Amla Benefits: आरोग्याचा खजिना आहे आवळा, जाणून घ्या हिवाळ्यात याचे सेवन करण्याचे पाच चमत्कारी फायदे

आयुर्वेदात आवळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात आवळा उपलब्ध असल्याने ज्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.

Amla Benefits: आरोग्याचा खजिना आहे आवळा, जाणून घ्या हिवाळ्यात याचे सेवन करण्याचे पाच चमत्कारी फायदे
आवळा Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 6:35 PM

मुंबई,  हिवाळा म्हणजे आरोग्यासाठी अत्यंत्य महत्त्वाचा ऋतू. हिवाळ्यात अनेक प्रकारची फळं सहज उपलब्ध होतात. आवळा (Amla) देखील याच ऋतूमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. आकारानं लहान असलेला गुणकारी आवळा हा चवीला तुरट आंबट असला तरी त्याचे शरीराला होणारे फायदे (Health Benefits) मात्र अनेक आहेत. आवळ्यापासून मोरावळा, पेठा, सुपारी, सरबत, लोणचं, आवळा पावडर, आवळा कॅण्डी असे अनेक पदार्थ तयार केले जातात. आवळ्याला बहुगुणी असंही म्हटलं जातं अगदी पित्तापासून ते हाडांच्या मजबुतीपर्यंत विविध पद्धतीनं आवळ्याचे शरीरासाठी फायदे होतात. आवळा तुम्हाला निरोगी ठेऊ शकतो. आवळ्याच्या सेवनाने मेंदू पुष्ट, श्वासरोग दूर व हृदय मजबूत होते. नेत्रदृष्टी आणि आतड्यांची कार्यशक्तीत वृद्धी होते.

  1. ज्यांना तोंडाच्या फोडांचा त्रास आहे त्यांच्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. अशा लोकांनी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यासोबत आवळ्याच्या सेवनाने दात आणि हिरड्या मजबूत होतात.
  2.  शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवळा हा रामबाण उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हिवाळ्यात आवळा खाणे आरोग्यासाठी खूप चांगले असते.
  3. आवळ्यामध्ये क्रोमियम देखील आढळते, ज्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. डायबिटीजच्या रुग्णांसाठी आवळा खाणे खूप फायदेशीर आहे.
  4. आवळ्यामध्ये असे घटक असतात, ज्यात रक्त स्वच्छ करण्याचे गुणधर्म असतात. याचा फायदा चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर करण्यात आढळतो. मानवी त्वचा केवळ डागच नाही तर चमकदारही असते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. आवळ्याचे रोज सेवन केल्याने हृदयविकारांपासून बचाव होऊ शकतो. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी एथेरोस्क्लेरोसिस सारख्या आजारांना देखील शरीरापासून दूर ठेवते, ज्यामध्ये चरबी, कोलेस्टेरॉल सारखे खराब घटक रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतात.
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.