Bad Food Combination with Milk : दुधासोबत हे 5 पदार्थ खाणं धोकादायक, बिघडू शकते तब्येत…

दुधामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. तब्येतीसाठी ते अतिशय लाभदायी असते.मात्र, दुधासोबत काही गोष्टींचे सेवन करणे टाळले पाहिजे. अन्यथा गंभीर हानी होऊ शकते. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या शरीराला घेरू शकतात. दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नये ते जाणून घेऊया.

Bad Food Combination with Milk : दुधासोबत हे 5 पदार्थ खाणं धोकादायक, बिघडू शकते तब्येत...
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 1:42 PM

Bad Food Combination with Milk : दूध हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. दूध प्यायल्याने केवळ हाडेच मजबूत होत नाहीत तर संपूर्ण शरीर मजबूत होते. ते शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. मात्र काही लोकांना दुधासोबत इतर काही पदार्थही खायला आवडतात. यामध्ये ब्रेड, पोळी किंवा इतर अनेक पदार्थांचा समावेश होतो. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या दुधासोबत सेवन केल्यास आपल्या आरोग्याचे गंभीर नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशी चूक कधीही करू नये. दुधासोबत कोणते पदार्थ खाऊ नये ते जाणून घेऊया.

आंबट फळं

आंबट फळं आणि दूध यांचे मिश्रण अजिबात योग्य मानले जात नाही. त्यामुळे ते एकत्र खाणं टाळावंच. खरंतर वास्तविक, आंबट फळांमध्ये ॲसिड असते, ज्याचा दुधसोबत संयोग झाला किंवा ते दुधात मिसळल्यास पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पोटदुखी, उलट्या किंवा जुलाब यासारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आंबट फळं आणि दूध एकत्र सेवन करू नयेत.

टोमॅटो

जर तुम्ही टोमॅटो खाणार असाल तर त्याच्या एक तास आधी आणि नंतर तासभर दूध पिऊ नये. कारण टोमॅटो देखील आम्लयुक्त असतो, अर्थात त्यामध्ये ॲसिड असते. त्यामुळेच टोमॅटो आणि दुधाचे मिश्रण योग्य मानले जात नाही. त्यामुळे ते खाणे टाळणं चांगलं.

तिखट पदार्थ

जर तुम्ही एखादा तळलेला किंवा मसालेदार पदार्थ खात असाल तर, तो कधीच दुधासोबत खाऊ नका. अन्यथा, यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. असे केल्याने ॲसिड रिफ्लक्स देखील वाढते, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. म्हणूनच दुशासोबत असे पदार्थ खाणे टाळणे उत्तम ठरते.

प्रोटीन रिच पदार्थ

दुधामध्ये भरपूर प्रोटीन असते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही दूध प्याल, तेव्हा इतर प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे टाळणे योग्य. नाहीतर तुमच्या पचन संस्थेवर जास्त दाब पडू शकतो. ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

दूध आणि मासे

दूध आणि मासे , हे फूड कॉम्बिनेशनही खाणे टाळावे. दूध प्यायल्यानंतर, मासे खाण्यात कमीत कमी 2 तासांचे अंतर असावे. अन्यथा पचनसंस्थेशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अन्नातून विषबाधाही होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.