Bad Cholesterol: ही एक गोष्ट खा आणि ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ला बाय बाय करा!

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे आधीच हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनी त्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी रोज सकाळी ओट्सचे सेवन करावे. यामध्ये भरपूर फायबर असते, जे शरीराला अनेक पोषक तत्त्वे पुरवतात. अनेक संशोधनाचा दावा आहे की ओट्स काही आठवड्यांत कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात.

Bad Cholesterol: ही एक गोष्ट खा आणि ‘बॅड कोलेस्ट्रॉल’ला बाय बाय करा!
ओट्स Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 6:24 PM

भारतात करोडो लोक हृदयविकाराचे बळी आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. अलीकडच्या वर्षांत, कार्डिओ व्हॅस्कुलर डिसीज (CVD) मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील देशात वाढले आहे. सर्वात आश्चचर्यकारक बाब म्हणजे हृदयविकारामुळे 20 ते 40 वयोगटातील लोकांनाही या काळात जीव गमवावा लागला आहे. आनुवंशिकता, मधुमेह, धूम्रपान-मद्यपान आणि वाईट पद्धतीची जीवनशैली याबरोबरच कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी ही हृदयविकाराची प्रमुख कारणे मानली जातात.कोलेस्टेरॉल हा शरीरात आढळणारा एक फॅटी पदार्थ आहे जो पेशींच्या पडद्याच्या निर्मितीचे काम करतो. कोलेस्ट्रॉल हे दोन प्रकारचे असते ज्यामध्ये चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल (bad cholesterol) चा समावेश होतो.

चांगले कोलेस्टेरॉल शरीराच्या आरोग्यास प्रोत्साहन देते तर खराब कोलेस्ट्रॉल मुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होऊ शकतो आणि अडथळे (Obstacles) निर्माण होतात. यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. तुम्हाला बॅड कोलेस्ट्रॉलचा त्रास दीर्घकाळ होत असेल तर त्याचे परिणाम भयंकर असू शकतात. तुमच्या जीवनशैलीत आणि आहारात छोटे बदल करून तुम्ही हा आजार वाढण्यापासून रोखू शकता. काही खादयपदार्थांचा वापर (Food consumption) करून तुम्ही काही आठवड्यात उच्च कोलेस्टेरॉल 30 टक्क्यांनी कमी करू शकता.

ओट्स हे उच्च कोलेस्टेरॉल कमी करेल

बहुतेक डॉक्टरांपासून ते आहारतज्ञांपर्यंत. सकाळच्या नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ खाणे. यामुळे शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा आणि पोषण मिळते. ओट्समध्ये भरपूर फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारचे पोषक असतात, ज्याचे सकाळी लवकर नाश्ता करून शरीराला अनेक फायदे मिळतात. देशातील फिटनेस आणि वेलनेस ऑर्गनायझेशन एबलनुसार, ओट्स तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास देखील मदत करू शकतात. ओट्समध्ये विरघळणारे आणि नविरघळणारे अशा दोन्ही प्रकारच्या फायबर चा समावेश असतो जे आपल्या शरीराची पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात. विरघळणारे फायबर बीटा ग्लुकन शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि दीर्घकालीन आजार दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

हे सुद्धा वाचा

हृदयविकारांसाठी काम करणाऱ्या यूके संस्थेच्या हार्ट यूकेने सांगितले की, ओट्समध्ये असलेले फायबर जेव्हा तुमच्या शरीरात प्रवेश करते तेव्हा ते शरीरात जेलीच्या स्वरुपात बदलते. हा जेल आतड्यांमधील कोलेस्टेरॉल युक्त बाईल ॲसिडला बांधण्याचे कार्य करते, जे तुमच्या रक्तप्रवाहात कोलेस्टेरॉलचे प्रमाण मर्यादित करण्यास मदत करते. यामुळे, तुमच्या यकृताला पित्त बनवण्यासाठी रक्तातून अधिक कोलेस्टेरॉल काढून टाकावे लागते, ज्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.