Weight Loss : वजन कमी करायचंय, व्यायाम न करता फक्त खाण्यात करा ‘या’ गोष्टीचा समावेश!
वजन कमी करण्यासाठी जीम लावणे, डाएट करणे असे अनेक उपाय लोक करत असतात. पण हवा तसा काही रिसल्ट मिळत नाही. फक्त खाण्यामध्ये या गोष्टींचा करा समावेश.

मुंबई : बदलती जीवनशैली, धकाधकीचे जीवन, बाहेरच्या पदार्थांचं अति प्रमाणात सेवन अशा अनेक गोष्टींमुळे बहुतेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. लठ्ठपणाच्या समस्येमुळे लोक चिंतेत पडतात. तसंच ते वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करतात. मग जीम लावणे, डाएट करणे असे अनेक उपाय लोक करत असतात. पण हे सगळे उपाय करूनही लोकांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर आता आपण काही अशा हेल्थी सॅलडबाबत जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास तुम्हाला मदत होईल.
1. स्प्राउट सॅलड – जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात स्प्राउट सॅलडचा समावेश करा. कारण स्प्राउट सॅलड हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते आणि ते आपलं वजन कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही स्प्राउट सॅलडचा समावेश तुमच्या आहारात आवर्जून करा.
2. बीटरूट सॅलड – बीटरूट हे आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असते. तसेच बीटरूटचे सॅलेड देखील फायदेशीर असते. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बीटरूट सॅलडचा समावेश नक्की करा. हे सॅलड बनवण्यासाठी खूप सोप्प आहे. यासाठी 1 कप चिरलेला कांदा, 1 कप दही, किसलेले बीटरूट, चवीनुसार मीठ हे सर्व नीट मिक्स करा. या तयार झालेल्या सॅलडचा समावेश तुम्ही जेवणात आणि नाश्त्यात करू शकता.
3. पांढर्या चण्यांचे सॅलड – पांढर्या चण्यांचे सॅलड हे आपल्या शरीराला लोह देते. तसेच ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आणि पौष्टिक असते. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर पांढर्या चण्यांचे सॅलडचा समावेश तुमच्या आहारात करा. तर हे सॅलड बनवण्यासाठी 1 कप चिरलेला कांदा, 1 कप शिजवलेले चणे, लिंबूचा रस, टोमॅटो आणि काकडीचे काप, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घ्या आणि हे सर्व नीट मिक्स करा. हे सॅलड तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते.