भाजी आणि फळांपासून तयार केलेला हा ज्युस पुरुषांसाठी टॉनिक, प्यायल्याने 5 फायदे
बिघडलेल्या जीवनशैलीने आता प्रत्येक जणाला अनारोग्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता घरातील उपलब्ध फळं आणि भाज्यांच्या ज्यूसमधून शरीरास पोषक तत्वं मिळू शकतात.
धावपळीच्या जीवनात लाईफस्टाईल बॅलन्स करणे कठीण होत चालले आहे. तणाव,कामाचा लोड आणि अनहेल्दी फूडमुळे आजारपण वाढत आहेत. पुरुषांमध्ये यामुळे अनेक वाईट सवयींमुळे शरीराला मोठा त्रास होतो.त्यामुळे आरोग्य चांगले राखण्यासाठी सफरचंद, बीट आणि गाजर यांच्या रसापासून तयार केलेला एबीसी ज्यूसचे पाच फायदे तुमचे आरोग्य चांगले राखतात…
एनर्जी बूस्टर –
एबीसी ज्यूसमध्ये नैसर्गिकरित्या साखर असते. त्यामुळे इस्टंट एनर्जी मिळते. त्यामुळे हा ज्यूस पुरुषांना खूप फायदेशीर असतो. या ज्युसमुळे शरीर न थकता अनेक तास काम करु शकते.
हार्ट डिसिज पासून बचाव –
बिटमध्ये नायट्रेट्स असतात ते हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. हे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी मदत करतात. आणि रक्ताभिसरण वाढवतात. त्यामुळे हृदयाचे आजार बरे होतात. पुरुषांत हृदय रोगाचे प्रमाण वाढल्याने त्यांना हा ज्यूस फायदेशीर आहे.
लठ्ठपणा नियंत्रित –
एबीसी ज्यूस मध्ये कमी कॅलरी असते आणि भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते.त्यामुळे जास्तीचे जेवल्यामुळे वाढणारा लठ्ठपणा आपोआप कमी होतो.
फर्टीलिटी वाढते –
जेवणाचा परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवर देखील होतो. एबीसी ज्यूसमुळे स्पर्मची क्वालीटी चांगली होते. हे ज्यूस एंटीऑक्सीडेंट आणि के, ए,सी आणि ई विटामिन्सने परिपूर्ण आहे.जे फर्टीलिटीसाठी आवश्यक आहे.
त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी –
एबीसी ज्यूसमधील पोषक तत्वाने त्वचा चमकदार होते. आणि त्वचेच्या सुरुकत्या कमी होतात. तसेच हे ज्युस केसांचे आरोग्य देखील चांगले करते. त्यामुळे केस गळती थांबते.
( सूचना : ही माहीती सामान्यज्ञानावर आधारित आहे. योग्य माहीतीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )