Health : पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य संसर्गांपासून दूर राहण्यासाठी टाळा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या
पावसाळ्यामध्ये या गोष्टींचं पालन केल्यावर तुम्ही बुरशीजन आाजारांपासून दूर राहू शकता. हवेतील आर्द्रता तसेच ओलावा हा बुरशीच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी पोषक काळ मानला जातो.
मुंबई : मान्सूनमध्ये बुरशीजन्य संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. हवेतील आर्द्रता तसेच ओलावा हा बुरशीच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी पोषक काळ मानला जातो. पावसाळ्याच्या दिवसात बुरशीजन्य संसर्ग कसे टाळता येईल. याबाबत डॉ. मनीष पेंडसे (वरिष्ठ सल्लागार, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, मेडिकवर हॉस्पिटल्स) यांनी सांगितलं आहे.
बुरशीजन्य संसर्ग – स्विमिंग पूल, जिम आणि शॉवर रूममधून पसरू शकतो. या माध्यमांद्वारे संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या. या भागात अनवाणी चालणे टाळा. आपल्या वस्तु इतरांसोबत शेअर करण्याऐवजी स्वतःचे टॉवेल आणि वस्तू सोबत बाळगा. स्टिरॉइड क्रीम्सचा वापर करु नका.ते बुरशीजन्य संसर्ग वाढवतात. तुमचे टॉवेल, टोप्या, चादरी आणि उशा रोज धुवा.
वैयक्तिक स्वच्छता महत्त्वाची- पावसात भिजल्यानंतर आपले हात अँटीफंगल साबणाने स्वच्छ धुवा. नखांमध्ये होणारे बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी आपली नखं वेळवेळी कापा. गढुळ पाण्यात जाऊ नका. त्यासोबतच सुती कपडे वापर करा जे त्वचा कोरडी ठेवते आणि बुरशीपासून संरक्षण करते. तसेच, व्यायाम केल्यानंतर लगेच कपडे बदला.
भिजल्यानंतर शरीर कोरडे करायला विसरु नका- ओलसरपणामुळे त्वचेस बुरशी होऊ शकतो. त्यामुळे स्तन आणि पायाच्या बोटांमधील जागा स्वच्छ व कोरडी ठेवा. डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटीफंगल पावडर वापरा. कोणतीही उत्पादने स्वतःच्या मर्जीने वापरू नका कारण असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. पाय ओले राहू देऊ नका कारण त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
हायड्रेटेड रहा- जीवनसत्त्वे आणि खनिजांचा समावेश असलेल्या आहाराचे सेवन करा. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल आणि संसर्गापासून दूर राहण्यास मदत होईल.
दरम्यान, पावसाळ्यामध्ये या गोष्टींचं पालन केल्यावर तुम्ही बुरशीजन आाजारांपासून दूर राहू शकता. इतकंच नाहीतर आजारीसुद्धा पडणार नाही.