बार्शीत अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती यशस्वी, रुग्ण दुसऱ्याच दिवशी घरी, राज्यातील पहिलाच प्रयोग

Antibody Cocktail treatment : कोरोना विषाणू संसर्गाच्या उपचारासाठी प्रतिबंधात्मक लस हाच सध्या उपाय आहे. त्याव्यतिरिक्त प्रभावी औषध सध्यातरी नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.

बार्शीत अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती यशस्वी, रुग्ण दुसऱ्याच दिवशी घरी, राज्यातील पहिलाच प्रयोग
Barshi solapur Antibody Cocktail treatment
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 4:17 PM

सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत असतानाच, आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांवर ओपीडी बेसवर उपचार होणार आहेत. सोलापुरातील बार्शीत डॉ. संजय अंधारे यांनी कोरोना संसर्ग झालेल्या चार गंभीर रुग्णांवर केलेला प्रयोग यशस्वी झाला आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापरामुळे हा प्रयोग यशस्वी झाला आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग असल्याचं बोललं जात आहे. (Antibody Cocktail treatment during Covid-19 success in Barshi Solapur by Dr Sanjay Andhare )

कोरोना विषाणू संसर्गाच्या उपचारासाठी प्रतिबंधात्मक लस हाच सध्या उपाय आहे. त्याव्यतिरिक्त प्रभावी औषध सध्यातरी नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. शिवाय सध्या ज्या औषधांचा वापर सुरु आहे त्याचे दुष्परिणामही दिसत आहेत. मात्र एका प्रयोगादरम्यान शास्त्रज्ञांना हे मोठं यश मिळालं आहे. प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीज म्हणजेच मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज परिणामकारक काम करत असल्याचं समोर आलं आहे.

अँटीबॉडी कॉकटेल

जगभर सध्या याच मोनोक्लोनल अँटीबॉडीजची चर्चा आणि उत्सुकता आहे. कारण कोरोना विषाणूला थेट लक्ष्य करणारी ही पहिलीच उपचार पद्धत आहे. या उपचार पद्धतीमुळे विषाणूची शरिरात होणारी पुनर्निर्मिती थांबते आणि विषाणूमुळे होणारे दुष्परिणाम रोखले जातात. याच मोनोक्लोनल किंवा अँटीबॉडी कॉकटेलचा यशस्वी प्रयोग बार्शीतील डॉ. संजय अंधारे यांनी केला आहे.

बार्शीतल्या अंधारे हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत हजारो रुग्णांवर उपचार केले. मात्र अँटीबॉडी कॉकटेलचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला. या पद्धतीची माहिती आणि परवानगी मिळाल्यानानंतर डॉ. संजय अंधारे यांनी त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या गंभीर रुग्णांवर हा प्रयोग यशस्वी केला.

दुसऱ्या दिवशी घरी

विशेष म्हणजे या उपचार पद्धतीमुळे 24 तासात कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. यामध्ये एका डॉक्टरांच्या 65 वर्षीय आईचा आणि एका वकिलांच्या वडिलांचा समावेश आहे. त्या दोघांवरही मोनोक्लोनल अँटीबॉडीजच्या वापराद्वारे उपचार करण्यात आले. दुसऱ्याच दिवशी त्यांना मोनोक्लोनल अँटीबॉडी देऊन घरी पाठवण्यात आले.

विशेष म्हणजे त्यांच्या शरिरातून कोरोना विषाणू गायब झाले. शिवाय या उपचारपद्धतीमुळे त्यांना इतर कोणता त्रास किंवा दुष्परिणामही झाले नाहीत. त्यांना 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आलं.

ज्येष्ठांवर यशस्वी उपचार

विशेष म्हणजे ज्या रुग्णांवर उपचार करण्यात आले ते रुग्ण वयाची 60 वर्षे उलटले आहेत. शिवाय कोणाला दमा, कोणाला लकवा, रक्तदाब, मधुमेह यासारख्या व्याधींचा त्रास आहे. पण तरीही ही उपचारपद्धती यशस्वी ठरली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांनारेमडेसीव्हरचा किंवा अन्य स्टीरॉईड देण्यात आले. मात्र त्याचे मोठे दुष्परिणाम समोर आले. मात्र या मोनोक्लोनल अँटिबॉडीज दिल्यानंतर, रुग्णांना क्वचितच रेमडेसिव्हीर किंवा अन्य स्टीरॉइडची आवश्यकता लागते, असं डॉ. संजय अंधारेंनी सांगितलं.

दरम्यान, शेजारच्या उस्मानाबाद येथील कोरोनासंसर्ग झालेल्या रुग्णावर याच उपचार पद्धतीचा अवलंब करुन दुसऱ्याच दिवशी घरी सोडण्यात येणार आहे, असंही डॉक्टर अंधारेंनी सांगितलं.

या उपचार पद्धतीमुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा शिवाय औषधांचा होणार दुष्परिणाम रोखता येणार आहे

मोनोक्लोनल अँटीबॉडी उपचार पद्धती नेमकी काय?

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात

विषाणूला असलेल्या स्पाईकला चिकटतात, ज्यामुळे विषाणू आपल्या पेशीमध्ये घुसणार नाहीत

आपलं शरीर जवळपास वेगवेगळे असे हजारो अँटीबॉडीज तयार करतं

त्यातूनच वैज्ञानिकांनी दोन अँटीबॉडीची निवड केली ज्या स्पाईकला चिटकून राहतात

दोन यासाठी की विषाणूची संरचना बदलली तर दोन्ही पैकी एकअँटीबॉडीज काम करेल

मोनोक्लोनल किंवा कॉकटेल अँटीबॉडीज असं या दोन्ही अँटिबॉडीजना ओळखले जातं

यात कासिरीव्हीमॅब आणि इंडेव्हीमॅब या दोन औषधांचा एकत्रित समावेश आहे

ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशात मोनोक्लोनल अँटीबॉडी प्रभावी ठरली

मात्र भारतातील डेल्टा व्हेरीएंट विषाणूंवर मोनोक्लोनल अँटीबॉडी प्रभावी आहे की नाही याबाबत अभ्यास झाला नव्हता

मात्र डॉ . संजय अंधारे यांनी रुग्णांवर उपचार करुन ही पद्धत प्रभावी आणि कोणताही दुष्परिणाम नसल्याचा दावा केलाय

संबंधित बातम्या 

कोरोना तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक, पालकांनी संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या : छगन भुजबळ

शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.