Arthritis Pain : संधिवात वेदना असह्य होताय का? ‘या’ पदार्थांचे करा सेवन; सांधेदुखीचा त्रास होईल दूर!

Arthritis Pain : संधिवातामुळे होणाऱ्या वेदना भयंकर असतात. ज्यामुळे तुमच्या दैनंदिन कामांवर परिणाम होतो. जे काम तुम्ही आधी विचार न करता सहज करायचे, तेच काम आता अवघड वाटते. अशा परिस्थितीत आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास आराम मिळू शकतो.

Arthritis Pain : संधिवात वेदना असह्य होताय का? ‘या’ पदार्थांचे करा सेवन; सांधेदुखीचा त्रास होईल दूर!
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 9:56 PM

Arthritis Pain : तुम्हाला अनेकदा गुडघे, सांधे किंवा पाठदुखीचा त्रास (Back pain) होतो का?  त्यामुळे तुम्हीही विचार करत असाल की या दुखण्यामागील कारण काय आहे आणि त्यावर उपचार काय करता येतील. या दुखण्यामुळे तुमच्या एकंदर आरोग्यावर, विशेषतः गुडघे आणि सांधे प्रभावित (Knees and joints affected) होतात यात शंका नाही. काही लोक या वेदनांचे कारण वाढलेले वजन, दुखापत, जळजळ किंवा संधिवात देतात. केवळ आहार, औषधे, बाम यामध्ये काही बदल करून हा आजार बरा होणे शक्य नसते. जगभरातील तज्ज्ञ संधिवात आणि गुडघेदुखीसाठी आहार आणि जीवनशैलीत सर्वांगीण बदल करण्याची शिफारस करतात. त्यामुळे जर तुम्हाला ही वेदना नैसर्गिकरित्या कमी करायची असेल तर काही ठरावीक पदार्थांचे सेवन (Consumption of certain foods) आजच सुरू करा. त्यामुळे तुमच्या संधिवाताला नक्कीच काही प्रमाणात आराम मिळू शकतो.

लसूण आणि कांदे

तीव्र सुगंध आणि चव असलेले लसूण आणि कांदे हे शरीरदुखीवर नैसर्गिक उपाय आहेत. यामुळेच पूर्वी लसूण आणि मोहरीचे तेल पारंपारिक पद्धतीने गरम करून दुखत असलेल्या जागी लावले जात असे. लसणामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी काम करतात. कांद्यामध्ये खनिजे देखील भरपूर असतात, जे शरीर आणि सांधेदुखी कमी करण्याचे काम करतात.

फॅटी मासे

ट्यूना, सॅल्मन आणि मॅकेरल सारखे मासे हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत आणि संधिवात वेदना आणि जळजळ बरे करण्यासाठी फॅटी माशांपेक्षा चांगला पर्याय नाही. ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन-डीची उपस्थिती स्नायूंची ताकद वाढवण्यास आणि पेशी तसेच ऊतींचे पुनरुत्पादन करण्यास मदत करते.

हे सुद्धा वाचा

ग्रीन टी

एक कप ग्रीन टी प्यायल्याने केवळ वजनच कमी होत नाही, तर सूज, सांधे आणि गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते. हे त्यामध्ये असलेल्या दाहक रसायनांमुळे होते, जे सांध्यांच्या आरोग्याची काळजी घेतात.

बेरी

अँटीऑक्सिडंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वांनी समृध्द असलेल्या बेरी रोज खाल्ल्याने जळजळ, वेदना कमी होते आणि अँथोसायनिन्स सारख्या अँटीऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे पेशी आणि ऊतींच्या सुधारणेला प्रोत्साहन मिळते, ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात.

हिरव्या पालेभाज्या

पालक, काळे, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्या बहुतेकांना आवडत नाहीत. परंतु, ते फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द असतात. जे संधिवात वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी कार्य करतात. व्हिटॅमिन ई आणि सी मध्ये नैसर्गिकरित्या समृद्ध, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन कोलेजनच्या विकासास मदत करते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.