पीरियडमध्ये होत आहेत तीव्र वेदना ? तुम्ही हे पदार्थ तर खात नाही ना ?

मासिक पाळीच्या काळात अनेक महिला तीव्र वेदनांमुळे त्रासलेल्या असतात. खाण्या-पिण्यातील काही घटक हेदेखील या वेदना वाढवण्यास कारणीभूत ठरतात. अशावेळी काही पदार्थांचे सेवन टाळणे उत्तम ठरते.

पीरियडमध्ये होत आहेत तीव्र वेदना ? तुम्ही हे पदार्थ तर खात नाही ना ?
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 3:16 PM

नवी दिल्ली : प्रत्येक मुलीला, महिलेला आयुष्यात मासिक पाळीचा (periods) सामना करावा लागतो. मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला तीन ते सात दिवस रक्तस्त्राव होतो. मात्र बहुतांश महिलांना या काळात पोट आणि पाठदुखीचा (stmoach and back pain in period)त्रास होतो. काही महिलांना याचा फारसा त्रास होत नाही, पण काही महिलांसाठी हा काळ अतिशय त्रासदायक ठरतो.

मासिक पाळी सुरू असताना होणाऱ्या तीव्र वेदनांसाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. त्यापैकी एक कारण म्हणजे त्या काळात महिला काय खातात-पितात. काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ आहेत ज्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान तीव्र वेदना होतात. या वेदनांपासून सुटका हवी असेल मासिक पाळीच्या काळात काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे. ते पदार्थ कोणते, हे जाणून घेऊया..

1) प्रोसेस्ड फूड (Processed foods)

फास्ट फूड, पॅकेज्ड स्नॅक्स आणि अती साखर असलेले पदार्थ हे पोटातील सूज वाढवू शकतात. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना वाढू शकतात. त्यामुळे या काळात प्रोसेस्ड पदार्थ खाणे टाळावे.

2) ट्रान् फॅट्स (Trans fats)

तेलकट पदार्थ, मार्जरी, अशा अनेक पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स अधिक असतात, त्यांच्या सेवनाने सूज व जळजळ वाढते व ते अधिक वेदनांसाठी कारणीभूत ठरते .

3) कॅफेन (Caffeine)

काही लोकांना कॅफीनचे (कॉफी) सेवन केतल्याने वेदनांपासून आराम मिळू शकतो, परंतु कॅफीनमध्ये असलेल्या व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टिव्ह इफेक्टमुळे अनेक स्त्रियांना जास्त वेदना जाणवू शकतात.

4) हाय सोडियम युक्त पदार्थ (High-sodium foods)

जास्त सोडियमयुक्त पदार्थांमुळे शरीराच्या अंतर्गत भागात पाणी वाढते आणि सूज येते. यामुळे मासिक पाळीच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे खारट स्नॅक्स, प्रक्रिया केलेले मांस आणि कॅन केलेले पदार्थ यांचे सेवन करणे टाळावे.

5) मद्यपान (Alcohol)

मद्य किंवा अल्कोहोल हे डिहायड्रेशन आणि सूज येण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे मासिक पाळीच्या वेदना आणि अन्य लक्षणे वाढू शकतात. म्हणूनच मासिक पाळी सुरू असताता मद्यपान करू नये.

6) रिफाइंड कार्बोहायड्रेट्स (Refined carbohydrates)

पांढरा ब्रेड, तांदूळ आणि साखर युक्त पदार्थांमुळे ब्लड शुगर आणि सूज हे दोन्ही वाढू शकते. ज्यामुळे वेदना वाढतात. त्यांचे सेवन हानिकारक ठरते.

7) डेअरी प्रॉडक्ट्स (Dairy products)

डेअरी प्रॉडक्ट्समध्ये लॅक्टोज असतात, ज्यामुळे काही महिलांना मासिक पाळीच्या काळात सूज येणे आणि वेदना वाढणे, असा त्रास होऊ शकतो. तसेच ज्यांना डेअर प्रॉडक्ट्सची ॲलर्जी आहे, त्यांनीही या पदार्थांचे सेवन टाळावे .

8) साखर युक्त पदार्थ (High-sugar foods)

सोडा, कँडी आणि पेस्ट्रीसारखे अधिक साखरयुक्त पदार्थ शरीरातील सूज आणि हार्मोनल असंतुलनासाठी कारणीभूत ठरू शकते. ज्यामुळे मासिकळ पाळीतील वेदना अधिक वाढू शकतात. असे पदार्थ खाणे टाळावे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.