Bruxism: झोपेत दात आवळणे आणि पोटात जंत होण्याचा काय संबंध आहे? त्याकडे दुर्लक्ष करु नका, आरोग्याला धोका पोहचू शकतो
ब्रुक्सिझम टाळण्यासाठी त्यावर महत्वाचा उपाय म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे. त्याबरोबरच सर्वात महत्वाचे म्हणजे चांगली झोप घेणे. व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप घेणे खूप महत्वाचे आहे.
मुंबईः झोपेत दात आवळणे किंवा पोटात जंत होण्याचा काय संबंध आहे? त्याकडे दुर्लक्ष करु नका, आरोग्याला धोका (Health Problem) पोहचू शकतो अनेकांना झोपेत दात आवळण्याची किंवा खाण्याची सवय असते. खरं तर ही सवय नसून एक आजार आहे. झोपेत (Sleep) दात आवळण्याच्या या आजाराला वैद्यकीय भाषेत ब्रक्सिझम (Bruxism) म्हणतात.ज्याला हा आजार होतो, त्याचा त्याच्या झोपेवर परिणाम होतो. दात आवळल्यामुळे किंवा दात एकमेकांवर घासल्यामुळे दात खराब होतात. याचा परिणाम श्वास घेताना त्रास होतो.
त्यामुळे हे एक लक्षात घेतले पाहिजे की, हा रोग तसा स्वतःच बरा होतो. मात्र हा रोग दीर्घकाळानंतरही बरा झाला नाही तर त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणत्याही चांगल्या दंतवैद्याकडे (Dentist) किंवा ईएनटी तज्ज्ञांची भेट घेणे गरजेची आहे.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या
या रोगाचा लहान मुलांना त्रास असेल तर त्याचा संबंध पोटात होणाऱ्या दंताच्या त्रासाबरोबर जोडला जातो. पोटाच कृमी झाल्यामुळे दात खात असेल असे काहींचे मत असते मात्र पोटात दंत होण्याचा आणि दात खाण्याचा तसा संबंध नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे मुलांना हा त्रास असेल तर तुम्ही नक्कीच एकाद्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे असते.
आजार काय आहे?
एका अहवालानुसार, दात खाणे हा आजार असल्यामुळे दोन्ही जबड्यांचे दात तोंडात घासले जातात. ज्या व्यक्तीला याचा त्रास असतो ती व्यक्ती झोपेत असल्यामुळे दात खाताना त्यांना लक्षात येत नाही. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीकडूनच अशा माणसाला दात खाण्याचा किंवा त्याचा त्रास असल्याचे सांगितले जाते.
रोग आपोआप बरा होतो
क्विंटच्या अहवालानुसार, मॅक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नोएडा येथील ऑर्थोडोंटिक्स आणि डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्सचे संचालक डॉ. चारू नैथानी म्हणतात की, बहुतेक प्रकरणांमध्ये, रोग स्वतःच बरा होतो. जर असे होत नसेल तर दंतचिकित्सक किंवा ईएनटी तज्ज्ञांशी संपर्क साधून त्यावर उपाय करणे गरजेचे असते.
तोंडाच्या स्नायूंमध्ये त्रास
ब्रक्सिझम म्हणजे दात एकमेकांना घासल्यामुळे तोंडाच्या स्नायूंमध्ये त्रास होतो. त्याची महत्वाची लक्षणे असतात झोपेत दातांमधून आवाज येतो. सकाळी उठल्यावर डोक्यात थोडासा त्रास होतो. घसा खवखवणे, जबड्यात जडपणा, दातांमध्ये संवेदनशीलता, तणाव, नैराश्य, निद्रानाश असा त्रास संभवण्याची शक्यता असते.
कारण काय असू शकते?
दात खाणे किंवा झोपेत ते एकमेकांना घासण्यामागे अनेक कारणे असताता. त्यातील प्रमुख कारण म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया म्हणजेच तोंड बंद असताना जबड्यातील दात नीट बसत नाहीत, तणाव, थकवा, राग हीही कारणे असू शकतात. त्याच वेळी, जास्त दारू पिणे, जास्त धूम्रपान करणे आणि किंवा जास्त चहा/कॉफी पिणे यामुळेदेखील ही समस्या उद्भवू शकते. स्लीप एपनिया हे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. झोपेत असताना घोरणे किंवा श्वास घेण्यात अडथळे यांमुळे व्यक्ती झोपेतही दात खाते किंवा एकमेकांना ते घासत असतात
चांगली झोप घ्या
ब्रुक्सिझम टाळण्यासाठी त्यावर महत्वाचा उपाय म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे. त्याबरोबरच सर्वात महत्वाचे म्हणजे चांगली झोप घेणे. व्यक्तीने 7 ते 8 तासांची झोप घेणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे जबड्याला होणारा त्रासही कमी होतो. झोपेची तयारी करताना किंवा झोपण्याआधी टीव्ही, मोबाईल इत्यादींचा वापर टाळा. चिंता, तणाव आणि नैराश्य टाळणे हे देखील महत्त्वाचे आहे. चहा-कॉफी, सिगारेट, दारूचे व्यसन टाळा. दंततज्ज्ञांच्या मतानुसार माउथ गार्ड्स देखील लावता येतात. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे समस्या कळताच डॉक्टरां त्वरित संपर्क साधा.
संबंधित बातम्या
Skin Care Tips : लिंबाची पाने त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, जाणून घ्या त्याचे फायदे!
Skin Care | सनस्क्रीन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, मात्र खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा!
Egg | खरोखरच अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का? जाणून घ्या रीयल फॅक्ट…