दरवर्षी 1.75 लाख महिलांचा मृत्यू, गर्भाशयाचा कर्करोग ठरतोय ‘सायलेंट किलर’

दरवर्षी, जगभरातील 1.75 लाख महिला गर्भाशयाच्या कर्करोगाच्या बळी ठरत असतात. सर्वात उशिरा याचे निदान होत असल्याने दरवर्षी अनेक मृत्यू होत असतात. याची लक्षणे लवकर लक्षात येत नसल्याने हा कर्करोग सायलेंट किलर ठरत आहे. फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापीठाचा एक अभ्यास या कर्करोगावर प्रभावी ठरत आहे.

दरवर्षी 1.75 लाख महिलांचा मृत्यू, गर्भाशयाचा कर्करोग ठरतोय ‘सायलेंट किलर’
Cancer study (Photo: Pixabay)
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 11:01 AM

मुंबई : महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर गर्भाशयाचा कर्करोग (Ovarian Cancer) मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतो. अनेकदा याची लक्षणेही जाणवत नसल्याने आपल्याला कर्करोग आहे हे समजायला रुग्णाला बराच काळ लागतो. अंडाशयाच्या कर्करोगावर फिनलंडमधून एक महत्त्वपूर्ण अभ्यास समोर आला आहे, ज्याच्या माध्यमातून इतर महिलांना त्यांच्या शरीराची रचना, रोगांचे कारण समजून घेणे अधिक सोपे जाऊ शकते. फिनलंडमध्ये (Finland) दरवर्षी सुमारे 550 महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान होते आणि त्यापैकी 320 महिलांना आपला जीव गमवावा लागतो. ही संख्या खूपच कमी वाटत असली तरी फिनलंडची लोकसंख्याही केवळ 55 लाख असल्याने त्या तुलनेत हा आकडा बराच मोठा आहे. जगभरात सरासरी अडीच लाख महिलांचा दरवर्षी गर्भाशयाच्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, 2018 मध्ये गर्भाशयाच्या कर्करोगामुळे 1,84,799 महिलांचा मृत्यू झाला होता.

गर्भाशयाचा कर्करोग हा स्त्रियांमधील इतर कर्करोगांपैकी सर्वात धोकादायक आहे कारण तो ओटीपोटात पसरत नाही तोवर त्याचे निदान होत नाही. निदान करण्याचा कोणताही मार्ग नसल्याने तो सहजासहजी पकडला जात नाही आणि अनेकदा तो शेवटच्या टप्प्यावरच ओळखला जातो. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या पेशींचा प्रसार थेट आपल्या रोगप्रतिकारक शक्तीशी कसा संबंधित आहे, याबाबत हेलसिंकी विद्यापीठातील संशोधकांनी निरीक्षण समोर आणले आहे. हा अभ्यास नेचर कम्युनिकेशन्स या सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

त्यांच्या अभ्यासात, संशोधकांना असे आढळून आले, की गर्भाशयाचा कर्करोग हा एकमेव कर्करोग आहे ज्याच्या कर्करोगाच्या पेशी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीपासून स्वत:चे अस्तित्व लपवून ठेवतात, त्यामुळे त्याचे लवकर निदान होत नाही.

का आहे सायलेंट किलर?

जेव्हा शरीराच्या कोणत्याही भागात कर्करोगाच्या पेशी तयार होऊ लागतात, म्हणजेच त्या घातक बनतात, तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती सुरुवातीला त्यांच्याशी लढते आणि त्या पेशींना नष्ट करण्याचा प्रयत्न करते. पण अंडाशयाच्या कर्करोगाच्या पेशी अशा चोराप्रमाणे घरात प्रवेश करतात, की घरातील लोकांना त्याच्या आगमनाची कल्पनाही नसते. चोरी झाल्यानंतरच ही गोष्ट उघड होते. जेव्हा घरात चोरी झाली असेल तेव्हाच कळते, म्हणजे गर्भाशयाचा कर्करोग अंडाशय व आतड्यांमध्ये पसरल्यावर त्याचे निदान होत असते. हेलसिंकी विद्यापीठातील संशोधकांना गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित 1,10,000 पेशी ओळखण्यात यश आले आहे. या अभ्यासात कर्करोगाच्या पेशी आणि रोगप्रतिकारक पेशी एकमेकांचा कसा प्रतिकार करता, हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

इतर बातम्या

Eye Care | ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांच्या डोळ्यांची आग होतेय? चिंता नको, साधे-सोपे उपाय करा

Take Care: कोरोना बरा झाला? तर आधी तुमच्या ह्रदयाची काळजी घ्या, 20 रोगांचा धोका आहे ह्रदयाला

वयाच्या चाळीशीतही चिरतरुण दिसण्यासाठी या डाएटचा समावेश जरूर करा…

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.