दररोज या चुका करणारी माणसं ठरतात मूर्ख, स्वत:च बनतात आपल्या शरीराचे शत्रू; तुम्हीही करता का या चुका?

निरोगी राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी निरोगी जीवनशैली राखणे खूप महत्वाचे आहे. म्हणूनच तज्ज्ञ या 5 चुका कधीही न करण्याचा सल्ला देतात.

दररोज या चुका करणारी माणसं ठरतात मूर्ख, स्वत:च बनतात आपल्या शरीराचे शत्रू; तुम्हीही करता का या चुका?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 10:39 AM

नवी दिल्ली – निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली असणे अत्यंत (good lifestyle) आवश्यक आहे. पण जीवनशैली म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? खरंतर आपण दररोज काय करतो आणि ते (काम ) कसे करतो, यावरून आपली जीवनशैली ठरते. यामध्ये खाणेपिणे, व्यायाम,झोप, ताणतणाव (exercise) या सर्वांचा समावेश होतो. आपलं शरीर आजारी का पडतं? जेव्हा आपली जीवनशैली बिघडू लागते, तेव्हा शारीरिक अवयवांवरही परिणाम होतो. हळूहळू हृदय, फुफ्फुसे, यकृत, पोट इत्यादी कमकुवत होऊन आजारांनी घेरले जाते. त्यामुळे रोजच्या जीवनात होणाऱ्या या 5 चुका (avoid mistake) टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात

कच्चे सॅलॅड खाणे

सॅलॅडमध्ये कच्च्या भाज्या आणि फळे असतात, ज्यामुळे थंडपणा आणि कोरडेपणा निर्माण होतो. याचे रोज सेवन केल्याने पचनसंस्थेची आग थंड होऊ लागते. त्यचे दूरगामी परिणाम म्हणजे पोट फुगणे आणि गॅसेस होणे. म्हणून कच्चे सॅलॅड जास्त प्रमाणात खाणे टाळावे. हेल्दी फॅट आणि मसाल्यांमध्ये हलके शिजवलेले सॅलॅड खावे.

हे सुद्धा वाचा

रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी पिणे

रिकाम्या पोटी सर्वप्रथम कोमट पाणी प्यायले पाहिजे. त्यामुळे दिवसभर पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. रिकाम्या पोटी चहा-कॉफी प्यायल्यास शरीरात बरीच विषारी द्रव्ये तयार होतात.

कोणत्याही वेळेस शौचाला जाणे

तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी शौचाला जाता का?असे केल्याने शरीरातील घाण पूर्णपणे साफ होत नाही. सकाळी उठल्यापासून दोन तासांत पोट साफ करायला हवे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. तसेच पोट साफ करण्यापूर्वी पाण्याशिवाय कोणतेही पदार्थ सेवन करू नका किंवा कोणतेही पेय पिऊ नका.

अन्न न चावता खाणे

अन्न हे 32वेळा चावून खाल्ले पाहिजे, त्यामुळे पचन नीट होते. तसेच जेवताना इतर कोणतेही काम करू नये.

खाल्ल्यानंतर लगेच आंघोळ करणे

जेव्हा आपण काही खातो तेव्हा शरीरात उष्णता निर्माण होते. ही उष्णता विशेषत: पचनसंस्थेत निर्माण होते, त्यानंतर लगेच आंघोळ केल्याने त्यात व्यत्यय येऊ शकतो आणि शरीरात त्रास होऊ शकतो. म्हणून जेवल्यावर लगेच अंघोळ करू नये.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.