Coconut Water Benefits : रोज रिकाम्या पोटी प्या नारळाचं पाणी; मिळतील अनेक फायदे, कोणते? वाचा…

रोज नारळाचं पाणी पिणं हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. नारळाच्या पाण्यात खूप पोषक तत्वं असतात, जी आपल्या शरीरसाठी लाभदायक असतात. नारळाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.

Coconut Water Benefits : रोज रिकाम्या पोटी प्या नारळाचं पाणी; मिळतील अनेक फायदे, कोणते? वाचा...
नारळ पाणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 4:02 PM

नारळाचं पाणी (शहाळं) प्यायला (Coconut water) आवडत नाही, असा माणूस सापडणं विरळंच आहे. नारळाचे पाणी अतिशय स्वादिष्ट आणि हेल्दी (Tasty and healthy) असतं. त्यामुळे आपल्याला उर्जा मिळते. नारळाचे पाणी प्यायल्याने आपला मेंदू आणि शरीर ताजंतवानं होतं आणि उर्जाही मिळते. नारळ पाण्यात कॅलरीज अतिशय कमी असतात. मात्र त्यामध्ये पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात असतात. हे एक सुपर ड्रिंकच्या रुपात आपल्या शरीरात काम करते. नारळाचे पाणी प्यायल्याने (Drink coconut water daily) शरीर डिटॉक्सीफाय होण्यासही मदत होते. तसेच आपले शरीर हायड्रेटेड राहते. शरीरात पाण्याची कमतरता रहात नाही. रोज अंशपोटी म्हणजेच रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. जाणून घेऊया नारळ पाणी पिण्याचे फायदे …

वजन कमी करण्यास मदत करते

नारळ पाण्यात अनेक पोषक तत्वे असतात. त्यामध्ये पोटॅशिअमही असते. तसेच बायोॲक्टिव्ह ॲंजाइम असतात. त्यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते. नारळाचे पाणी प्यायल्यामुळे अधिक कॅलरीज बर्न करण्यासही मदत मिळते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त वजन कमी होते. तसेच नारळ पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता.

हायड्रेटेड ठेवते

नारळाच्या पाण्यात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स अतिशय कमी प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये पोटॅशिअम, सोडिअम आणि मॅग्नेशिअम सारखी पोषक तत्वं असतात. नारळाचं पाणी पिणे हे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असते. व्यायाम करताना नारळाचे पाणी पिऊ शकता. त्यामुळे तुमचे शरीरा हायड्रेटेड राहते, शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. नारळ पाण्यामुळे थकवा, सुस्ती, अशक्तपणा आणि चक्कर येणे यासांरख्या समस्यांपासून दूर होतात.

हे सुद्धा वाचा

बॅड कोलेस्ट्रॉल

नारळ पाण्याचे नियमित सेवन करणे हे कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी कमी करण्यास लाभदायक ठरते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

किडनी स्टोनवर प्रभावी

किडनी स्टोनच्या आजारापासून लांब रहायचे असेल तर शरीर हायड्रेटेड राहणे, अत्यंत महत्वपूर्ण आहे. अशा वेळी तुम्ही रोज, नियमितपणे नारळ पाण्याचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले ठरते. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहरे पडतात. तसेच किडनी स्टोनच्या आजारातही नारळ पाणी प्रभावी ठरते.

निरोगी त्वचा

नारळ पाण्यात ॲंटी-मायक्रोबिअल गुण असतात. त्यामुळे मुरुमं, त्वचेच्या समस्या, पिंपल्स यांच्याशी लढा देण्यात मदत मिळते. नियमितपणे नारळ पाणी प्यायल्याने फ्री रेडिकल्समुळे शरीराचे होणारे नुकसान टळते. निरोगी आणि चमकदार त्वचा हवी असेल तर रोज नारळ पाणी प्यावे.

उच्च रक्तदाब

नारळ पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत होते. नारळ पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखी पोषक तत्वं असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.