Back Pain: डेस्कजॉबमुळे रोज सहन करावी लागते पाठदुखी ? या उपायांनी मिळेल आराम

कामामुळे सतत खुर्चीत बसून राहिल्याने अनेक लोकांना पाठदुखीचा त्रास सतावतो. आजकाल बरेच लोकं या समस्येने ग्रस्त आहे. काही सोप्या उपायांनी पाठदुखी दूर करता येऊ शकते.

Back Pain: डेस्कजॉबमुळे रोज सहन करावी लागते पाठदुखी ? या उपायांनी मिळेल आराम
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 2:30 PM

नवी दिल्ली – कोरोना महामारीने लोकांचे जीवन आणि त्यांची जीवनशैली (lifestyle) पूर्णपणे बदलून टाकली आहे. या विषाणूमुळे संपूर्ण जगासह भारतातही वर्क फ्रॉम होम (work from home) म्हणजेच घरून काम करण्याची संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे ऑफीसमधील काम घरी बसून करणे सोपे झाले आहे, पण त्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागत आहे. स्क्रीन टाइम वाढल्यामुळे लोकांच्या डोळ्यांवर तर वाईट (stress on eyes) परिणाम झालाच पण पाठदुखीची (back pain)समस्याही सुरू झाली.

वर्क फ्रॉम होममुळे सुरू झालेली ही समस्या आता लोकांची पाठ सोडण्याचे नाव घेत नाहीये. बरेचसे लोक ऑफीसमध्ये जाऊन काम करत असले तरी या समस्येने त्रस्त आहेत. खरंतर अनेक तास सतत बसून काम केल्यामुळे लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. डेस्क जॉबमुळे तुम्हालाही पाठ आणि कंबरदुखीचा त्रास होतो का ? तसं असेल तर काह सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

योग्य स्थितीत बसावे

हे सुद्धा वाचा

सतत बसून राहिल्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो, पण चुकीच्या स्थितीत बसल्यास ही समस्या आणखी वाढू शकते. खरंतर अनेक लोकांना पुढे वाकून काम करण्याची सवय असते. इतकंच नाही तर अनेकदा मोकळ्या वेळेत मोबाईल वापरतानाही आपण नीट बसत नाही, त्यामुळे पाठीच्या कण्यावर खूप दबाव येतो. त्यामुळे तुम्हाला जर पाठदुखीच्या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर वाकण्याची सवय बदला. योग्य स्थितीत बसून काम करावे.

अध्येमध्ये ब्रेक घेत रहा

ऑफिसमध्ये अनेकदा एकाच जागी बसून काम केल्याने तुमच्या पाठीत किंवा कंबरेत दुखू शकते. अशा परिस्थितीत सतत एकाच जागी बसणे टाळावे. त्यासाठी काम करताना मध्येच ब्रेक घेत रहावा तसेच तेव्हा खुर्चीवरून उठून चालावे, फेऱ्या माराव्यात, सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर काही ना काही हालचाल करत राहा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत होईल आणि पाठदुखीच्या समस्येपासूनही आराम मिळेल.

खुर्चीवर करा हालचाल सतत बसून राहिल्यामुळे पाठीच्या कण्यावर परिणाम होतो, त्यामुळे पाठदुखीची समस्या सुरू होते. त्यामुळे कामातून ब्रेक घेण्याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या खुर्चीत बसून काही हालचाल देखील करू शकता. तुम्ही थोडं स्ट्रेचिंग किंवा रोटेशनचे हलके व्यायाम करू शकता.

उन्हात फिरावे

ऑफिसमध्ये सततच्या कामामुळे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण वेळ एकाच जागी बसता. अशा स्थितीत तुमच्या शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, ज्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डीची कमतरता हे देखील पाठदुखीचे कारण असू शकते. म्हणूनच दिवसा थोडा वेळ सूर्यप्रकाशात फिरावे किंवा थोडे ऊन अंगावर घ्यावे.

योग्य व पौष्टिक आहार घ्या

आपले आरोग्य हे आपल्या जीवनशैलीशी तसेच आपण काय खातो, कसा आहार घेतो, याच्याशी देखील संबंधित आहे. त्यामुळे तुम्ही जर पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात हेल्दी पदार्थांचा, पौष्टिक अन्नाचा समावेश करा. आहारात हिरव्या पालेभाज्या, आले, हळद, फळ यांचा समावेश करू शकता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.