Corona Virus | कोरोनावरील उपचारांसाठी अँटीबॉडी कॉकटेल, डोसपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या या औषधाबद्दल सर्व काही

केंद्रीय औषध नियामक सीडीएससीओ म्हणजेच केंद्रीय ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन(Central Drugs Standards Control Organisation)ने आपत्कालीन परिस्थितीत अँटीबॉडी-ड्रग कॉकटेलच्या वापरास मान्यता दिली आहे. (Antibody cocktails for the treatment of corona, know everything from dosage to price)

Corona Virus | कोरोनावरील उपचारांसाठी अँटीबॉडी कॉकटेल, डोसपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या या औषधाबद्दल सर्व काही
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 8:06 PM

Roche Antibody Cocktail for Covid Treatment नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी संघर्ष करीत असलेल्या भारतात आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवली आहे. कोरोना महामारीशी लढण्यासाठी सरकारही डोस, औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, चांगली बातमी अशी आहे की फार्म कंपनी स्विस कंपनी रोचे आणि भारतीय कंपनी सिप्ला यांनी तयार केलेल्या कोरोनाच्या अँटीबॉडी-ड्रग कॉकटेलची पहिला लॉट आजपासून देशात उपलब्ध आहे. अहवालानुसार या औषधाचा दुसरा लॉटही 15 ते 20 दिवसात येईल. अलिकडेच, 6 मे रोजी, केंद्रीय औषध नियामक सीडीएससीओ म्हणजेच केंद्रीय ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन(Central Drugs Standards Control Organisation)ने आपत्कालीन परिस्थितीत अँटीबॉडी-ड्रग कॉकटेलच्या वापरास मान्यता दिली आहे. अँटीबॉडी-ड्रग कॉकटेलमध्ये कॅसिरिविमॅब(Casirivimab) आणि इम्देवीमॅब(Imdevimab)चा समावेश आहे. (Antibody cocktails for the treatment of corona, know everything from dosage to price)

हे औषध काय आहे आणि हे कोणी बनवले?

या औषधास मिश्रण किंवा कंपाऊंड म्हणू शकता. हे एक प्रकारे अँटीबॉडी कॉकटेल आहे. अँटीबॉडी कॉकटेल म्हणजेच दोन अँटीबॉडीजचे मिश्रण जो विषाणूवर सारखाच परिणाम करतो. या कॉकटेल अँटीबॉडी औषधामध्ये कोरोना विषाणूवर समान परिणाम करणारे अँटीबॉडीज मिश्रण आहे. अ‍ॅन्टीबॉडी-ड्रग कॉकटेल Casirivimab आणि Imdevimab हे स्विस कंपनी रोचे(Roche) यांनी रेगेनरॉन(Regeneron)समवेत विकसित केले आहे आणि भारतीय कंपनी सिप्ला मार्केटिंग याची भागीदार आहे.

मोनोक्लोनल अँन्टीबॉडी आधारीत औषधाला कशी मिळाली मंजुरी?

हे मोनोक्लोनल अँन्टीबॉडी आधारीत कॉकटेल औषध आहे. मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज लॅब-निर्मित प्रोटीन आहेत जे व्हायरस किंवा हानिकारक जंतूंशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता कॉपी करतात. कॅसिरिविमाब(Casirivimab) आणि इमदेविमॅब(Imdevimab) मोनोक्लोनल अँन्टीबॉडीज आहेत, जे विशेषतः SARS-CoV-2 च्या स्पाइक प्रोटीन विरुद्ध प्रभावी आहेत. मानवी पेशींमध्ये विषाणूला प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी हे तयार केलेले आहे. अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये आपत्कालीन वापरासाठी प्रस्तुत डेटाच्या आधारावर भारतातील सेंट्रल ड्रग्स स्टँडर्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडूनही त्याला मान्यता मिळाली आहे.

डोस किती असेल आणि किती पैसे द्यावे लागतील?

एका रुग्णासाठी तुम्हाला 59,750 रुपये द्यावे लागतात. एकत्रित डोस एकूण 1200 मिलीग्राम आहे. यात 600 मिलीग्राम कॅसिरिविमॅब(Casirivimab) आणि 600 मिलीग्राम इमदेविमॅब(Imdevimab)चा समावेश आहे. देशातील त्याच्या मल्टी डोस पॅकची किरकोळ किंमत सुमारे 1,19,500 रुपये आहे. कंपनीने म्हटले आहे की एका पॅकम्ध्ये 2 कोरोना रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात.

कोणत्या प्रकारच्या रुग्णांसाठी फायदेशीर हे औषध?

हे अँटीबॉडी कॉकटेल प्रौढांसाठी आणि मुलांसाठी आणि 12 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या किशोरवयीनांमध्ये देखील वापरले जाऊ शकते. परंतु यासाठी त्यांचे वजन कमीत कमी 40 किलो असले पाहिजे. ज्या रुग्णांना सौम्य, मध्यम किंवा गंभीर लक्षणे आहेत त्यांना सार्स-सीओव्ही -2(SARS-COV-2) मध्ये संसर्ग झाला असेल, परंतु त्यांना ऑक्सिजनची गरज लागली नाही. अशा रूग्णांसाठी, रोचे आणि रेगेनरॉन यांनी बनविलेले कॉकटेल औषध कॅसिरिविमा आणि इमदेविमॅब कार्य करू शकते.

औषध वापरण्याचे फायदे काय आहेत?

रोचे इंडियाचे एमडी व्ही सिम्पसन इमॅन्युएल यांनी दिलेल्या माहितीनुसार अँटीबॉडी कॉकटेल कॅसिरिविमाब आणि इमदेविमब कोरोना रूग्णांची प्रकृती आणखी खराब होण्यापूर्वी त्यांच्यावर उपचार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. विशेषत: सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांना गंभीर संसर्ग होण्याची शक्यता दिसून येईल, त्या रुग्णांसाठी डॉक्टर हे औषध वापरतात. असा दावा केला जात आहे की हे औषध अशा गंभीर रुग्णांसाठी प्रभावी ठरेल.

हे औषध भारतात कसे उपलब्ध होईल?

रोचे अँटीबॉडी कॉकटेलचे मार्केटिंग व वितरणची जबाबदारी ही फार्मा कंपनी सिप्ला लिमिटेडची आहे. त्याची पहिला लॉट आला आहे, तर दुसरा लॉट 15 ते 20 दिवसात येईल. कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की हे औषध मोठी रुग्णालये आणि कोविड केंद्रांमधून घेतले जाऊ शकते. सिप्लाचे एमडी आणि ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमंग वोहरा यांच्या म्हणण्यानुसार हे औषध उपचार देशातील लसीकरणाबरोबरच साथीच्या रोगाविरूद्ध सुरू असलेल्या लढाला पाठिंबा देईल. (Antibody cocktails for the treatment of corona, know everything from dosage to price)

इतर बातम्या

…तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन; संभाजीराजे छत्रपती कडाडले

IPL 2021 : आयपीएलचे राहिलेले सामने आमच्या देशात नको, तिकडे UAE ला जा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.