या पदार्थापासून दूर राहा, अन्यथा वाढेल कॉलेस्ट्रॉल, पाहा कोणते पदार्थ

हॉर्ट अटॅक किंवा स्ट्रोक सारखे आजार हल्ली वाढत चालले आहेत. या आजारांना तुमचा आहार खानपान जबाबदार असते. काहीही अरबट चरबट खाण्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि ते धोकादायक असते. त्यामुळे कोणत्या आहाराने कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढते ते पाहूयात.

या पदार्थापासून दूर राहा, अन्यथा वाढेल कॉलेस्ट्रॉल, पाहा कोणते पदार्थ
what foods increase cholesterol levels
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 7:15 PM

आपल्या शरीराचे कार्य चालण्यासाठी कॉलेस्ट्रॉलची गरज असते. परंतू याची पातळी वाढली तर शरीराला खास करुन हृदय विकाराचा झटका देखील येऊ शकतो. कॉलेस्ट्रॉल एक प्रकारची चरबी असून ती वाढल्याने शरीरात अनेक त्रास सुरु होऊ शकतात. बॅड किंवा हाय कॉलेस्ट्रॉल वाढल्याने स्ट्रोक, हॉर्ट अटॅक, टाईप-2 डायबेटिक सारखे आजाराचा धोका वाढत जातो. हॉर्ट अटॅक आणि पक्षाघात किंवा स्ट्रोक हे जीव घेणे आजार आहेत. जर तुम्ही तुमच्या आहाराची योग्य काळजी घेतली नाही तर तुमच्या शरीरात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे येथे आपण पाहूयात कोणते पदार्थ कॉलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात.

प्रोसेस्ड फूड पासून दूर राहा –

बाजारात आजकाल पॅकबंद अन्न विकत मिळत असते. परंतू अशा प्रकारे प्रक्रिया केलेले ‘रेडी टू इट’ असे अन्न शरीरासाठी अजिबात चांगले नसते. हे अन्न जास्त काळ टिकावे म्हणून त्यावर प्रक्रिया केलेली असते. त्यात ट्रान्स फॅट आणि सोडियमचे प्रमाण देखील जादा असते. शरीरात त्यामुळे कॉलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रक्रीया केले पॅकबंद अन्न त्वरित बंद करावे.

गोड पदार्थांपासून दूर रहा –

गोड पदार्थांचा अति वापर शरीरासाठी हानिकारक आहे. तुम्हाला हे माहिती आहे की शरीरातील चांगले कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी आणि बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढविण्याचे काम या गोड पदार्थाने होत असते. त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊन पुढे  अनेक आजारांना आमंत्रण मिळत असते. तुम्ही दर दिवशी केक, कुकीज, शेक आणि मिठाई खात असाल तर तातडीने खाणे बंद करा.

धूम्रपान –

धूम्रपान करणे हे शरीरासाठी हानिकारक असतेच हे वेगळे सांगायला नको. परंतू धूम्रपान देखील चांगल्या कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतो आणि बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवत असतो. त्यामुळे जर तुम्हाला आधीच कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण जादा झालेले असेल आणि तुम्ही धूम्रपान करत असाल तर तुमच्यासाठी हे जीव घेणे आहे.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास..
राज ठाकरेंच्या टीकेवर फडणवीसांच प्रत्युत्तर, शिंदेंवर जनतेचा विश्वास...
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका
फडणवीसांच्या लाडक्या ताईंना... रश्मी शुक्लांवरुन राऊतांची सरकारवर टीका.
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा
फडणवीसांच्या सभांचा धडाका, महायुतीचं सरकार आणण्यासाठी 6 दिवसात 21 सभा.
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा
‘शिंदे अन् शरद पवार संपर्कात, 23 नोव्हेंबरनंतर...’, मलिकांचा मोठा दावा.
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?
सरवणकर लढणारच, शेवटच्या क्षणापर्यंत धावाधाव, राज यांच्या घरी काय झालं?.
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?
मनसेचं 'इंजिन' शिंदेंच्या शिवसेनेसाठी 'रेड' अन् भाजपसाठी 'ग्रीन'?.
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले
उ.कोल्हापुरातून पंजा गायब, अधिकृत उमेदवाराची माघार, सतेज पाटील भडकले.
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.