डॉक्टर उपचार करुन थकले, आजाराचा काही पत्ता लागत नव्हता, अखेर मोलकरणीने केले असे काही…
काही वेळा घरातील बुजुर्ग मंडळींचे सल्ले आपल्याला खरे मार्गदर्शक ठरतात. असाच एक तज्ज्ञ डॉक्टराने त्याचा अनुभव समाजमाध्यमावर शेअर केला आहे. अखेर या मंडळीनी चार पावसाळे आपल्यापेक्षा अधिक पाहीलेले असतात.
नवी दिल्ली – केरळचे हेपेटोलॉजिस्ट सायरिएक ए.बी. फिलिप्स ज्यांना ‘दि लिव्हर डॉक्टर’ नावाने देखील ओळखले जाते. त्यांना त्यांचा एक अनुभव समाजमाध्यमावर शेअर केला आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याची तब्येत बिघडली होती. स्वत: एक निष्णात डॉक्टर असून सुद्धा डॉ. फिलीप्स त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या आजाराचे निदान करु शकले नव्हते. त्यांनी अनेक टेस्ट केल्या. परंतू आजाराचे निदान होईना म्हणून ते निराश झाले. आणि डॉक्टरांच्या कुटुंबिय देखील चिंतेत सापडले होते. आणि एकेदिवशी त्यांच्या घरातील एका बुजुर्ग कामवाल्या बाईने दहा सेंकद त्या आजारी व्यक्तीला पाहीले आणि रोगाचे निदान केले.
डॉक्टर फिलिप्स यांनी एक्स हॅंडलवर आपला हा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी आपला अनुभव शेअर करताना लिहीले की माझ्या कुटुंबातील एका वयस्काला थंडी भरुन आली होती, थकवा, संधीवात यासह हलका ताप देखील आला होता. शरीरावर अजब चकत्या उमटल्या होत्या. आपण त्या कौटुंबिक सदस्याच्या हेपेटायटिस पासून कोविड-19, एन्फ्लुएंझा, डेंग्यू आणि एबस्टीन बार व्हायरसपासून सर्व तपासले, परंतू आजार कोणता हे काही केल्या समजत नव्हते.
येथे पाहा एक्स पोस्ट –
My adult family member had episodes of relentless low grade fever with chills and crippling fatigue and arthritis and a weird rash and I tested everything from viral hepatitis to covid-19 to Influenza and Dengue and Ebstein Barr Virus and nothing came back positive and it was…
— TheLiverDoc (@theliverdr) June 13, 2024
डॉक्टरांनी पुढे लिहीले की, माझ्या घरातील वयस्क मोलकरीन पुढे आली तिने एक क्षण त्या वयस्क रुग्णाकडे पाहिले आणि ती म्हणाली की हा अंजामपानी आजार आहे. ( 5 वा आजार ), काही काळजी करु नका. माझ्या नातवांना हा आजार झाला होता. त्यानंतर आपण तातडीने पार्वोव्हायर बी-19 ची तपासणी केली आणि रिझल्ट पॉझिटीव्ह आला.
मेडलाईन प्लसनूसार एरिथेमा इंफेक्टियोसम आजार ह्युमन पार्वोव्हायरस बी 19 च्या संक्रमणामुळे होतो. हा आजार शक्यतो लहानमुलांना होतो. संक्रमित व्यक्ती शिंकल्यास या आजाराचा संसर्ग दुसऱ्यांना होतो. या आजाराला ओळखण्याचा सोपा उपाय म्हणजे गालांवर एक चमकदार लाल चट्टे उमटतात. त्याला म्हणून थप्पड गाल सिंड्रोम देखील म्हटले जाते.