लघवी करताना तुम्हीही नक्कीच ‘या’ चुका करत असाल; ‘या’ चुकांमुळे कोणते गंभीर आजार होऊ शकतात हे माहित्ये का?
लघवी करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे तुम्हाला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
नवी दिल्ली : लघवी करणे हा आपल्या दैनंदिन कामांचा एक भाग आहे. शरीरातील सर्व टाकाऊ पदार्थ (watse) लघवीद्वारे बाहेर पडतात. बहुतेक लोकांना लघवी करण्याची योग्य पद्धत माहीत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जेव्हा तुम्ही लघवी योग्य प्रकारे करत नाही, तेव्हा तुम्हाला लघवी आणि मूत्राशयाशी (bladder) संबंधित आजारांचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत अशाच काही चुकांबद्दल (mistakes) जाणून घेणे महत्वाचे ठरते, ज्या तुम्ही लघवी करताना करू नयेत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया-
लघवी थांबवून ठेवणे
अनेकदा लोक एखाद-दुसऱ्या कारणाने तासनतास लघवी रोखून ठेवतात. जर तुम्हीही असेच काही करत असाल तर जाणूनबुजून किंवा नकळत असे करून तुम्ही तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवत आहात. लघवी थांबवून ठेवल्याने किडनीवर दाब वाढतो, तसेच किडनीवर डागही तयार होतात, त्यामुळे भविष्यात किडनीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच लघवी अडवून ठेवल्याने ब्लॅडरही कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे लघवी गळतीची समस्या उद्भवू शकते. लघवी रोखून ठेवल्याने त्यामध्ये असलेले बॅक्टेरिया वाढू शकतात, तसेच ते ज्यामुळे ते मूत्राशयाच्या आतही पोहोचू शकतात, ज्यामुळे यूटीआयची (Urinary Tract Infection) समस्या सुरू होते.
ब्लॅडर संपूर्णपणे रिकामे न होणे
अनेक लोक घाईघाईने लघवी करतात, आणि तसेच टॉयलेटच्या बाहेर येतात. मात्र त्यामुळे ब्लॅडर पूर्णपणे रिकामे होत नाही. जर तुम्हालाही अशीच सवय असेल तर हे जाणून घ्या की, ब्लॅडरमध्ये काही प्रमाणात लघवी शिल्लक राहिल्यास युरिन इन्फेक्शनचा धोका खूप वाढतो.
लघवी रोखण्याच्या समस्येमुळे, एखाद्या व्यक्तीला ब्लॅडर पूर्णपणे रिकामे आहे की नाही याची कल्पना नसते. त्यामुळे लघवी गळती आणि संसर्गाची समस्या खूप वाढते. लघवी केल्यानंतर तुम्हालाही ब्लॅडर भरल्यासारखे वाटत असेल तर, तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधणे महत्त्वाचे ठरते.
घाई-घाईत लघवी करणे
थोड्या-थोड्या कालावधीने लघवी करणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. असे केल्याने, ब्लॅडर योग्यरित्या लघवी गोळा करू शकत नाही. साधारणपणे 450 ते 500 मिली लघवी ब्लॅडरमध्ये जमा होते. परंतु जर तुम्ही दर अर्ध्या तासाने किंवा एक तासाने लघवीला गेलात तर ब्लॅडरमध्ये फारच कमी लघवी जमा होते ज्यामुळे ब्लॅडर नीट कार्य करू शकत नाही आणि तुम्हाला थोड्या-थोड्या वेळाने लघवीला जावेस वाटते. काही वेळाने लघवी करणे हे यूटीआय, किडनी इन्फेक्शन, मूत्राशयातील दगड आणि मधुमेह किंवा पुरुषांमध्ये प्रोस्टेटच्या समस्येचे कारण ठरू शकते.
लघवीच्या संसर्गाची तपासणी न करणे
मूत्रमार्गाच्या संसर्गाचा सामना कोणालाही होऊ शकतो. पण हा संसर्ग महिलांमध्ये जास्त दिसून येतो. या संसर्गामुळे महिलांना लघवी करताना वेदना होतात. जेव्हा बॅक्टेरिया यूरिन पाईपद्वारे ब्लॅडरमध्ये प्रवेश करतो, तेव्हा हा संसर्ग होतो. ब्लॅडरपर्यंत पोहोचल्यानंतर, हे जीवाणू खूप वेगाने वाढू लागतात आणि लघवी ॲसिडीक बनवतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही लघवी करता तेव्हा तुम्हाला जळजळ जाणवते. जेव्हा तुम्हाला यूटीआय होतो तेव्हा लघवी करताना वेदना होतातच, तसेच वारंवार लघवी करण्याची गरजही भासते.
जर तुम्हाला वर्षातून 3 पेक्षा जास्त वेळा युरिन इन्फेक्शनचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा. युरिन इन्फेक्शनची समस्या अँटिबायोटिक्सच्या मदतीने बरी होऊ शकते, मात्र त्याची वेळीच योग्य काळजी न घेतल्यास हा संसर्ग किडनीपर्यंत पोहोचू शकतो.
लाल अथवा गुलाबी रंगाच्या लघवीकडे दुर्लक्ष करणे
लघवीचा लाल आणि गुलाबी रंग तुम्ही काय खाल्ले यावर अवलंबून असतो. पण लघवीचा हा रंग वाढलेला प्रोस्टेट, किडनी स्टोन, ब्लॅडर किंवा किडनीमधील गाठ इत्यादी अनेक आजारांमुळे देखील असू शकतो. परंतु अनेकवेळा तुम्ही गडद लाल आणि गुलाबी रंगाचा एखादा पदार्थ सेवन करता तेव्हा यामुळेही लघवीचा रंग लाल आणि गुलाबी दिसू शकतो.