या 4 सवयींमुळे कमी होण्याऐवजी वाढू लागते तुमची ब्लड शुगर, तत्काळ बदला तुमच्या सवयी
लाईफस्टाइलमध्ये काही आवश्यक बदल करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकता. अनेकदा लोकांच्या काही सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. रक्तातील साखरेची पातळी वाढवणाऱ्या सवयी कोणत्या हे समजून घेऊया.
नवी दिल्ली : शरीरातील रक्तातील साखरेची (blood sugar level) पातळी वाढण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे तुमची खराब जीवनशैली (bad lifestyle) . रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकदा लोकांना ब्लड शुगरच्या समस्येला सामोरे जावे लागते कारण त्यांची जीवनशैली खूपच खराब असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या सोडून तुम्ही तुमची रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात (how to control blood sugar) ठेवू शकता.
रात्रभर जागरण करणे
आजच्या काळात लोक रात्री तासन्तास आडवे पडून मोबाईलचा वापर करत असतात. मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे झोप येण्यात खूप त्रास सहन करावा लागतो. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप घेतली पाहिजे. यामुळे तुमचे आरोग्य आणि मन तर निरोगी राहतेच पण रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. रात्री बराच वेळ मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम केल्याने तुम्हाला भूक लागते आणि तुम्ही असे काही पदार्थ खातात, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर वाईट परिणाम होतो.
व्यायाम अथवा फारशी शारीरिक हालचाल न करणे
असे बरेचसे लोक असतात, जे खूप कमी किंवा नगण्य शारीरिक हालचाल अथवा व्यायाम करतात. जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसता, तेव्हा शरीरात अनेक प्रकारचे आजार उद्भवू लागतात. निरोगी राहण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत शारीरिक हालचालींचा म्हणजेच थोड्याफार व्यायामाचा नक्कीच समावेश करा. यामुळे तुमचे आरोग्य तर चांगले राहतेच, पण तुमच्या रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. शारीरिक क्रियाकलाप करून इन्सुलिन संवेदनशीलता सुधारली जाऊ शकते.
खूप जास्त स्ट्रेस घेणे
कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेतल्याने तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. ताण घेतल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होऊ लागते आणि एपिनेफ्रिन आणि कोर्टिसोल सारखे स्ट्रेस हार्मोन्स वाढू लागतात, ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी ताण घेणे आवश्यक आहे.
कॅलरीजच्या सेवनाकडे ठेवा लक्ष
शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही दिवसभरात किती कॅलरीज घेत आहात याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कॅलरीची संख्या कमी करण्यासाठी, आपल्या आहारात प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्ल संतुलित करणे आवश्यक आहे. यासोबतच तुमच्या आहारात फायबरचा समावेश करणंही अतिशय गरजेचं आहे.