळे वातावरणातील प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. रविवारीच दिल्ली एनसीआरमधील सर्व शहरांतील एअर क्वालिटी खालावल्याचे चित्र होते.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (CPCB) च्या अहवालानुसार, रविवारी दिल्लीतील AQI 259 एवढा नोंदवण्यात आला होता. मागील वर्षी दिवाळीच्या एक दिवस आधीच्या आकड्यांपेक्षा हा खूप कमी आहे. 200 च्या पुढे AQI हा अत्यंत अस्वस्थ करणारा असा मानला जातो.
आनंदाची बाब म्हणजे मागील सात वर्षांच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील एअर क्वालिटी यंदाच्या वर्षी सर्वात कमी नोंदली गेली.
मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री हवेची गुणवत्ता गंभीर पातळी गाठू शकते. सोमवारी गाझियाबादमधील AQI 270 पर्यंत पोहोचला. हा अत्यंत निकृष्ट दर्जा आहे. प्रदूषण असेच वाढत राहिले तर रात्रीपर्यंत नागरिकांना याची तीव्रता थेट जाणवले. फरीदाबादमध्ये सर्वात कमी 200 AQI नोंदवण्यात आला.
रविवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात भारतानं विजय मिळवला. या आनंदात अनेकांनी रविवारीच दिवाळी. दिल्लीत रात्रभर कर्कश आवाज आणि आतिशवाजी सुरु होती.
प्रदूषण बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या मते, आतिषबाजीमुळे फक्त दिल्लीत नाही तर संपूर्ण एनसीआर आणि लखनौमधील हवेत प्रदुषण झालंय.
तज्ज्ञांच्या मते, हा तर ट्रेलर आहे. दिवाळीच्या रात्री म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या रात्री आणखी फटाके वाजवले जातील. त्यामुळे येथील हवा आणि विषारी होऊ शकते.
दिल्ली आणि परिसरातील प्रदूषण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भात कापणी सुरु झाली आहे. तसेच गव्हाच्या पेंड्याही जाळण्यास सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकारची वायू मानक संस्था सफर इंडियाच्या मते, मागील २४ तासातच उत्तर भारतात 850 ठिकाणी गव्हाच्या पेंढ्या जाळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. याचे धुराचे लोळ दिल्लीवर पसरू शकतात.