प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतू शकते? कन्नड अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर काय सांगताय तज्ज्ञ…

बंगळुरुच्या एका रुग्णालयात झालेल्या प्लास्टिक सर्जरीत कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्जरीमध्ये झालेल्या चुकीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतू शकते? कन्नड अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर काय सांगताय तज्ज्ञ...
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:47 AM

मोठ मोठ्या सेलिब्रिटींनी प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) केल्याचे आपण अनेकदा बातम्या किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून एकत व पाहत असतो. कुणी नाकावर सर्जरी करते तर कुणी ओठ, स्तन आदींची सर्जरी करुन त्याला नीट आकार देत असल्याचेही आपण ऐकले आहे. परंतु या प्लास्टिक सर्जरीने कुणाचा मृत्यूदेखील (death) होउ शकतो का? सर्जरी दरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे जीव जावू शकतो का? असे काही प्रश्‍न निर्माण होणे साहजिक आहे. याला कारण ठरले ते नुकतेच एका कानडी अभिनेत्रीच्या मृत्यूचे… अभिनेत्री चेतना राज (chetna raj) हिच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्‍न निर्माण होत आहेत. बंगळुरुच्या एका रुग्णालयात झालेल्या प्लास्टिक सर्जरीत कानडी अभिनेत्री चेतना राज हिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्जरीमध्ये झालेल्या चुकीमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे.

चेतनाला प्लास्टिक सर्जरीसाठी सोमवारी (16 एप्रिल) डॉ. शेट्टी कॉस्मेटिक सेंटरमध्ये भर्ती करण्यात आले होते. चेतनाने डोरेसानी आणि गीता सारख्या सीरिअलमध्ये काम करुन आपली ओळख निर्माण केली आहे. परंतु अशा अकाली मृत्यूनंतर सर्वांनाच झटका बसला असून प्लास्टिक सर्जरीवर अनेक प्रश्‍नदेखील निर्माण होत आहेत. त्यावर तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेणार आहोत.

मोजक्या घटनांपैकी एक

तज्ज्ञांच्या मते, अशा घटना मोजक्याच घडतात. प्लास्टिक सर्जरीदरम्यान झालेल्या गुंतागुंतीतून या घटना होतात. ऑपरेशनच्या सुरुवातीचे 24 तास अत्यंत महत्वाचे असतात. त्या काळात रुग्णाला निगरानीखाली ठेवले पाहिजे. प्लास्टिक सर्जरीसोबतच री-कंस्ट्रक्टिव्ह सर्जरी आणि एस्थेटिक इनहॅसमेंट सर्जरी याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की प्रत्येक वेळी आपल्या शरीराच्या प्रतिमेबाबत विचार करुन लोकांमधील आपल्या इमेजला अधिक चांगले करण्याच्या विचारातून अशा प्रकारची सर्जरी केली जात असते.

हे सुद्धा वाचा

मृत्यूचा धोका केवळ 0.02 टक़्के

सर गंगाराम रुग्णालयातील कंसल्टेंट एस्थेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉ. विवेक कुमार यांच्या मते, सर्जरीची संपूर्ण माहिती व शरीराच्या कुठल्या भागावर सर्जरी कराची आहे, याची संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय सर्जरी करणे धोकेदायक ठरु शकते. एका अभ्यासानुसार अशा शस्त्रक्रियांमध्ये मृत्यूचा धोका प्रति एक लाख लोकांमध्ये केवळ 20 असतो. म्हणजेच मृत्यूचा धोका केवळ 0.02 टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे अशा सर्जरीदरम्यान ह्रदयाचा झटका येउन मृत्यू होण्याचा धोकादेखील वर्तविण्यात आला आहे.

सीपीआर देउनही उपयोग नाही

एका मीडिया रिपोर्टनुसार, चेतना यांना ह्रदयविकाराचा झटका आला तसे लागलीच तिला एनेस्थेटिस्ट डॉ. मेल्विनने तिला काडे रुग्णालयात हलविले. काडे रुग्णालयाच्या आईसीयूचे डॉ. संदीप वी यांनी नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार, डॉ. मेल्विनने चेतनाला रुग्णालयात पोहचवले. तपासात चेतना हिच्या नसा बंद पडल्या असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तीला तब्बल 45 मिनिटांपर्यंत सीपीआर म्हणजेच कार्डियो पल्मोनरी रिससिटेंशन देण्यात आले. परंतु तिच्याकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, या सर्व घटनेची पोलिस चौकशी सुरु झाली आहे.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.