पेाटाची ‘चरबी’ वितळेल मेणासारखी.. दररोज प्या ‘हे’ पेय; पटकन कमी होईल पेाटाचा घेर!

| Updated on: Jul 23, 2022 | 3:59 PM

Magical drink on belly fat: पोटाच्या चरबीला ‘व्हिसेरल फॅट’ म्हणतात. वाढलेले पोट कमी करण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात. पण, तरीही त्यांच्या पोटाची चरबी कमी काही होत नाही. संशोधनानुसार, दररोज एका विशिष्ट पेयाचे सेवन केल्याने पोटावरील चरबी कमी होऊ शकते.

पेाटाची ‘चरबी’ वितळेल मेणासारखी.. दररोज प्या ‘हे’ पेय; पटकन कमी होईल पेाटाचा घेर!
Belly fat
Follow us on

बैठी जीवनशैली, कमी शारीरिक हालचाल, चुकीच्या खाण्याच्या सवयी यांमुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम (Bad results) होतो. तब्येत बिघडल्यामुळे शरीरात अनेक आजार उद्भवतात. वजन वाढणे, मधुमेह, सांधेदुखी या सर्व समस्या माणसाला अशक्त बनवू शकतं. आजच्या काळात बरेच लोक या समस्येशी झुंज देत आहेत आणि वजन घटविण्यासाठी कठोर परिश्रम देखील करत आहेत. बरेच लोक त्यांच्या पोटाच्या चरबीमुळे (Because of belly fat) देखील त्रासलेले असतात कारण पोटाची चरबी खुपच हट्टी असते. काही केल्या ती कमी होत नाही. छाती आणि कंबर यांच्यामधील भागाला ‘मिड्रिफ’ म्हणतात. संशोधन असे सूचित करते की, मिड्रिफच्या आसपासच्या भागात चरबी जमा झाल्यामुळे ‘हृदयरोग किंवा स्ट्रोकचा’ (heart disease or stroke‘)धोका लक्षणीय वाढतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, जर व्यक्ती रोज एक विशिष्ट पेय प्यायले तर ते पोटावरील चरबी कमी करण्यास मदत करू शकते. तुम्हालाही पोटाची चरबी कमी करायची असेल तर जाणून घेऊया या खास पेयाबद्दल.

वाढलेल्या चरबीमुळे अनेक समस्या

‘बेली फॅट’ला व्हिसरल फॅट असेही म्हणतात. ही चरबी पोटाच्या आत खोलवर साठवली जाते. अतिरिक्त चरबीमुळे ते यकृत आणि आतड्यांसह इतर अवयवांभोवती पसरते, ज्यामुळे आरेाग्या विषयी अनेक समस्या येऊ लागतात.

या पेया मुळे पोटाची चरबी वितळू शकते

The mirror च्या मते, खराब आहार,अतिरिक्त साखर, प्रक्रिया केलेले अन्न, सॅच्युरेटेड फॅट ही पोटातील चरबी जमा होण्याची प्रमुख कारणे आहेत. काही गोष्टी पोटाची चरबी कमी करण्यास मदत करू शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. काही संशोधनांनी पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यात मदत करण्यासाठी ‘सफरचंद सायडर व्हिनेगर’ (Apple cider vinegar) प्रभावी उपचारा पैकी एक असून ते पिण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. वास्तविक, सफरचंद सायडर व्हिनेगर हे एक आम्ल आहे जे AMPK एन्झाइम वाढवते. शास्त्रज्ञांचा दावा आहे की, हे एन्झाइम चरबी बर्न करण्यात मदत करते आणि साखरेचे उत्पादन कमी करते. संशोधनानुसार, सफरचंद सायडर व्हिनेगरमुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्ही कमी कॅलरीज खातात आणि पोटाची चरबी जाळण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

भूक कमी होते

एका संशोधनानुसार, उच्च कार्बोहायड्रेट आहारासह सफरचंद सायडर व्हिनेगर घेतल्याने भूक कमी होते, ज्यामुळे लोक 200-275 कमी कॅलरी खातात. 175 लोकांवर केलेल्या या संशोधनानुसार, सफरचंद सायडर व्हिनेगर रोज प्यायल्याने पोटावरील चरबी मेणासारखी वितळू लागली आणि वजनही कमी झाले.

किती प्रमाणात ‘ऍपल सायडर व्हिनेगर’ घ्यावे?

संशोधनात असे आढळून आले की, ज्यांनी एक चमचे व्हिनेगर घेतले त्यांचे तीन महिन्यांत 1.2 किलो वजन कमी झाले आणि दोन चमचे व्हिनेगर घेतलेल्यांचे वजन 1.7 किलो कमी झाले. दररोज एक ते दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर घेणे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानले जाते आणि चरबी देखील कमी करू शकते. सफरचंद सायडर व्हिनेगर सुरक्षितपणे पिण्यासाठी, तुम्ही ते पाण्यात मिसळून प्यावे.