दिवस सोन्यासारखाच नाही तर मोत्यासारखा जाईल; फक्त सकाळी उठून या गोष्टी करा
सकाळी उठून पाणी, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स (जसे की आक्रोड), आणि प्रथिनांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ध्यान आणि सूर्यनमस्कार शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारतात. सकाळचा नाश्ता शरीराला ऊर्जा देतो आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे.
सकाळी उठा, व्यायाम करा, योगा करा, शुद्ध हवेत फिरायला जा… मन प्रसन्न राहील, असं थोरामोठ्यांकडून नेहमी सांगितलं जातं. त्यांच्या अनुभवातून ते सांगत असतात. पण त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. सकाळी लवकर उठल्याने तब्येत चांगली राहते. रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठल्यावर दिवसही चांगला जातो. सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने होते. मन प्रसन्न होते आणि सर्व कामे वेळेवर होतात. त्याचप्रमाणे, सकाळी उठून काही विशिष्ट गोष्टी खाल्ल्या तर भरपूर एनर्जी मिळते. त्यामुळे आपण दिवसभर अधिक सक्रिय राहतो. सकाळी उठून काय खाल्ल्यास आरोग्य चांगले राहते हेच आज आपण जाणून घेऊ.
पाणी
दररोज सकाळी उठून पाणी पिणे आवश्यक आहे. गरम पाणी आरोग्यासाठी चांगले आहे. यामध्ये मध, लिंबू, हळद इत्यादी मिसळून प्याल्यास उत्तम. यानंतर चहा किंवा कॉफीही पिऊ शकता. यामुळे पचनसंस्था मजबूत होईल.
ओमेगा
शारीरिक आरोग्यासोबतच त्वचेची देखभाल करणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच त्वचा मऊ आणि सुंदर ठेवण्यासाठी ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स खाणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही रात्री आक्रोड भिजवून ठेवून सकाळी ते खाऊ शकता, किंवा त्याचे तेल वापरू शकता.
ध्यान
सकाळी सकाळी ध्यान करणे कधीही चांगले. सकाळी लोक जेवण करतात. ऑफिस किंवा शाळेत जातात. पण सकाळी ध्यान करणे फार महत्वाचे आहे. उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर साधारण 10 मिनिटे ध्यान केले तर शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न राहतात. काही लोक व्यायामासाठी जिमलाही जातात. यामुळे दिनचर्येत शारीरिक व्यायामही महत्त्वपूर्ण आहे.
सूर्य नमस्कार
मन आणि मेंदू शांत करण्यासाठी दररोज सूर्य नमस्कार करावा लागतो. दररोज साधारण 7 मिनिटे सूर्य नमस्कार केल्यावर खूप फायदे होतात. यामुळे श्वसनसंस्थेचे नियंत्रण होते आणि शरीर आणि मनात बदल जाणवतात.
म्हणूनच सकाळी सकाळी अशा अनेक गोष्टी केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. त्याचप्रमाणे सकाळी खाल्लेले अन्न शरीरासाठी आणि त्वचेसाठी फारच महत्त्वाचे आहे. सकाळच्या नाश्त्यात नेहमी प्रथिनयुक्त अन्न समाविष्ट करणे आवश्यक आहे. त्यात तुम्ही गुळाचा लोणचं, गुळाचे शंकरपाळे इत्यादी खाऊ शकता. यामुळे आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असते.