अजित पवारांना झालेला ‘ब्रॉन्कायटीस’ आजार नेमका आहे तरी काय? लक्षणं, उपचार…. जाणून घ्या संपूर्ण माहिती

आता अजित पवारांना झालेला आजार नेमका काय? तो कशामुळे होतो? त्याची लक्षणे आणि उपचार काय? याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत.

अजित पवारांना झालेला ‘ब्रॉन्कायटीस’ आजार नेमका आहे तरी काय? लक्षणं, उपचार.... जाणून घ्या संपूर्ण माहिती
Follow us
| Updated on: Sep 04, 2024 | 4:55 PM

Ajit Pawar Bronchitis Suffer : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार हे जनसन्मान यात्रा, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांची भेट, शासकीय बैठका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम यात व्यस्त आहेत. याच पार्श्वभूमीवर ते राज्यातील विविध भागांचा दौरा करत आहेत. पण आज राष्ट्रपतींसोबतचा त्यांचा उदगीरचा दौरा अजित पवारांना रद्द करावा लागला. कारण अजित पवारांना ‘ब्रॉन्कायटीस’चे निदान झाले आहे.

अजित पवारांना ‘ब्रॉन्कायटीस’ या आजाराची लागण झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अजित पवारांना ‘ब्रॉन्कायटीस’चा त्रास होत असल्याने ते पुढील काही दिवस विश्रांती घेणार आहेत. या काळात मुंबईतील शासकीय निवासस्थानातून ते शासकीय कामकाज पाहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता अजित पवारांना झालेला आजार नेमका काय? तो कशामुळे होतो? त्याची लक्षणे आणि उपचार काय? याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत.

ब्रोन्कायटिस म्हणजे काय?

ब्रोन्कायटिस झालेल्या रुग्णाच्या श्वसननलिकेत सूज येते. फुप्फुसातून हवा आत आणि बाहेर केली जाते. मात्र त्या श्वसननलिका फुगल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच काही वेळा श्वास घेण्यात अडचणी येतात. यावेळी व्यक्तीला खूप खोकला होतो. तसेच अधिक प्रमाणात कफ पडतो. श्वसनलिका कमजोर होते आणि फुफ्फुस मोठ्या प्रमाणात खराब होतात.

ब्रोन्कायटिसचे एक्युट ब्रोन्कायटिस आणि क्रॉनिक ब्रोन्कायटिस असे दोन प्रकार असतात. एक्युट ब्रोन्कायटिसमध्ये साधारण सर्दी आणि ताप येतो. तसेच कफ झाल्याने छातीत त्रास होतो आणि श्वास घेणंही कठीण होते. तर एक्युट ब्रोन्कायटिसमध्ये थोडासा तापही असतो. एक्युट ब्रोन्कायटिस होण्याचे प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त आहे. तर क्रॉनिक ब्रोन्कायटिसमध्ये खोकला आणि कफ होण्याचे प्रमाण अधिक असते. जर योग्य उपचार केले नाही, तर हा आजार बरे होण्यास अनेक महिने लागतात.

ब्रोन्कायटिस लक्षणे काय?

  • छाती जड होणे आणि दम लागणे
  • थोडा ताप आणि थंडी
  • हिरव्या किंवा फिकट पिवळ्या रंगाचा कफ आणि खोकला
  • कधीकधी कफसह रक्त निघणे.

एक्युट ब्रोन्कायटिसमध्ये सर्दीची सामान्य लक्षणे दिसतात. तसेच रुग्णांना कमी-श्रेणीचा ताप, अंगदुखीही होते. ही लक्षणे एका आठवड्यात बरी होत असली तरी पण खोकला अधिक काळ टिकू शकतो. तर क्रॉनिक ब्रोन्कायटिसमध्ये सतत खोकला लागणे, खोकला अचानक वाढणे आणि तो तीन महिने टिकणे ही लक्षणे रुग्णांना जाणवू शकतात.

ब्रोन्कायटिस मुख्य कारणं काय आहेत?

ब्रोन्कायटिस हा आजार एखाद्या व्हायरसमुळेही होऊ शकतो. जर समजा तुम्हाला ताप, सर्दी असे काही झाले असेल तर त्यानंतरही तुम्हाला ब्रोन्कायटिस हा आजार होऊ शकतो. पण क्रॉनिक ब्रोन्कायटिस हा फुफ्फुसांना त्रासदायक गोष्टींच्या संपर्कात येणे, घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी रसायनांमुळे होणारे परिणाम, कमी प्रतिकारशक्ती किंवा धूम्रपानामुळे होऊ शकतो.

उपचार काय?

ब्रॉन्कायटीस हा आजार थोडा वेगळा असल्याने डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावे. डॉक्टरांकडून प्रामुख्याने श्वासोच्छवासाचे व्यायाम, ऑक्सिजन थेरेपी, धूम्रपान सोडणे, जास्त द्रवपदार्थ पिणे आणि स्टीम घेणे हे उपाय सुचवले जाते. ज्यामुळे तुम्हाला याचा त्रास कमी होऊ शकतो. त्यासोबतच सावधगिरी म्हणून बाहेर पडताना मास्क घालणे, घरात ह्युमिडिफायर वापरणे, प्रदूषक आणि इरिटंट्सपासून दूर राहणे आणि लस घेणे फायदेचे ठरु शकते.

(Disclaimer – वरील माहिती https://www.myupchar.com/ या वेबसाईटच्या संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.