Health Tips: कोरोना (corona) चा कहर गेल्या 2 वर्षांपासून आपण सगळे जण पाहत आहोत आणि ही समस्या प्रत्येक भारतीय सहन करत आहे. ज्या लोकांना कोरोना झाला त्या लोकांना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागले त्याच बरोबर अनेकांना शारीरिक समस्या उद्भवल्या पण त्याचबरोबर मानसिक समस्यांना सुद्धा त्यांना सामोरे जावे लागले. आपणास सांगू इच्छितो की, कोरोना विषाणू आपल्या शरीरात आत मध्ये जाऊन आपले फुफ्फुसे (lungs issue) प्रभावित करतो म्हणजेच हा विषाणू थेट आपल्या फुफ्फुसावर हल्ला करतो यामुळे सिटी स्कॅन केल्यावर सुद्धा याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती मिळत नाही. अनेक रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला आहे की, ज्या व्यक्तींना कोरोना झाला होता त्या व्यक्तींना आरोग्य संबंधित अनेक समस्या उद्भवत होत्या. अनेक रुग्णांना संक्रमणानंतर देखील हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले नाही परंतु अनेकांना श्वसन संदर्भातील समस्या त्रास देत होत्या. मीडिया रिपोर्टनुसार फुप्फुसांमध्ये रक्ताभिसरण प्रक्रिया मध्ये पोहोचलेले इन्फेक्शन तसे ही सिटीस्कॅन मध्ये दिसत नव्हते त्याचबरोबर आपले फुफ्फुसे बाधित झाले (lungs health issue) आहे याबद्दल पुरेशी माहिती सुद्धा आपल्याला कळत नव्हती. याकारणामुळे अनेक लोकांचा रिपोर्ट मध्ये श्वास घेण्या संदर्भातील समस्या निर्माण होत आहे असा शेरा आपल्याला पाहायला मिळाला होता परंतु श्वास घेण्यात अडथळा येऊन सुद्धा अनेकांचे रिपोर्ट नॉर्मल आले होते.
काही रिपोर्टनुसार जीनोन गॅस हा आपल्या शरीरात ऑक्सिजनच्या माध्यमातून फुफ्फुसा पर्यंत पोहचण्याचे कार्य करते. या गॅस मुळे आपल्या फुफ्फुसाना श्वास घेण्यास संदर्भातील अनेक समस्या सहन करावे लागतात. या गॅस कारणामुळेच फुफ्फुसे आणि श्वसन नलिकेत होणारी समस्या आपल्याला कळते यावर अनेक वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की जिनोन गॅसला फुफ्फुसपर्यंत पोहोचताना आपल्याला दिसते त्याचबरोबर फुफ्फुसाची कार्यशीलता संक्रमणामुळे किती खराब झाली आहे याचा अंदाज सुद्धा लावला जाऊ शकतो.
असे म्हटले जात आहे की, रुग्ण सिटीस्कॅन किंवा एक्स रे च्या या संदर्भातील कोणतीही माहिती किंवा समस्या असेल तर ती सांगू शकत नाही त्याच बरोबर आता रुग्णांच्या उपचारासाठी अशा प्रकारची पद्धती वापरात यायला पाहिजे, जे संक्रमणानंतर सुद्धा श्वास घेण्याच्या संदर्भातील समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरू शकेल.
जगभरात लाखो रुग्ण असे सुद्धा आहे ज्यांची संख्या जास्त आहे आणि त्यांनी कोरोना संक्रमणावर मात केली तरी त्यांना दीर्घकाळापर्यंत आरोग्य संबंधातील अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत अशातच असे देखील पाहायला मिळत आहे की,ज्या रुग्णांचे सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांच्या फुप्फुसांमध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झालेले आपल्याला पाहायला मिळाले नाही तसेच सिटी स्कॅन केल्यानंतर रिपोर्ट्स पण नॉर्मल आले. जर तुम्हाला कोरोना हा आजार झाला असेल परंतु श्वास घेण्यास त्रास होत असेल तरी अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा अजिबात करायला नाही पाहिजे अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागेल.
कोरोनातून बरे झाल्यानंतर पल्मोनरी फायब्रोसिस होऊ शकतो, प्रकार काय आणि उपचार काय?
रात्री झोपताना गरम पाणी आवर्जून प्यावं! जाणून घ्या गरम पाणी पिण्याचे फायदे