ही फळं खाल्ल्यावर चुकूनही पाणी पिऊ नका, नाहीतर…

Water After Fruits Good Or Bad : अनेक फळं अशी असतात, जी खाल्ल्यानंतर पाणी पिणे टाळावे. नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो.

ही फळं खाल्ल्यावर चुकूनही पाणी पिऊ नका, नाहीतर...
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 5:23 PM

नवी दिल्ली | 26 ऑगस्ट 2023 : फळांचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते, हे सर्वांनाच माहीत आहे. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लूकोज मुबलत असतात, ज्यामुळे शरीराला एनर्जी आणि पोषक तत्वं मिळतात. फळं खाणे आरोग्यासाठी व तब्येतीसाठी लाभदायक असते. पण फळं खाण्याची योग्य पद्धतदेखील माहिती असली पाहिजे. अशी अनेक फळं आहेत, ज्यांचे सेवन केल्यानंतर पाणी पिणे (Never Drink Water After Eat These Fruits) टाळले पाहिजे. अन्यथा फळांपासून फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. अशी फळे कोणती हे जाणून घेऊया.

ही फळं खाल्ल्यावर पिऊ नये पाणी

केळी

केळं काल्ल्याने बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. पण केळं खाल्ल्यावर लगेचच पाणी प्यायले तर त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

पेरू

फायबर, व्हिटॅमिन ए आणि सी , फॉलिक ॲसिड, पोटॅशिअम आणि कॉपर ही पोषक तत्वा मुबलक प्रमाणात असलेला पेरू आपल्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक असतो. मात्र पेरू खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. त्यामुळे तुमची पचनसंस्था बिघडू शकते. पेरूवर पाणी प्यायल्यास पचनक्रिया ठप्प होते.

टरबूज

टरबूजामध्ये भरपूर पाणी असते. हे फळ पाण्याने भरलेले आहे. मात्र, टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर विपरीत परिणाम होतो.

डाळिंब

डाळिंब हे अतिशय रसाळ, मधुर, गोड फळ आहे. याच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीरही असते. डाळिंब खाल्ल्याने रक्त तर वाढतेच पण रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. मात्र, डाळिंब खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका. नाहीतर ॲसिडिटी आणि उलटीचा त्रास होऊ शकतो.

आंबट फळांवरही पाणी पिणे टाळावे

संत्र, द्राक्ष, आवळा आणि मोसंब, अशी आंबट फळ खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. आंबट फळांच्या सेवनानंतर पाणी प्यायलं तर पीएच लेव्हल बिघडू शकते, त्यामुळे पचनसंस्था खराब होण्याची शक्यता असते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.