Fact Check | मासिक पाळीच्या काळात कोरोना लस घेऊ नये, मेसेजमधील दावा खरा की खोटा?
महिलांनी मासिक पाळीच्या (Menstrual Period) काळात कोरोना लस घेऊ नये, असा दावा केला जात आहे. (Don't Take Vaccine during menstrual period Viral Message is Fake)
मुंबई : केंद्र सरकारने येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील लोकांना कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार येत्या 1 मे पासून अठरा वर्षावरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोरोना लसीबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे. यात महिलांनी मासिक पाळीच्या (Menstrual Period) काळात कोरोना लस घेऊ नये, असा दावा केला जात आहे. या मेसेजमधील दावा खरा की खोटा? याची माहिती घेतली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आलं आहे. अफवांपासून लांब राहा!, असे आवाहन मुंबई महापालिकेने दिले आहे. (Don’t Take Vaccine before and after 5 days of menstrual period Viral Message is Fake)
व्हायरल होणाऱ्या मेसेजमधील दावा काय?
महिलांसाठी विशेष सूचना – येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तींना लसीकरणाची मोहिम सुरु होणार आहे. परंतु महिलांसाठी हे महत्त्वाचे आहे की मासिक पाळीची तारीख आणि कधी घ्यावे हे समजूनच लसीकरणाचा निर्णय घ्यावा…
मासिक पाळीच्या पाच दिवस अगोदर किंवा पाच दिवसानंतर लसीकरण करु नये. कारण त्यावेळेस आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता फार कमी झालेली असते. लसीकरण हे सुरुवातीला आपाली रोगप्रतिकारक क्षमता कमी करते आणि नंतर ते खूप झपाट्याने वाढवते. जेव्हा आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी असते तेव्हा कोरोना लागण होण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून ही खबरदारी घ्यावी.
कृपया ही माहिती आपल्या घरात, मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य सांगा…लसीकरणाला देऊ साथ… कोरोनावर करु मात…, असे यात म्हटले आहे. याबाबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Code Red: Break The Fake News Cycle
This message in circulation is propagating falsehoods and misinformation.
There is no data on menstruation altering the efficacy of the vaccine.
All eligible citizens can and should take the vaccine as soon as they can. #FakeNewsAlert pic.twitter.com/TvfxKycYD1
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2021
दावा खरा की खोटा?
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या मेसेजमधील दावा खोटा आहे. अफवांपासून लांब राहा!, असे आवाहन मुंबई महापालिकेने दिले आहे. महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. यातील माहिती खोटी असून, मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पसरवू नका, असे ट्वीट मुंबई महापालिकेने केले आहे.
त्यामुळे व्हायरल होणारा हा फोटो खोटा असल्याचे समोर आलं आहे. मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळे महिलांनी या दाव्यावर विश्वास ठेऊ नये.
अफवांपासून लांब राहा!
महिलांनी मासिक पाळीच्या कालावधीत लस घेऊ नये अशा आशयाचा संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे
यातील माहिती खोटी असून, मासिक पाळी सुरू असताना लस घेतल्यास आपल्या शरीरावर कुठलाही परिणाम होत नाही
कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका व त्या पसरवू नका#FakeNewsAlert pic.twitter.com/D4Ktm8phaq
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2021
(Don’t Take Vaccine before and after 5 days of menstrual period Viral Message is Fake)
संबंधित बातम्या :
राज्यात 14 ठिकाणी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, कोणत्या महापालिका क्षेत्रात किती प्लांट?
मुंबईकरांनो कोरोना लसीकरण करायचं? तुमच्या जवळचे कोणते केंद्र आज सुरु, कोणते बंद? पाहा यादी