हिवाळ्यातील सुपरफूड सालीसह खावे की सालीशिवाय? सांधेदुखी पासून मधुमेहापर्यंत, आश्चर्यकारक फायदे
हिवाळ्यात या सुपरफूडचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. पण प्रश्न एकच आहे की हे सुपरफूड सालीसह की सालीशिवाय खावे ते. जाणून घ्या आरोग्यासह याचे त्वचा आणि केसांसाठीही बरेच फायदे आहेत.
हिवाळा आला की शक्यतो आपले आजार बळावतात. त्यासाठी हिवाळा आला की तब्येत सांभाळा असं म्हटलं जात. म्हणून आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी काही आवश्यक पदार्थांचे सेवन करणे खूप महत्वाचे असते. त्यासाठी हिवाळ्यात बाजारात येणारे एक कंदमुळे खूप फायदेशीर ठरू शकते. ते म्हणजे पौष्टीक रताळे.
हिवाळ्यातील सुपरफूड
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि मँगनीज मुबलक प्रमाणात असते. रताळे कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असते. रताळ्याचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. म्हणून रताळ्याला हिवाळ्यातील सुपरफूड मानलं जातं. रताळे खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. त्यामुळेच या सुपरफूडचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.
पण काहीजण रताळे हे साल काढून खातात तर काहीजण रताळे सालीसकट खाणे पसंत करतात. यापैकी कोणती पद्धत आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. साली सकट रताळे खाणे की साल काढून. जास्त फायदा कशाने होईल. पाहुयात तज्ज्ञांनी याबद्दल काय सांगितले आहेत.
तज्ज्ञ काय म्हणतात?
प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी नुकताच तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर या प्रकरणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, पोषणतज्ज्ञांच्या मते बहुतेक लोक रताळ्याची साल काढून खातात. पण असे न करता ते सालीसह खाणे अधिक फायदेशीर आहे.
रताळे सालीसह का खावेत?
फायबर दीपशिखा जैन सांगतात, बरेच लोक वजन कमी करण्यासाठी रताळे खातात कारण त्यात फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबर-समृद्ध गोष्टींमुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्याचा अनुभव येतो. त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही आणि तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे रताळ्याच्या सालीमध्ये रताळ्यापेक्षा जास्त फायबर असते. जेव्हा तुम्ही रताळे सोलून खातात तेव्हा ते फायबरचे प्रमाण सुमारे 50 ते 60 टक्क्यांनी कमी करते. अशा स्थितीत रताळ्याची साल काढून खाण्यापेक्षा ते नीट धुवून स्वच्छ करून आणि सालासह सेवन केलं तर त्याचे जास्त फायदे होतील.
पोषकतत्व ‘फायबरप्रमाणेच रताळ्याच्या त्वचेसाठी लागणारे आवश्यक पोषक घटक जास्त प्रमाणात असतात. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत रताळे सोलल्यानंतर हे पोषक तत्व मिळत नाहीत.
आतड्यांचे आरोग्य चांगले राहते
दीपशिखा जैन यांनी आतड्याच्या आरोग्यासाठी रताळे सोलून न काढता खाण्याचा सल्ला दिला आहे. न्यूट्रिशनिस्टच्या मते, ‘रताळ्याची साल आतड्यात फायदेशीर बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते.
पचनक्रिया व्यवस्थित होते
हिवाळ्यात रोज रताळे खाल्ल्याने पोटातील चांगल्या सूक्ष्मजंतूंची संख्या वाढते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते. हिवाळ्यात त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या वाढतात. त्यामुळे रताळे खाल्ल्याने यापासूनही आराम मिळतो.
मधुमेहींसाठी उत्तम
एवढच नाही तर सांधेदुखी पासून मधुमेह असणाऱ्यांनी तर रताळे आवर्जून खावे नक्कीच आराम मिळतो. रताळ्यामध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म देखील असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 54 आहे, परंतु ग्लायसेमिक लोड फक्त 11 आहे.
त्यामुळे मधुमेहींसाठी ते चांगले मानले जाते. रताळ्यात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात. रिफाइन्ड कार्ब्सपेक्षा ते पचायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही आणि त्यामुळे भरपूर ऊर्जाही मिळते. पण ते मर्यादित प्रमाणातच खावे.