Health : हसण्याचेच नाहीतर पण रडण्याचेही असतात आरोग्यदायी फायदे… जाणून घ्या!

तुम्हाला माहितीये का की हसण्यासोबतच रडणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तर रडण्याने आपल्या आरोग्याला काय फायदे होतात याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Health : हसण्याचेच नाहीतर पण रडण्याचेही असतात आरोग्यदायी फायदे... जाणून घ्या!
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 11:18 PM

मुंबई : प्रत्येकजण आपल्याला हसण्याचा आणि खुश राहण्याचा सल्ला देत असतो. हसणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि आरोग्यदायी असते. त्यामुळे डॉक्टरसुद्धा नेहमी आपल्याला आनंदी राहण्याचा सल्ला देतातच. हसणं जसं आरोग्यदायी आहे तसंच रडणं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? असं म्हटलं जातं की रडल्यामुळे अशक्तपणा येतो. पुरुषांपेक्षा स्त्रिया या अधिक भावनिक असतात त्यामुळे बहुतेक स्त्रिया रडतात. पण तुम्हाला माहितीये का की हसण्यासोबतच रडणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तर रडण्याने आपल्या आरोग्याला काय फायदे होतात याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

तणाव कमी करण्यास उपयुक्त

आपण रडत असताना आपल्या शरीरात कॉर्टिसॉल नावाची हार्मोनची पातळी असते ती कमी होते. ती पातळी कमी झाल्याने आपला ताण कमी होतो. यामुळे मानसिक तणाव कमी होत शरीराला आराम मिळतो.

भावनिक आराम मिळतो

जेव्हा आपण काही कारणास्तव रडत असतो तेव्हा रडता रडता आपण आपल्या सर्व भावना व्यक्त करतो. त्यामुळे आपलं मन मोकळं होतं आणि आपल्याला भावनिक आधार मिळतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

रडणे हे आपल्या हृदयसाठी फायदेशीर ठरते. कारण रडल्यामुळे आपल्या नसांमध्ये रक्ताभिसरण वाढते त्यामुळे आपले हृदय निरोगी राहते. सोबतच रडल्यामुळे हृदयाचे ठोके स्थिर होतात. रक्तदाबही कमी होतो.

चांगली झोप मिळते

बहुतेक लोकांना तणाव, मानसिक अस्वस्थतेमुळे रात्री लवकर झोप लागत नाही. पण रडल्याने अशा लोकांना रात्री चांगली झोप येते आणि त्यांचे मनही शांत होते, तणाव कमी होतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

रडण्याचे डोळ्यांसाठीही फायदे आहेत. आपण रडत असताना आपल्या डोळ्यांच्या आत बसलेले बॅक्टेरिया बाहेर पडतात. त्यामुळे डोळे स्वच्छ होतात आणि डोळ्यांचे अनेक आजारांपासून संरक्षण होते.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.