Coffee On Empty Stomach: रिकाम्या पोटी कॉफी पिणे चांगले की वाईट? हे वाचा
सकाळी उठल्यावर अनेक लोकांना कॉफी प्यायची सवय असते, त्यामुळे झोप उडते आणि त्यांना फ्रेशही वाटतं. पण तुम्ही रिकाम्या पोटी कॉफी पित असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
नवी दिल्ली – अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या चहा कॉफी (coffee) प्यायची सवय असते. काही लोक तर असे असतात, त्यांना कॉफी प्यायल्याशिवाय चैन पडत नाही. सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिणे योग्य आहे की नाही यावर अनेक वर्ष चर्चा सुरू आहे. किती कप पिणे योग्य हा तर वेगळाच मुद्दा आहे. यासंदर्भात झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की कॅफेनचा सगळ्यांच्या मेटाबॉलिज्मवर (metabolism) वेगवेगळा परिणाम होतो. याच कारणामुळे काही लोकांना सकाळी कॉफी प्यायल्यामुळे फ्रेश वाटतं (fresh) तर काही लोकांना फरक जाणवतच नाही.
कोणी कॉफी पिऊ नये ?
साधारणत: सकाळी कॉफी प्यायल्याने आपला मूड सुधारतो आणि अनेक कामं करू शकतो. काही फिटनेस फ्रीक तर कॉफी यासाठी पितात की त्यांना व्यायामासाठी एनर्जी मिळते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जे लोक कॉफी लवकर पचवतात, त्यांच्यामध्ये कॅफिनचा प्रभाव अधिक चांगला दिसून येतो. मात्र, ज्या लोकांना गॅस, पोटात अल्सर किंवा IBS चा त्रास होतो, त्यांना सकाळी सर्वात आधी कॅफिनचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. कारण कॅफिनमुळे गॅस होतो.
2013 साली झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले की कॉफी पिणे आणि पोट किंवा आतड्यात अल्सर होण्याचा कोणताही संबंध नाही. जपानमधील 8,000 लोकांवर केलेल्या या संशोधनातून असे दिसून आले की जे लोक दिवसातून तीन किंवा अधिक कप कॉफी पितात त्यांना कॉफीमुळे अल्सर होत नाही.
कॉफी पिण्यामुळे होणारे नुकसान
– तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कॉफीमुळे अल्सर होत नाही, परंतु त्याचा आतड्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. कॉफी तुमच्या आतड्याची हालचाल वाढवते. जर तुमचे पोट कॉफी पचवू शकत नसेल तर यामुळे छातीत जळजळ आणि रक्तदाब वाढू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी कॉफी प्यायल्याने झोपेची समस्या किंवा त्याच्याशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.
– सकाळी उठल्यावर कॉफी प्यावी की नाही याबाबत कोणताही नियम नाही. काही लोकांना त्याच फायदा होतो, तर काहींना होत नाही. बर्याच लोकांसाठी, सकाळी कॉफी प्यायल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते.
– ज्या लोकांना गॅसेसचा त्रास होतो, त्यांनी कॉफी प्यायल्यामुळे समस्या वाढू शकते. यासाठीच कॉफी पिताना त्यामध्ये दूध घालून पिऊ शकता किंवा नाश्ता करताना कॉफीचे सेवन करू शकता. यामुळे गॅसेसचा त्रास होणारा नाही. कॉफी आणि सकाळचं खाणं यामध्ये फार अंतर ठेवू नये, असा सल्ला डॉक्टर देतात.
रिकाम्या पोटी कॉफी प्यावी की नाही?
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होत नसेल तर तुम्ही ती आरामात पिऊ शकता. उलट, कॉफीमधील अँटीऑक्सिडंट्स तुमच्या शरीराला फायदेशीर ठरतात.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)