Weight Loss Exercise : चालण्याने महिन्याला एक ते दोन किलो वजन कमी होते, रोज एवढे चालले तरी पुरे

ज्यांना जिम करण्यासाठी जास्त वेळ देता येत नाही त्यांना चालण्यासारखा सोपा व्यायाम नाही. चालण्याने दररोज आपले वजन एक ते दोन किलोने कमी करणे फारसे अवघड नाही.

Weight Loss Exercise : चालण्याने महिन्याला एक ते दोन किलो वजन कमी होते, रोज एवढे चालले तरी पुरे
WALKImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 3:01 PM

नवी दिल्ली : हल्लीच्या धावपळीच्या जीवनात आपल्या प्रकृतीला चांगले राखण्यासाठी दररोज चालण्यासारखा सोपा व्यायाम नाही. परंतू योग्यप्रकारे चालण्यानेच वजन कमी होण्यास मदत होते.  फिटनेस राखण्यासाठी आपल्याला दररोज चालणे गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेक लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डायटींग प्लान आणि एक्सरसाईज करीत असतात. परंतू फारसे वजन कमी होत नसल्याने नाराज होत असतात. कारण आपण डाएट आणि वर्कआऊट चुकीच्या पद्धतीने करीत असतो. त्यामुळे चालण्याची योग्य पद्धत आणि आहार पाहुयात…

फिटनेस ट्रेनर सिमरन वलेचा यांनी इंस्टाग्रामवर वजन कमी करण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. त्यांच्या सूचनांचे पालन केले तर आपण रोज एक तास चालण्यानेही आपल्या कॅलरी घटवू शकतो. चालण्याने आपण आहारातून जितक्या कॅलरी मिळवतो त्यापेक्षा किती अधिक कॅलरी जाळू शकतो. महिलांना जिम करण्यासाठी जास्त वेळ देता येत नाही त्यांना चालण्यासारखा सोपा व्यायाम नाही. चालण्याने दररोज आपले वजन एक ते दोन किलोने कमी करणे फारसे अवघड नाही. डाएटमध्ये आपण साखर आणि इतर गोड पदार्थ टाळून इतर सर्व पदार्थांचा वापर करू शकता. आणि दररोज चालल्यास आपल्याला सहज दोनशे ते तीनशे कॅलरी नष्ट करू शकता.

आपल्या शरीराची हालचाल झाल्याने आपल्याला हेल्दी राहण्यास मदत मिळणार आहे. शरीराची हालचाल करण्यासाठी रोज वेगाने चालल्यामुळे आपल्याला उत्साही वाटायला लागेल आणि आपले वजनही कमी होण्यास मदत मिळणार आहे. आपण कमी कॅलरीचा आहार घ्यायला हवा परंतू स्नायूंचे नुकसान रोखण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घ्यायला हवा असे फिटपाटशालाचे सह – संस्थापक रचित दुआ यांना सांगितले आहे.

चालणे का महत्वाचे आहे

एक्सपर्टच्या मते चालण्याला सगळ्यात कमी महत्व दिले जाते. परंतू ही व्यायामाची जरी सोपी पद्धत असली तरी ती असरदार असते. बॉडी फिट राखण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी चालणे उपयुक्त आहे. एक तास चालण्याने आपली 5,500-6,500 स्टेप्स होतात. रचित दुआ यांच्या मते शरीरातील चरबी जाळण्यासाठी , कार्डीओवॅस्कुलर आरोग्य आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यासाठी चालणे हा बेस्ट व्यायाम आहे. आपल्या फिटनेसची पातळी वाढण्यासाठी रोज सहा ते दहा हजार पावले चालणे गरजेचे असते. त्यामुळे चालताना स्टेपची मोजणी करण्यासाठी आपण स्टेप ट्रॅकर बॅंडचा वापरही करू शकता असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.