चाइल्ड पोझपासून कोब्रा… लवचिक व्हायचंय? मग ही योगासने कराच

धकधकीच्या आयुष्यात आरोग्य आणि ऊर्जा राखणे महत्त्वाचे आहे. कामाचा ताण आणि चुकीची जीवनशैली शरीराची ताठरता वाढवते. हा लेख चाइल्ड पोझ, कोब्रा पोझ, लेटरल स्ट्रेच, साइड ट्विस्ट, कॅमल पोझ, लो लंज, पप्पी पोझ आणि मलासाना ट्विस्टसारख्या सोप्या योगासनांचा परिचय करून देतो. ही आसने नवशिक्यांसाठीही सोपी आहेत आणि शारीरिक व मानसिक आरोग्याला फायदेशीर ठरतात.

चाइल्ड पोझपासून कोब्रा... लवचिक व्हायचंय? मग ही योगासने कराच
आरामदायी आसनामुळे शरीराला आराम तर मिळतोच पण रक्तदाबही नियंत्रित राहतो. या आसनामुळे शरीरातील स्नायूंचा ताण कमी होतो आणि शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली सुधारते.
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 2:07 PM

धकधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला ताजंतवानं राहावसं वाटतं. निरोगी राहण्याबरोबरच ऊर्जावान राहण्यावर सर्वांचा भर असतो. पण रोज तास न् तास काम केल्याने थकवा येतो. चुकीच्या पोझिशनमध्ये झोपणे आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीराशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कमर आणि गळा दुखण्यास सुरू होतं. तसेच स्थूल होतं. पण या गोष्टी भविष्यात अनेक इतर समस्यांसाठी कारणीभूत ठरू शकतात. म्हणूनच, शरीराला लवचिक बनवण्यासाठी आणि शरीराचा कडकपणा कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या व्यायाम, स्ट्रेचिंग आणि योगासन केले जातात.

योग हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायद्याचे असते. योग शरीराला लवचिकतेसह तंदुरुस्त ठेवते. एका प्रसिद्ध योग प्रशिक्षकाने त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने शरीराच्या ताठरतेपासून मुक्त होण्यासाठी आणि लवचिकता वाढवण्यासाठी काही सोपे योगासन सूचवले आहेत. ज्यांना योगाची सुरुवात करायची आहे, ते देखील ही योगासने सहजपणे करू शकतात. ही योगासने कोणती आहेत, त्याचीच आपण चर्चा करणार आहोत.

चाइल्ड आणि कोब्रा पोझ

चाइल्ड पोझपासून कोब्रा (भुजंगासन) पोझपर्यंत योगासन करण्यासाठी, चाइल्ड पोझमध्ये जा. नंतर कोब्रा पोझमध्ये बदला. चाइल्ड पोझ मणक्याच्या दुखापतीमध्ये आराम देते. त्यामुळे मणक्याच्या आणि पाठीच्या स्नायूंना आराम मिळतो. यासोबतच, कोबरा पोझ पचनक्रिया सुधारण्यास, मणका मजबूत करण्यास आणि लवचिकता वाढवण्यास मदत करू शकतो.

हे सुद्धा वाचा

स्ट्रेच प्लस

स्ट्रेचिंग शरीराला सक्रिय आणि लवचिक बनवण्यास मदत करते. कोणत्याही प्रकारचा व्यायाम किंवा धावण्यापूर्वी स्ट्रेचिंग करण्याची शिफारस केली जाते. लेटरल स्ट्रेच प्लस कंबरेसाठी आणि मणक्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे मांडी आणि खांद्यांना देखील आराम मिळतो.

साइड ट्विस्ट

साइड ट्विस्ट केल्याने अनेक फायदे होतात. साइड ट्विस्ट पोटासाठी फायदेशीर असतो. त्यासोबतच गळ्याशी, खांद्या आणि हातांशी संबंधित समस्या सुधारू शकतात.

कॅमल पोझ

कॅमल पोझ शरीराची लवचिकता वाढवते. बॅकबेंड्सला मजबूत करते. पाठ आणि खांद्यांना बळ देते. मणका लवचिक बनवते आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

लो लंज

लो लंजला अंजनेयासन देखील म्हणतात. या योगासनाने पार्श्वभागपासूनचा भाग लवचिक होतो. यामुळे संतुलन आणि एकाग्रता वाढते. हे आसन शरीराची ताकद वाढवते.

पप्पी पोझ

पप्पी पोझ गळा, खांदे आणि पाठी खालच्या भागातील वेदनांना आराम देते. या योगासनामुळे मणके मजबूत आणि लांब बनवण्यास मदत होते. या योगासनामुळे शरीर लवचिक बनवते आणि गळा आणि पाठीला स्ट्रेच मिळतो. त्यामुळे ताठरता आणि स्थुलपणाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

मलासाना ट्विस्ट

मलासाना शरीराला टोन करण्यास मदत करतो. हे आसन वेदना कमी करण्यास, गुडघ्यांच्या सांध्यातील आणि हातांच्या सांध्यातील वेदनांपासून आराम देते. यामुळे शरीरातील ताण कमी होतो.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.