25व्या-30 व्या वर्षीही होऊ शकतो स्तनांचा कर्करोग, लक्षणे कशी ओळखावी?
स्तनांच्या कर्करोगाची प्रकरणेही कमी वयातच समोर येत आहेत. आता 25 ते 30 वयोगटातील महिलाही स्तनांच्या कर्करोगाला बळी पडत आहेत. नियंत्रण कसे मिळवायचे? वाचा.
एक आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार भारतात स्तनांचा कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. वर्ष 2022 मध्ये कर्करोगाचे 14 लाखांहून अधिक रुग्ण होते. त्यापैकी स्तनांच्या कर्करोगाची प्रकरणे पहिल्या पाचमध्ये होती. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बिघडलेली जीवनशैली आणि वाढता लठ्ठपणा हे या स्तनांच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.
आता हा कर्करोग होण्याचा पॅटर्नही बदलत चालला आहे. एकेकाळी वयाच्या पन्नाशीनंतर महिलांमध्ये ब्रेस्ट कर्करोगाची प्रकरणे समोर येत होती, पण आता वयाच्या 25 ते 30 व्या वर्षीच महिला या कर्करोगाला बळी पडत आहेत.
गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका 29 वर्षीय तरुणीला स्तनांचा कर्करोग झाल्याचं समोर आलं. स्वंयतपासणी केली असता तिच्या एका स्तनात गाठ आढळून आली. या गाठीची तपासणी केली असता हा स्तनांचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले.
अनुवांशिक कारणांमुळे हा कर्करोग झाला असा कोणताही इतिहास त्या तरुणीचा नव्हता, पण तरीही इतक्या लहान वयात तिला कर्करोग झाला होता. तिच्यावर उपचार झाले पण केमोथेरपीचे दुष्परिणाम झाले आणि तिला डोक्याचे केस साफ करावे लागले. पण हळूहळू नंतर योग्य उपचार मिळाले. गुरुग्राममधील मॅक्स हॉस्पिटलमधील हे प्रकरण आहे.
उपचार कसे ?
केमोथेरपीच्या आठ फेऱ्या करण्यात आल्या. या प्रकरणात रुग्णाची इच्छाशक्ती महत्त्वाची भूमिका बजावते. तरुणीच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे तिला कर्करोगासारखा आजारावर मात करता आली आहे, अशी प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली.
स्तनांची स्वयंतपासणी का महत्वाची?
डॉक्टरांच्या मते स्तनाची स्वयंतपासणी खूप महत्त्वाची आहे. यामुळे हा कर्करोग वेळीच ओळखता येतो. स्व-तपासणीत स्त्रिया स्वत: आपल्या स्तनांची तपासणी करतात. स्तनात असामान्य बदल आढळल्यास ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.
स्तनांची स्वयंतपासणी करताना, आपल्या स्तनांचा आकार, रंग आणि पोतमध्ये काही बदल झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या स्तनांची तपासणी करा. काही वेगळे वाटले की डॉक्टरांशी संपर्क साधा.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे खालीलप्रमाणे
स्तनाचा भाग घट्ट होणे किंवा सूज येणे
स्तनाच्या त्वचेची जळजळ किंवा मंदपणा
स्तनाग्र भागात किंवा स्तनामध्ये लालसरपणा किंवा फ्लॅकी त्वचा
स्तनाच्या आकारात वाढ होणे
थोड्या कालावधीत स्तनाच्या आकारात बदल होणे
स्तनाच्या एक तृतीयांश भागावर पसरणारे पुरळ, वेदना, खाज सुटणे, स्तनांपैकी एकाला सूज येणे, स्तनाग्र उलटे किंवा मागे वळणे आणि स्तनाची त्वचा संथ होणे यांचा समावेश होतो.